QUOTES ON #नवरा

#नवरा quotes

Trending | Latest

नवरा...
कधी कधी नवरोबाचा
राग अनावर होतो
बायकोवर कारण नसताना
संताप काढत बसतो

भांडण्याचं नेहमी कारण
शोधत असतो
काहितरी कुरापत काढून
दोष दिला देत असतो

नेहमीच बायकासारखा
अबोला धरत बसतो
तीला मात्र आतल्या आत
जळवत असतो

बायकोला कारण नसताना
शिवीगाळ करत असतो
तीचं नेहमी माहेरचं
खानदान काढत बसतो

चेहऱ्यावरचा राग मात्र
दाखवत नसतो
बायकोशी बोलणं टाळून
तीला सतवत असतो

नवरा नवर्याचा अधिकार
गाजवत असतो
बायकोला पायताणं
तो समजत असतो

शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️
मुल्हेर बागलाण नाशिक

-


2 SEP 2020 AT 23:33

प्रिय नवरा,
तू आहेस स्वभावाने खूप प्रेमळ
म्हणून तर घातलीस मला प्रेमाची गळ......

अस समजू नकोस तुझ्यासाठी कविता करत नाही
खर सांगू तुझ्याशिवाय माझी कोणतीच कविता नाही.......

तू प्रेम तर अफाट करतोस
पण ते सांगायला का घाबरतोस???
तुला चांगलं ठाऊक आहे, तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ नाही.......

झाल्या चुका करू माफ एकमेकांना
कारण संसारात आपण दोघेच सोबती एकमेकांना.

तू असाच आनंदी आणि हसत राहा मला आणि काही नको,
आपल्या संसाराला कुणाची नजर ना लागो.....

-



Plz. Read in caption

नवरा आणि बायको
किती गमतीचं हे नातं....

-


20 OCT 2021 AT 13:46

नवरा बायको च्या नात्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे *पुरणपोळी* . *पुरण म्हणजे बायको,* जी पाट्या वर वाटून, त्रास सहन करून, दुसऱ्याला गोडवा देते. संसाराच्या पोळीत स्वतःला लपेटून घेताना स्वतःची ओळख नी अस्तित्व ही जपते. तर *कणकेचा गोळा म्हणजे नवरा,* गोड गोड पुरणाला आपल्यामध्ये सामावून घेणारा, तिला गरम तव्याच्या चटक्यापासून वाचवणारा, गरम तुपाची धार स्वतःवर घेऊन तिला गुलाबी, सोनेरी रंग बहाल करणारा सुद्धा...

-


5 JUN 2020 AT 16:08

सात जन्माचं गं माझं,
तुच सौभाग्याचं लेणं!
जन्मोजन्मी घालीन,
वटवृक्षाला गुंफण!..

-


21 DEC 2020 AT 7:08

संसाररूपी नावेतून वाहणारे वाटसरू आपण,
दोन आयुष्य पण सप्तपदीने बांधलेले आपण,
प्रेमाच्या डोहात मनसोक्त डुंबणारे आपण,
स्वप्नांच्या दुनियेत स्वच्छंद उडणारे आपण..!!
स्वभावात तुमच्या कायम टिंगल अन मस्ती,
मनात मात्र भावी आयुष्य अन जबाबदारीची धास्ती,
आई-बापूंच्या छायाछत्राखाली वाढत गेलात,
लेकरांना अमूल्य ते संस्कारांचं देणं देत गेलात..!!
कुडकूडत्या थंडीत शेकोटीचा निखारा तुम्ही,
आव्हानरुपी आयुष्याचा माझ्या आसरा तुम्ही,
तुमच्यासवे आयुष्य म्हणजे वाळवंटातील पाणवठा,
तिमिराकडून तेजाकडे नेणारा कवडसा एकटा..!!
कधी नकळत येऊन जाते वादाची हलकीच सर,
तुम्हालाच काय मला ही खायला उठते हे घर,
लग्नानंतर हट्ट पुरविणारे तुम्हीच,
चुकले तर न रागावता समज देणारे तुम्हीच..!!
समर्थपणे पेलत जा आयुष्याच्या आव्हानांना,
उत्साहाने साथ देईन तुमच्या भावनांना,
नेहमीच भावतो मला स्वभाव तुमचा कार्यतत्पर,
आयुष्य तर आहेच ठाऊक नसलेल्या प्रश्नाचे उत्तर..!!

