मन लिहितेय
माझ्या नकळत
तुला लिहितेय
प्रयत्न माझा
फसतो अनेकदा
विषय पुन्हा तुझा
शब्द जुळतात
विस्कटतात पुन्हा
तुलाच लिहितात
माझी लेखणी
लिहिते मात्र
तुझी कहाणी
विसरण्या लिहिते
वर्तमानातही भूतकाळ येतो
तुलाच आठवते-
सुख दुःखानी भरली पाने
कधी आनंद कधी व्यथा आहे
जन्म ज्याचं मुखपृष्ठ, मृत्यू मलपृष्ठ आहे
मधे अगणित प्रसंगाचा लेखाजोखा आहे
-
असे गोड फार
नसते ती कोणाची लाचार
स्वाभिमानाची चव तिला लागे मधुर
खाताना नसते मनात चिंतेचे काहूर
नसते ती कोणावर अवलंबून
कमावली जी घाम गाळून
-
सीमेवर आपल्या, आपल्या भारतमातेच्या संरक्षणार्थ लढणाऱ्या सर्व जवानांना माझे शतशः प्रणाम... आणि खूप खूप धन्यवाद!
भारत माता की जय!! वंदे मातरम्!!-
तोडल्या कोणी?
वासना भाव आणुनी मनी
एकच विचार पिछाडला होता ध्यानी
का केलास अंधकार त्याच्या तुज्या जीवनी?
जोपासल्या होत्या ज्या प्रेमानी
क्षणात टाकीले उध्वस्त करुनी
ना आला प्रश्न ह्याच जर असत्या आपल्या अंगणी
आपलीच माय भगिनी-
येवू नकोस आता जखमा भरल्या सारख्या वाटत आहेत
पहिल्या भेटीचे ते क्षण धूसर झाल्यासम वाटत आहेत
येऊन आता नको देऊ पुन्हा उजाळा त्या गत क्षणांना
मरण यातना भोगल्यात कितीदा मी त्यांना आठवताना
नको येऊ आता टाईमपास,पर्याय म्हणून मी उरले नाही
सावरलं ज्याने तू गेल्यावर त्याला धोका देणार नाही
-
किसिके भी मन की
पढ़ने के लिए चाहिए
कोई समझदार वाचक
कदर हो जिसे भावनाओंकी
अंदाजा हो परिस्थिति का
ज्ञान हो मानवता का
अनुभव हो दर्द का
-
संघर्ष
शब्दों का
मन में चले
क्या लिखूं ना समझे
सही या गलत ना आए समझ
कभी इन्हीं शब्दों ने साथ दी थी
अकेले में बहोत लिखती थी जो मन आये
छोड़ दिया था लिखना तो रूठ गए है जैसे शब्द
आजकल पता नहीं क्या हुआ है बहोत प्रयास बाद
कुछ पंक्तियां लिख देती हूं जैसे पहेली बार लिखी है
-