फुलत काट्याच्या मैफिलीत
गाई गुलाब गीत हृदयातूनी..
कोमल पाकळ्या खुलवतांना
प्रीत उजळवतो मनामनातूनी..
देई हलकेच प्रेमळ हास्यछटा
भावना अंकुरतांना अंतरातुनी..
जणू हात पकडून खुणावतो
व्यक्त करण्या प्रेम नजरेतूनी..
ऐकण्यास आतुरतो शब्दगधं
एकमेकांचे निःशब्द मुखातूनी..
होत क्षणांचा तोच साक्षीदार
धडधड वाढवतो स्पंदनातुनी..
जुळता बंधन जन्मोजन्मीचे
धन्यता मानी अस्तित्वातुनी..
पण तुटता धागे दोन जीवाचे
विखरून जाई तोही देहातूनी..-
मी एक निसर्ग प्रेमी 🌍
~~~~~~~~~~~~~~~~~~~~... read more
माळलेला मोगऱ्याच्या गजरा
तुझ्या केसात बघ कसा शोभतो..
सुगंधात दरवळत तोही लाजून
माझ्याकडे हळूच हसून बघतो..-
तुही त्याच कवितेसारखी
मनामध्ये अलगद फुलणारी..
आठवणींचे गोड स्पर्श देत
शब्दांच्या रुपात झुलणारी..-
निरोप घेऊन जनकाचे येता प्रवेशद्वारी पाहिले
लेक निघाली सासरला.. आनंदात सारे हसतांना..
साठवत नेत्री आठवणी ओलांडून मायेचा उंबरा
गोठवत हृदयी माहेरला.. काठ भिजला निघतांना..
गळाभेट घेत सकलांची जड अंतकरण होताच
नमस्कार केला देवतांना.. अशीष लाभला जातांना..
स्पर्श करून ठिकाणास रंगवत स्वप्न आयुष्याचे
क्षणभर रमली पाहतांना.. दुःख झाले दूर होतांना..
आठवत भूतकाळ पुन्हा -शब्ददीप..✍️
हसली असावे गाळतांना..
थोपवत विचारांचे ऋतु
हुंदका गिळला वळतांना..
-
तू आणि मी मिळून होते एकच संख्या..
हीच एकमेव आहे खरी मैत्रीची व्याख्या..
थेट मनातून....आपणांस....
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
===(👬❣️❤️❣️👬)===-
की ताई देईल खाऊ.. चंद्र,चांदण्या पाहत
नाचत तिच्या बरोबर रात्रीला झोपून जाऊ..
आनंदात गाणी गाऊ.. स्वप्नांच्या जगी रमत
मनसोक्तपणे न्हाऊ..
ऐकत गोष्टी आजीची
पाढे,उजळणी लिहू.. जगत पुन्हा बालपण
दंगा,मस्ती करताना काठी आजोबाची होऊ..
हसतमुख सदा राहू.. जन्मदात्याच्या मायेतील
क्षण पुन्हा साठवून ठेऊ..
बोबडे बोलत मुखाने
दादाला आवाज देऊ.. शब्ददीप..✍️
शुभंमकरोती म्हणत
आशिर्वाद देवाचा घेऊ..-
केव्हा तरी एकांतात
आठवावा भूतकाळ..
साठवलेल्या क्षणांचा
कडू,गोड सुवर्णकाळ..
पाहत त्यांना नव्याने
पापण्यांना भिजवावे..
मुक्त करत दुःख सारे
हास्य गाली फुलवावे..
रिक्त करून वेदनांना
श्वास पुन्हा नवा घ्यावे..
वास्तवास स्वीकारून
अस्तित्वाची जोड द्यावे..
आयुष्य म्हणजे कोडे
जगताना नित्य मानावे..
आनंद घेत क्षणोक्षणी
जीवनास सुंदर करावे..-
पहाट समय होताच मला जग येते..
डोळ्यातील स्वप्ने हळूच सोबत नेते..
थोडे क्षण विचारात निघून जातात..
आवरावे लागेल स्वतःला सांगतात..
आटपून मग नामस्मरण देवाचे होते..
न्याहरी करतांना कार्यलय साद देते..
निघतांना आई,साईचा अशिष घेतो..
रोजच्या कामासाठी आनंदात निघतो..
मग सुरुवात होतो दिनक्रमाचा नवा..
दैवानी दिलेल्या भविष्यासाठी ठेवा..
हीच परिक्रमा नित्य मी रोज करतो..
व्यक्त होण्यास लेखणी हाती धरतो..-