मुक्त संचार करणाऱ्या साध्या सरळ निरागस जीवाला
कपटी दुनियेच्या डावपेचांची जाळी आणि गुंतवण्याची खेळी कधीच कळत नाही......-
विचारांच्या कल्लोळाला वाट मोकळी करून देतात....
शांत राहणाऱ्या मन... read more
बन तो जाऊ शब्द तुमहारे क्या ज़िंदगीभर सँभाल पाओगी I
गर बन जाऊँ आहट क्या.. आहट से पहचान पाओगी II-
कित्येक वर्ष हरवलेले तेच हसू आज पाहिले
तीच नजर, तेच भाव आणि तेच प्रेम आज पाहिले
अचानक यावा पाऊस अन उडावी तारांबळ
असेच काहीसे भांबावले मन जेव्हा तिने आज मज पाहिले
अनोळखी परी ओळखीचे दूरचे परी हृदयीचे
असेच काहीसे मी तिला तिने मला आज पाहिले
डोळ्यात अश्रू तिच्या माझ्या येताच अडखळला
ती भावनिक मी हताश असेच काहीसे चित्र आज पाहिले
अंतरीत बंदिस्त केव्हाचे प्रतिबिंब प्रेमाचे
मुक्त होऊनी पुन्हा मजवरी भाळताना आज पाहिले
तेच झुमके तोच गजरा मोगऱ्याचा केसात
परका जरी मज आता परी मजसाठी दरवळताना पाहिला-
कित्येक वर्ष हरवलेले तेच हसू आज पाहिले
तीच नजर, तेच भाव आणि तेच प्रेम आज पाहिले
अचानक यावा पाऊस अन उडावी तारांबळ
असेच काहीसे भांबावले मन जेव्हा तिने आज मज पाहिले
अनोळखी परी ओळखीचे दूरचे परी हृदयीचे
असेच काहीसे मी तिला तिने मला आज पाहिले
डोळ्यात अश्रू तिच्या माझ्या येताच अडखळला
ती भावनिक मी हताश असेच काहीसे चित्र आज पाहिले
अंतरीत बंदिस्त केव्हाचे प्रतिबिंब प्रेमाचे
मुक्त होऊनी पुन्हा मजवरी भाळताना आज पाहिले
तेच झुमके तोच गजरा मोगऱ्याचा केसात
परका जरी मज आता परी मजसाठी दरवळताना पाहिला-
हे आभास तुझे, ते घाव तुझे
बघ छळती मज रोज नव्याने
मी विश्वास धरुनच बघ चालतो प्रेमाचा अजुनी
आणि तुझे घातपात जिव्हारी झेलतो मानाने
होता शब्द केव्हाचा तुला दिला मी
जपतो हृदयी त्याचे व्रण मोठ्या मनाने
सात जन्माचे होते वचन तुझेही
आता चालतो मी एकटाच त्याच वाटेने
म्हणाली होतीस तुझा शब्द शब्द मायेचा उमटतो
आता मायेची जागा बघ घेतली वेदनेने
मी लिहीतो काही तरी हसऱ्या मुखवट्याने
अन कविता तरीही भिजते ओल्या अश्रूने
मी काय म्हणतो तू एकदा ये पुन्हा जाण्यासाठी
भरतो तुझी ही ओटी प्रेमात भरलेल्या ओंजळीने
तू रडशील उसासे टाकशील
तेव्हाच मला वाटेल आता तू रहाशील माझ्याशिवाय सुखाने-
झोपे ऐवजी डोळ्यात रात्री
हल्ली अश्रू घर करतात
रात्र सरली की दिवसा
आठवणी छळू लागतात
आठवणी सावरता सावरता
हृदयी तुझ्या भेटीचे वेध लागतात
आणि भेट होत नाही म्हणून
रात्री पुन्हा अश्रू मज गाठतात.....-
लोकांना फक्त आपलं
सध्याचं हसणं दिसतं
त्या हसण्यासाठी पावलोपावली
झेललेला वणवा नाही दिसत.
मागच्या कठीण काळात
कठीण परीश्रम घेताना दिलेल्या
अपल्या स्वप्नांची, अस्तित्वाची
आहुती नाही दिसत.....-
तुला हवं म्हणून
मी काय काय करावं
तुला पाहण्यासाठी सतत
मी क्षण क्षण झुरावं
येता जाता त्या वळणावर
मी तुझी वाट पहात रहावं
तुझ्या मागे वळून पाहण्याला
मी असं किती दिवस वेडं व्हावं
पाहून लाजण्याला तुझ्या
मी हृदयात साठवावं
तुझ्या अबोल प्रेमानं आता
सखे वाटते बोलकं व्हावं
रोज रोज नजरेच्या भाषेत
दोघांनी किती दिवस बोलावं
मोड भिंती दुराव्याच्या आता
दोघांनी असं किती आतुर रहावं-