कपाळी शोभतोय तुझ्या नावाचा ठसठसीत टिळा
जीवाला लागलाय तुझ्या प्रितीचा भलताच लळा.
हसू गाली अनावर होई मन असं फुलारून येई
कितीदा असं वळवळून पाही जीव असा किती उतावीळ होई .-
शब्दांनी गोळा केला
लेखणीतून नकळत
कागदाला बिलगला
तुझ्या डोळ्यातला भाव मी जाणून असते
मला कळले नाही असं मी भासवते
अन् तुला वाटतं .... मला कळत नाही
मी ही उगा गप्पच असते
तुझी वरवर गंमत पाहत असते
अन् तुला वाटतं ... मला कळत नाही
उलाघाल तुझी मला जवळ घेण्याची असते
अन् बहाना तू शोधत असतोस
मनातून मी ही फुलारत असते मला सारे कळत असते
अन् तुला वाटते ... मला कळत नाही
फार गंमतीचे असते तुझे असे हे वागणं
पाहून लाजही माझी लाजूनच जाते
मला कळत सारे असते अन् तुझे बिलगणे नकळता होते
अन् तुला वाटते ... मला कळत नाही .
- गूज मनीचे ....
-
आषाढ सरत आला
मनाला लागली श्रावणाची चाहूल
इंद्रधनु ही मनी म्हणतोय पाहू आता
कशी देतात ऊन पाऊस हूल .
-
आपणच आपल्या कक्षा
का अरुंद कराव्या
स्वतःभोवती बांधून एक चौकट मर्यादेची
विचारांना सीमा का द्याव्या
शिकण्यासारखे खूप आहे
अनुभवण्यासाखे खूप आहे
खूप मोठ्ठं हे जग आहे
अजून खूप उमलावयाचे आहे.
म्हणून प्रचंड वैविध्यतेने नटलेल्या
विचारांना मनसोक्तपणे अंगिकारावे
प्रचंड उत्साह, आशाने भरभराटीने
मन भरून घ्यावे
व हाती असलेल्या आयुष्याच्या
क्षणा कणाला प्रचंड उत्स्फूर्ततेने बिलगावे
वैविध्यतेने नटलेल्या जीवनाला
रोज नव नव्याने भेटावे .
- गूज मनीचे ....
-
ढगांची तक्रार त्यांना इकडून तिकडून
नाचवणाऱ्या सरींनी केली
ढगांच्याच राजाकडे थोड़ी विनवणी केली
ढग पण नाचवतच होते ना सरींना
पाहिजे त्या त्यांचा तोऱ्यात
कधी गाज्या वाज्या करत
बॅण्ड वरात आणि बिजलीच्या कडकडाटात
कधी रिपरिप ; कधी पिरपिर
तर कधी चिर् चिर रोग्याटल्यागत
शांतपणे ढगांनी पण ऐकूण घेतले
पुन्हा म्हणाले "अगं, सरींनो आम्ही तरी काय करणार
आम्हीही नाचतोय वाऱ्यांचा तालावर
ऐकूण घेत म्हणणे दोघांचे ढगांचे राजे उद्गारले
अरे , हा तर आहे ऋतू मानाचा फेरा
आता तुम्ही सध्या दोघेही त्यात फिरा
सारा वातावरणाचा खेळ आहे हा न्यारा
आणि यावर तर चालतोय जगाचा पसारा .
- गूज मनीचे ....
-
रात्र थांबली जरी
डोळ्यांची वाट थांबली नाही
आशेची भूक
अजून भागली नाही .-
डबा हातातला टीपॉय वर ठेवतो न ठेवतो
तोच तीचं नसणं मनाला जाणवलं
तिच्या असल्याचं महत्व नसण्यानं जाणवलं
दार उघडतानाच ते मनात होतं शिरलं
बॅग अजूनही हातात होती
शूज काढल्याबरोबर पाण्याची साथ नव्हती
सगळे कसे शांत जिथल्या तिथे होतं
मन मात्र फक्त जागेवर नव्हतं
आवडीने आणलेले जेवण बेचव लागत होतं
कारण तिच्या वाढण्याचं तंत्र त्यात नव्हतं
इतक्यातच तिचे नसणे जाणवू लागले
अजून ४-५ दिवस म्हणत मन उसासा सोडू लागले
तेवढ्यातच फोन वाजला
तिच्या प्रश्नांचा भडिमार सुरु झाला
सर्व काया पुलकित झाली
सर्व चौकशी करुन ती फोन ठेवू लागली.
मी इकडून म्हणालो अग अग थांब एक बोलायचे राहिले
तू मला फार आवडतेस असं सांगायचे राहिले
ती समोर नसूनही भाव तिचे समजले
तिच्या असण्याचे महत्व तिच्या नसण्यानं उमजले .
- गूज मनीचे . . ..
-
माझा आवडता चहा
आल्याचा मस्त
सोबत तुम्ही पण या प्यायला
करा माझ्या दोन चार चारोळ्या फस्त .
-
डांबूनच ठेव नकारात्मकेला ;निराशेला
सांगून ठेवले ठणकावून मनाला
डिंडोरा पिटवू नकोस केवळ "मी 'पणाचा
सतत विचार ठेव दुसऱ्यांचा ; सुविचांराचा
डमरु वाजवून स्वतःचा दुसऱ्यांस झुकवू नकोस
इच्छेच्या अहंकाराने नात्यांचा नाश करू नकोस
त्यापेक्षा स्वतःचा माथा टेकवून
हो तू मोठ्या मनाचा संस्कारातून
वागणेच तुझे 'सर्वस्व ' 'वर्चस्व ' ठरते
तुझ्यामुळे माझं खरे रुप ; माझ्यातले 'मी 'पण जगाला कळते.
तेव्हा पुन्हा एकदा तुला सांगणे
माझ्यातल्या माणूसकीला कायम जागृत ठेव .
- गूज मनीचे ....
-
नजरेसमोरून हटेना त्याचा चहेरा
मिटत्या पापण्यांतही त्याचा बसेरा
नकळता मनात हसवतो मला
खुलून येतात गालाच्या खळ्या-