मनातल्या वादळांना थांबवु तरी कस.
तुझ्या आठवणींना विसरु तरी कस.
वचन त्या परमेश्वराला दिलेल तोडु तरी कस.
सांग ना तुझ्याशिवाय मी जगु तर कस.
तुला पाहताना अश्रुंना आडवु तरी कस.
वेढ्या माझ्या मनाला थांबवु तरी कस.
पावलांना तुझ्याकडे येण्यापासुन आडवु तरी कस.
खचलेल्या मनाला माझ्या सावरु तरी कस.
दिलेले शब्द तुला मोडू तरी कस
लेखणीला माझ्या थांबवु तरी कस.
प्रेम माझ समजावुन तुला सांगु तरी कस.
तुझ्या शिवाय पुढच पाऊल टाकू तरी कस.
अपुर्ण राहिलेल्या प्रश्नांना सोडवु तरी कस.
झालेल्या गैरसमजांना दूर करु तरी कस.
मृत्युला शरण जावू तरी कस.
तुझ मन दूखेल अस वागु तरी कस.-
मनातले वादळ विचारांचे
भितीचे, ,अविश्वासाचे,
त्याला साथ भावनांची
खेळ रंगवणाऱ्या त्या मनपटलांची
मनातले वादळ येते तसे जाते
वादळच ते क्षणिक काहूर माजवून जाते
धीराने त्याला सामोरे जावे
संयमाने थोड़े शांत करावे
मनातले वादळ त्याला वाट सुविचारांची द्यावी
चांदण्याची बरसात जीवनी पहावी .
-
वादळ परिस्थितीचं असो किंवा मनाचं,
आपण खचून कसं चालायचं...
पशु पक्षी सुद्धा वादळाला भित नाहीत,
मग माणसानं का घाबरायचं...
ज्ञान बुद्धी वापरून,
कधीतरी डोक्यानं ही खेळायचं...
प्रसंगावधान राखून,
संकटांना भिडायचं...
आत्मविश्वासान खंबीर राहून,
येणाऱ्या क्षणांना झेलायचं...
सकारात्मकतेन सामोर जाऊन,
सुख दुःखाला स्वीकारायचं...
असंख्य येतील वादळे जगताना,
वेळेसोबत त्यांनाही असतं, निघून जायचं...
पण.."आयुष्य" एकदाच आहे,
त्याला मात्र आपण भरभरून जगायचं...
-©Poonam...✍️
-
मनातले वादळ पेटून उठले सारे
कसे आवरू मनातील भावनांचे पसारे,
विचारांचे काहूर माजले मनात
माझ्या मनाला तुझ्याच प्रीतीची आस....
तळमळत्या जीवाची साद ऐकून
ओढ लावी पुन्हा पुन्हा जीवा
नको वाटतो प्रीतीचा अबोला
आजन्म कर्णी सूर तोच हवा.....-
मनात उठल्या वादळास या
शांत करावे कसे
कसे पुसावे काळजातुनि
गतकाळाचे ठसे!
-
घडून गेलय बरंच काही
घडतय अजूनही नको नको ते जीवनात
उन्मळून पडलीत काही आवडती झाडे
मन कितीतरी वेळा उध्वस्त झालय
वादळांना निमित्त आपलीच माणसे आहेत
मन उद्विग्न होत, कसा काढावा राग अंतरात दबून आहे
हे तर चालूच राहील.. जीवन का यालाच म्हणतात?
हि मनातली वादळे कधीच शमणार नाहीत पुर्णतः
त्या वादळात टिकून राहण्यास सामर्थ्य दे भगवंता!!-
एक आकाश माझंही आहे
मनातलं वादळ शमविण्यासाठी,
खांद्यावर डोके ठेवण्यासाठी
हक्काचं क्षितिज मलाही हवं आहे
असं प्रत्येक तिला आणि त्याला वाटतं असतं
पण हक्काचा खांदा मिळवण्यासाठी
आधी भार सहन करण्याची ताकद कमवावी लागते
दोघांनाही!
संजीवनी
-
मनातले वादळ भावना हतबल
विचारांच्या भोवऱ्यात स्व'ची तारांबळ
मनातले वादळ अहंकाराचे तळ
प्रेमाच्या चांदण्यात डोळ्यांचा छळ
मनातले वादळ काळजात कळ
विरहाच्या स्वप्नांत स्पर्शाची हळहळ
मनातल्या वादळाची संपावी वेळ
जगण्याच्या श्वासांत पुनर्रचनेचा खेळ.-
मनातले वादळ थांबवता तेव्हाच येतं
जेव्हा त्याला आपल्या सोबत मरण घेऊन जातं !-
उभी मी हिरवळीच्या बाजूला,
तरीही कोरडी मी शुष्क काष्ठ...
वादळाने असा घात केला,
मुळांवरती माझ्या आघात केला...
प्रयत्न करता कितीही सारे व्यर्थची,
नुसते बघत राहणे त्या हिरवळीकडे,
भाग्यचं माझे आता अंत सरणावरी...
-