-


4 NOV 2020 AT 10:04

आज करवा चौथ आहे...
पण नवऱ्याला चाळनीतून काय बघायचं
जर बघायचंच असेल तर नवऱ्याला नेहमी पाण्यात बघायचं..😊

-


4 AUG 2020 AT 12:54

नवरा....

तो गुपचूप दबक्या पावलांनी येतो,
आणि विस्कटलेलं घर सावरण्याचा प्रयत्न करतो...
अनुभवाने थोडा कच्चा असतो,
पण त्यांनेही घर बांधून ठेवण्याचा चंग बांधलेला असतो.

आई आणि 'ती' , ह्यात तो कायमच अडकलेला असतो,
सार्याचा गुन्हेगार तोच ठरलेला असतो...
एकाच वेळी नवीन आणि जुन्याचा भडीमार तो झेलत असतो,
तो गुपचूप सारं काही सावरण्याचा प्रयत्न करत असतो.

आधी गाडी, मग साडी... सारंच त्याला शिकायचं असतं,
आईचा ड्रायव्हर, तर तिचा डिझाईनर व्हायचं असतं...
नुसतं बाप बनून चालत नाही, आजकाल तर म्ममी पण बनावं लागतं,
हे सगळं शिकताना, कंपनीत लेडी बॉसचा पण तो target असतो.
तो गुपचूप सारं काही सावरण्याचा प्रयत्न करत असतो.

Weekday कंपनीचा आणि weekend फँमिली चा,
ह्यावर शिक्कामोर्तब आधीच झाला असतो.
त्याचा me time हरवून....
तो गुपचूप सारं काही सावरण्याचा प्रयत्न करत असतो.

मित्र म्हणतात तू बदललास,
आई म्हणते तू तिचं मांजर झालास,
तिच्या तक्रारींचा डाटा तर unlimited असतो,
तो गुपचूप सारं काही सावरण्याचा प्रयत्न करत असतो.

कसलीच तक्रार तो करत नाही,
त्याची आवड-निवड तो कधीच सांगत नाही,
सगळे म्हणतात तो कायम लहानच असतो...
तरीही...तो गुपचूप सारं काही सावरण्याचा प्रयत्न करत असतो.

-


18 APR 2020 AT 9:50

मुलगा म्हणजे वडीलांनंतरचा
घराचा आधारस्तंभ असतो
हा मान्य आहे जरा अल्लडपणा करतो
खोड्या जरी काढत असला तरी
जीवही तितकाच लावतो!
मनात मात्र भविष्य आणि जबाबदारी ची धास्ती असते
दिसून येत नाही ती कोणाला
कारण नेहमी खुललेले त्याचे हास्य असते!
वडिलांच्या छायेखाली तो प्रशीक्षित होत असतो
परिस्थितीशी कसं लढायचं हेच तो शिकत असतो..
त्याचा ही पारा चढतो केव्हातरी
जेव्हा खांद्यावर येते कुटुंबाची जबाबदारी
असत ते दडपण भारी...
तरीही साम्राज्य उभं करतो नवं
फक्त परिस्थितीशी लढताना त्याला ही
कुणीतरी समजून घेणार हवं!!

-


16 OCT 2020 AT 23:22

  तू...
तू.. श्वास तू
तू.. जगणंही तू
मला मिळालेलं जीवन तू..
तू.. अंतर तू
तू.. परीघ तू
हृदयावर उमटलेला बिंदू तू..
तू.. हास्य तू
तू.. रडणं तू
काळजात घुसलेला बाण तू..
तू.. क्षण तू
तू.. अमूल्य तू
पारखून घ्यावा असा हिरा तू..
तू.. लय तू
तू.. ताल तू
मनी वसलेला सुर निरागस तू..
तू.. शब्द तू
तू.. काव्य तू
ओठांवरचं गुणगुणतं गीत तू..
तू.. प्रेम तू
तू.. राग तू
रुसलेल्या राधिकेचा कृष्ण तू...
तूच.. माझं सर्वस्व,
तूच.. माझं लेणं,
तूच माझं सौभाग्य...🥰

-