QUOTES ON #बापमाणूस

#बापमाणूस quotes

Trending | Latest
27 MAY 2022 AT 17:39

आई असली जननी तरी
आई होण्याला बापामुळे अर्थ

दोघे एकमेकांना पुरक सार्थ
आई बाप दोघांमुळे जीवन कृतार्थ

बाप दिसत नाही सहजच डोळ्यांतून
जाणावा लागतो तो हरघडी हृदयातून

कुणी गांभीर्याने मांडत नाही त्याचं असणं
मात्र तो असतो अन् धीर देणारं असतं त्याच असणं

कोणात्याही परिस्थितीत भिंत बनून समोर उभा ठाकतो
बाप लेकरांची ' ढाल ' असतो

डोळ्यांना न दिसणारी पण अस्तित्वात असलेली
जाणवेत तरणारी हृदयाला भिडलेली

खरं तर बाप अजब रसायन असतं
मन त्याचं तसं सहज दिसत नसतं .
- गूज मनीचे ....

-


18 FEB 2024 AT 23:09

डोक्यावर हात ठेवणारा
प्रत्येकाला बाप हवा असतो
पाठीवर थाप मारणारा
प्रत्येकाला बाप हवा असतो

कुशीत घेऊन निजणारा
प्रत्येकाला बाप हवा असतो
चुकल्यावर धाक लावणारा
प्रत्येकाला बाप हवा असतो

पै पै पैका साठवणारा
प्रत्येकाला बाप हवा असतो
कन्यादान करताना रडणारा
प्रत्येकाला बाप हवा असतो
-©शब्दपौर्णिमा...✍️

-


7 APR 2022 AT 9:59

हसू चेह-यावर ठेवोनी वेदना लपवत होता..
कळू दिले ना कोणालाही,तो काय सोसत होता..!

-


4 JUN 2020 AT 13:02

त्या माणसाने कधीच विचार नाही केला की आपण इथे कामात का म्हणुन रोज थोड थोड मरतोय
कारण त्याला माहिती होत....
आपण इथे मरतोय म्हणून घरी तो जीव सुखात जगतोय
👑तो #बाप # आहे👑

-


10 JUL 2020 AT 8:29

तिलिस्मी तारा

इक अख़्तर दिखा था रात में
चांद से भी जादा चमकीला और नायाब
माँ कहे अब्बू सबके दिल के करीब थे।।।

-


18 FEB 2024 AT 18:34

बापमाणूस
अत्यंत अनमोल मित्र
कधी पालक तर कधी मार्गदर्शक
संस्कारांच्या काठावर बालपणी शिस्तप्रिय
घराच्या मंदिरात आनंदमय ज्योत
हरेकाच्या सुखासाठी अहर्निश झिजतो
स्वतःचे दु:ख दूर ठेवतो
तो असताना
त्याच्या चंदनमय स्पर्शात ध्यास जगवतो
तो नसताना
आसवांचा महापूर डोळ्यांतून वाहतो.

-



कोवळ्या हाताला देऊन आभाळाची माया,
देवानं दिलेलं सुंदर सपान
म्हणजे बाप,,
नशिबाची चाकरी करून,खडतर वाटेनं मिळवलेली
भवितव्याची आनंदी दुनिया
म्हणजे बाप,,
मुठभर हसू, परी अडचणींचा मोठा डोंगर पेलून
समाधानाची उगवलेली हिरवळ
म्हणजे बाप,,
संकटाची चाहूल न लागू देता,निर्भिड उभा राहणारा
मोठ्या मनाचा गिरी
म्हणजे बाप,,,
पोटात पेटलेला वणवा घेऊन लेकरांना मिळणारा
काळजातला घास
म्हणजे बाप,,
ज्याच्या कर्तुत्वाची मोजता येणार नाही उंची
असा उदात्त,हिमालय
म्हणजे बाप,,,
रक्तात रुबाब पेरून,संकटाला पायात तुडवून,
चंदनासारखं व्यक्तिमत्व असणारा
म्हणजे बाप,,
जीवनात ज्याचा वावर देवसारखा,सारासार अर्थच
तो जगण्याचा,अन् संस्काराची शिदोरी
म्हणजे बाप....

-


22 FEB 2024 AT 10:01

आपल्या जन्मानंतर आपल्या सुखासाठी
स्वताचा श्वास खर्च करुन
आपली स्वप्नं विकत घेणारा तो म्हणजे बापमाणुस.....

आपल्या अस्तित्वासाठी
कर्तव्यात रममाण होऊन
स्वतःच अस्तित्व विसरणारा तो म्हणजे बापमाणुस......

आपल्या इच्छा अपेक्षांसाठी
स्वतःच रक्त आटवून
आपल्या पंखात बळ भरणारा तो म्हणजे
बापमाणुस.....

वेदना विसरुन पिल्लांसाठी
कणखर खंबीर झगडून
मुलगी सासरी जाताना रडणारा तो म्हणजे बापमाणुस.....

-


18 FEB 2024 AT 15:33

बाप ओठांवरची गाणी, बाप जीवनाची कहाणी
बाप नशिबाच दार..., बाप समान नाही काही 
बाप दुःखातली हाक, बाप स्वप्नाचं आकाश
बाप असता रे...सार, बाप नसता होते हताश....
बाप मलमलचा कापडं, बाप आधाराची थाप 
बाप प्रेमाचा सागर , बाप मोजण्याचं नसे मापं 
बाप करी लेकरासाठी काम, बाप मयाळू जशी आई 
बाप कष्ट गाळी घाम, बाप असता सुखसोई
बाप दिसें बाहेरून कडक, बाप आतून खूप मऊ
बापाच्या हृदयी प्रेम, बापाचं सतत गुण गाऊ
बाप सल्ला देणारा वकील, बाप काळजीची खाणं
बाप करी योग्य न्याय, बापाले उभ्या भविष्याची जाण
बाप मायेचा झरा.., बाप रडे लेक सासरी जाता
बाप देते संस्काराच आंदन, बाप लेकीले सासरी रे जाता
बाप राही सतत उभा, बाप हिम्मतीचा हात 
बाप पै पैसा जमवते, बाप स्वतःच्या इच्छा मारत
बाप हाच खरा देव, बापापुढे सर्व चुका माफ 
बापाच सदा मन साफ, बापावर जबाबदारीचा व्याप 
बाप सांभाळून ठेवा, बाप आयुष्याचा दोर
बाप असता जीवनात, बापामुळे शोभून दिसें घरदार

-


1 OCT 2020 AT 16:22

👩 - बापाची लेक - 👩
(अभंग रचना - वर्ण ६,६,६,४)

-