नजरोंमे हमारे है इतना इश्क गेहरा की,,
आपका घायल होना तो मंजूर हैं........
♥️✨-
जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩 जय शंभुराजे 🚩ओम नमः शिवाय🌼🌼🌺
शब्द माझे तुझ्य... read more
भेट तुझी माझी स्मरते,गंध भाव त्या श्र्वासांचे,,
अबोल धुंद प्रितीचे, स्पर्शातुर हळव्या भासांचे.....
दाटल्या भांवनांची ओंजळ तुझी
मी आवरते माझ्या काळजाच्या ठोक्यानी,,
अजूनही तू वादळात मोहाच्या
सावरते तुजला मी प्राणांपरी गहीवरूनी,,
सांग दुरावा तुज सोसेल का?
अंतरी सदैव मला स्मरूनी,,
धिर जरासा धरावा प्रिया,
वेळ अशी ही आहे जरा वादळाची....
भेट तुझी माझी स्मरते,उलगडते प्रित तुझी माझी,,
एक भेट ही होतेच पुन्हा हरवून भेटण्यासाठीच.....-
सुंदर क्षणांच्या वेढ्यात अडखळलेले तुझे नि माझे ते हळवे बंध.......
प्रेममय सोबतिचे हेच गंध.....
सांग बरे असे हे कोणते ऋणानुबंध?......✨
♥️-
आठवणींचे पान
हलले,
मोहरला देहाचा वृक्ष
झडू लागला,,
प्राजक्त प्रीतीचा
सांडला झरझर,
अंगभर मधाळ सुगंध
दरवळू लागला,,
मिठीत हळव्या
क्षणांच्या,
तुझ्या आभासांचा खेळ
रमू लागला,,
पण भेटीसाठी आसमंत
कोरे अजूनही,
तरी चाहुलींचा पावसाळा
उरी बरसू लागला....-
सौभाग्याचं लावण्य,
लेण कुंकवाच,
बंधन पवित्र काळ्या मण्यांच,
कौतुक किती ते हिरव्या बांगड्यांच,
कपाळावर तुझ्या अस्तित्वाचा साज
मिरवते मी जन्मा- जन्मांतरी,,
असावं वडाईतक दिर्घाऊष्य तुला,
ही एकच आस या अंतरी.....-
फुल, मन एक फुल...
स्वतःच्याच गंधाची का
स्वतलाच भुल.....
विचारांचे गंध
गंध अस्तित्व अनोखे,
सर्वदूर पसरता,
येती कीर्तीचे कवडसे.....
कांतीचा रंग,
रंग हृदयात निर्मळ,,
वाचता न येणारे,
इथे सत्य असे गहाळ...
-
दूर दूर पर्यंत,
शोधले मी भाव तुझे,,
पण अजूनही अज्ञात मी,
सांग मला गाव तुझे,,
ना पत्ता,ना ओळख,
नाही माहित नाव तुझे,,
डोळ्यात मात्र तुझी लख्ख प्रतिमा,
शोधेल मन मग ठाव तुझे,,
जोखीम मी तर घेतलीच आहे,
आता नको विरहाचे घाव तुझे,,
काळीज आतुर धावतेय तुझ्याकडे,,
सांग ना मला गाव तुझे......-
चंद्राच्या प्रकाशित वाटेवर,,
पुन्हा सांज आज विरघळते आहे,,
पुन्हा नव्याने ओढीत कुणाच्या,
त्यात विरहाचे क्षण वितळते आहे,,
दूरवर राहिला गाव माझा,
अवखळ वाऱ्याच्या झोताने मला दर्शवते आहे,,
माझी माणसं असतील का प्रतीक्षेत माझ्या,,
डोळ्यातील पाणी तिला आज विचारते आहे....✨-
स्त्री होऊन जगताना,
अनेक जन्म घ्यावे लागते,,
कितीतरी वळणावर,
अनेक घाव तिला सोसावे लागते,,
पदरात रखरखत घेऊन ऊन,
सुखाची सावली ती होत असते,,
अंतकरणात ममत्व घेऊन,
ती मायेचं प्रतीक म्हणून मिरवत असते,,
नाही ती अबला,नाही ती दुबळी,
कणखर,आशावादी तिची ओळख असते,,
ढाल होऊन संकटांच्या तलवारिशी,
अविरत युद्ध तिचे सुरूच असते,,
भाग्य लागतं स्त्री म्हणून जन्मायला,
कारण स्त्री तर निर्मिती असते,,
तीच्याविन सारेच भिकारी आहेत,
कारण प्रत्येकाच्या माथ्याच तीच उजळ भाग्य असते....-
पाहता पाहता
जवळूनी तुजला,
भावनांनी पापण्यांचे
उंबरे ओलांडावे,,
क्षणांत अशीच तू
येता जवळी,,
ह्रदयीचे स्वर
तुझ्या श्वासात सांडावे....♥️🥀-