Jitendra Tambat   (JITU/G2/GG-THEMINDSEEKER)
4.1k Followers · 377 Following

read more
Joined 21 October 2018


read more
Joined 21 October 2018
24 DEC 2024 AT 7:11

भविष्याच्या वाटेवर,
काट्याकुट्यांना मागे सोडून,
भुतकाळातील फुले घेऊन,
पाऊले आता कुठे,
पुढे सरसावली आहेत.

असंख्य, वाटांना,
काळाच्या बंधनात बांधून,
दुःखाच्या वेलीवरती,
शब्दांच्या मंदिरात,
सुखाची काव्यफुले फुलली आहेत

-


22 DEC 2024 AT 22:17

प्राजक्त

तु सदाफुली, तु प्राजक्त,
क्षणा क्षणाला तु मुक्त.

तु मोगरा, तु गुलाब,
दरवळ तुझा शुभलाभ.

तु जाई-जुई , तु चमेली ,
तु लाडकी कोमल सहेली.

तु बकुळी, तु गुलमोहर,
चहुकडे तु,आनंदाचा बहर.

-


10 DEC 2024 AT 16:35

Comparison is a
prison for happiness
and a hindrance to
good times.

-


9 DEC 2024 AT 8:31

प्रवास

भविष्याच्या प्रवासात,
सुख परिक्षा घेत असतं,
अन् दुःख उत्तर देत असतं.
आयुष्याच्या प्रवासात,
कर्म विष पित असतं,
अन् प्रेम अमृत देत असतं.

-


2 DEC 2024 AT 8:08

राग तुझा तुझ्या सारखाच हिरा आहे,
तुझ्या रुपाला शोभणारा दागिना आहे.
मानवतेचे दर्पण तुझ्या वागण्यात दिसे,
तुला लाभलेला अनमोल खजिना आहे.

-


31 JUL 2024 AT 10:20

माझ्या कवितांचा सातबारा,
स्वप्नसुंदरी फक्त तुझ्याच नावावर आहे.
काळजी करू नकोस सये,
शब्दांच ओझं फक्त माझ्याच नावावर आहे.

-


31 JUL 2024 AT 8:24


सकाळ.

सोनेरी कवडसा,
वार्‍याची धुसर चाल.
लखलखत्या रत्नांना,
भेटले फुलांचे गाल.

मनात पालवी,
सरींनी धरला ताल.
आशेच्या पक्ष्यांना
नवचैतन्याची सकाळ

-


9 JUL 2024 AT 10:51


माझे शब्द सये,
मृत होणे कठीण आहे.
प्रेम श्वास आहे,
गुप्त राहणे कठीण आहे.

-


12 JAN 2024 AT 16:16

ऐकू येतोय.
मनात पडतोय,
पाऊस तुझा.

-


7 JAN 2023 AT 7:38

पहाट आनंद,
डोळ्यात दिसतो.
पहाट वारा,
मनाला हसवतो.

-


Fetching Jitendra Tambat Quotes