Anil Kapure   (Anil Kapure)
39 Followers · 3 Following

Professionally Money Man & Passionately Man of Words
Joined 14 May 2020


Professionally Money Man & Passionately Man of Words
Joined 14 May 2020
2 MAR 2022 AT 9:19

काय हा अट्टाहास कसला तो हव्यास
आहे सगळे तरी नसलेल्याचा ध्यास
कळावे कसे कसला तो मोह
अनाहुत होत जातो प्रकृतीचा ऱ्हास

सत्य खूप दूर अन् दिसे फक्त आभास
आकलन होते सगळे तरी
कमी पडतो अभ्यास
जिंकण्याचा हट्ट की हरण्याची लाज
मी पणाचा तोरा मिरवण्याचा
कसा न व्हावा भास

जिवंतपणी अनुभवतात अनेक फास
उमजत नाही धरावी कुठली कास
सुटती घरटी अन् तुटतात नाती सारे
कसा फुलवा भरकटलेल्या चेहऱ्यावर सुहास

-


28 FEB 2022 AT 9:19

विस्मरणात गेलेले अचानक समोर यावे
आठवण होती की साठवण ते कसे कळावे
मनाविरुद्ध नेहमीच घडते अवचित
मनाजोगते एकदातरी स्वप्नवत घडावे

आयुष्याच्या गर्दीत अनेकांनी यावे जावे
कोण राहावे कोण जावे हे काळानेच का ठरवावे
घडून गेल्याच्या नंतर खूप नंतर कळते
जे घडले तेच अन् तेच नक्कीच योग्य असावे

परत परत त्याच चुका करून का फसावे
कधी कधी उगीचच स्वतःवर मनसोक्त हसावे
व्हायचे ते होणारच काहीही करा
उमजले अता अट्टाहास नसावा मनाप्रमाणेच सगळे व्हावे

-


27 FEB 2022 AT 10:35

बोल मराठी श्वास मराठी
आशा मराठी भाषा मराठी
स्वप्न मराठी सत्य मराठी
सूर मराठी ताल मराठी
साज मराठी माज मराठी
मी मराठी माझे मराठी
तुका मराठी ज्ञाना मराठी
स्वामी मराठी राजा मराठी
नाथा मराठी चोखा मराठी
पू ल मराठी व पू मराठी
वी वा मराठी साने मराठी
अत्रे मराठी खरे मराठी
गुरू मराठी विठू मराठी
शब्दाशब्दात रंगतो मराठी
भावभावनात रांधतो मराठी
मनामनात रुजतो मराठी
श्वासाश्वासात खुलतो मराठी
मराठी भाषा दिवसानिमित्त लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा

-


26 FEB 2022 AT 9:29

कधी कधी मनाविरुद्ध चे काहीतरी अपरित घडते किंवा खुप काळ जोपासलेले विचार हे निव्वळ न्यूनगंड होते याची प्रचीती येते तेव्हा स्वतःला बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो.....
योग्य गुरू अश्या गोष्टींची पुनरावृत्ती करून आपला अनुभव बदलवून टाकतो.

-


25 FEB 2022 AT 7:52

प्रश्नांची जंत्री समोर आली की उत्तरांचे नकाशे तपासण्यापेक्षा त्या प्रश्नांचा डोह गाठावा म्हणजे सगळेच सुरळीत होत जाते. कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नसतात... काही प्रश्न सोडवायची असतात, काही सोडून द्यायची असतात तर काही फक्त अनुभवायची असतात....
आणि बरीचशी प्रश्न ही मनाचा उकल करण्यासाठी असतात काहीतरी
अनुत्तरित सोडवण्यासाठी नाही....

-


24 FEB 2022 AT 9:08

एक एक क्षण जगण्यासाठी अनेक निःश्वास सोडावे लागले
मनसोक्त झेपायला स्वतःवर विश्वास जोडावे लागले
ऐल तिरा हून पैल तिरा वर स्वप्नांचे ते आभास थोडे लाभले
जिंकणे आणि जगण्याचा फरक कळायला सुखाचे ध्यास घडावे लागले

-


23 FEB 2022 AT 9:14

गुरूंच्या सानिध्यात सगळ्या अडचणी सुटतात, सुखाचे नवे मार्ग मोकळे होतात आणि प्रत्येक वेळी नव्याने पुन्हा एकदा स्वतःला जिंकण्याची जिद्द भरतात....
माझ्या आयुष्यातील सर्व गुरुंना त्रिवार वंदन.
श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

-


22 FEB 2022 AT 9:02

बड़ी मुद्दत से इंतजार था इस लम्हे का
अब डर नहीं लगता है किसी बात का
खो दिया है मैंने सबसे ज्यादा मनपसंद इन्सान को
उसके जाने से खौफ खत्म हो गया है मौत का।

-


21 FEB 2022 AT 8:47

हर बार वहीं अफसाना लिए घूमते हैं
बात बात पर किसी पुरानी बात का जिक्र किए जाते हैं
जिद होती है खुद को साबित करने की
बस कभी कभी हस के जीना भूल जाते हैं

-


19 FEB 2022 AT 10:05

Strategists
Humble
Intelligent
Vibrant
Ambitious
Joysome
Influencial

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रकटदिना निमित्त लाख लाख शुभेच्छा आणि अभिवादन

-


Fetching Anil Kapure Quotes