सचिन गोविलकर   (अंतरीचे रंग ✍)
468 Followers · 81 Following

read more
Joined 2 November 2018


read more
Joined 2 November 2018

प्रेमाला त्यागाचा वारसा दाखव
प्रसंग असा एक छानसा दाखव
उन्मळून पडू नको वेड्या सारखा
दुःखाला सुखाचा आरसा दाखव

-



तू खोटे आरोप केलेस माझ्या वरती जेव्हा
तेव्हाच तुझी माझ्या मनातून निर्दोष सुटका झाली

-



मला प्रश्न पडला आहे असा की.,
तुझे उत्तर नक्की काय आहे ?

-



पैशाच्या मागे धावणाऱ्या लोकांना
सुखाच्या सोबत चालता येत नाही

-



तुला पाहण्याचा कसा मोह टाळू
किती बंधने मी स्वतःलाच घालू
तुझे शब्द जेव्हा तरळतात ओठी
सखे सांग तेव्हा कसे मौन पाळू

-



किती वेळा प्रयत्न केला
रोख तिचा मझ कळला नाही
पेटवले मी स्वप्नांना पण,
विचार तिचा जळाला नाही

-



विसरून सर्व झाले गेले
पुन्हा नव्याने सुरवात करू
गुंफू नाते स्नेहाचे अन्
मैत्री अजून घट्ट करू

-



पढ़कर आपको इस कदर

आज जख्म दिल का भरा है

-



कोणी जरी नसले कुणाचे ऋणानुबंध जन्मांतरीचे
कुणी कुणाच्या आयुष्यात असंच सहज येत नसतं

-



शब्दातून नसला तरी मौनातून कळतो
संवाद एकमेकांचा नजरेतून घडतो
क्षणार्धात खुलते कधी गालावर हास्य
कधी या मनाला खूप त्रास होतो

कुणी बोलतात भरभरून समोर
कुणी करतात जन टीका मागाहून
होतात जिथे शब्दांचे प्रहार मनावर
बाजर तिथे रोज भावनांचा भरतो

कोडे शब्दांचे फार अवघड असते
प्रत्येक प्रश्नाला जरी उत्तर असले
कळतात चुका ज्याच्या त्याला इथे
प्रश्न कुणाचा तिथे जगावेळगा नसतो

कधी कोंडतो श्वास हृदयात माझा
कधी गर्जने सहीत व्यक्त होतो
कधी तो भ्रमाचे फोडतो भोपळे
कधी आशा मनाच्या पल्लवित करतो

-


Fetching सचिन गोविलकर Quotes