pooja domale   (©✍️पूजा डोमाळे (राणू))
987 Followers · 488 Following

Joined 31 March 2020


Joined 31 March 2020
23 FEB AT 20:08

बंद कर
सततचे तुझे वार
घायाळ करावं तुला
माझी मुळीच इच्छा नाही

-


23 FEB AT 19:58

तो खळखळणारा आवाज
त्या फेसळणाऱ्या लाटा।
जणू इशाऱ्याने सांगताय
बंद झाल्या तुझ्या वाटा।।

-


19 FEB AT 22:10

पावसाचा थेंबही भेटीच्या
अपेक्षेने जमिनीवर बरसतो
वेड्या, मी तर जिवंत माणूस आहे
माझी अपेक्षा गैर थोडीच असणार

-


19 FEB AT 22:06

कधीकाळी हसरे तिचे डोळे
असतात आता कायम ओले
अश्रू बनून ओघळतात गाली
तर कधी मुरून बसतात नयनी

-


16 FEB AT 14:13

प्रेम
अर्धवट अडीच अक्षरे
अपेक्षा
कशी करावी पूर्ण होण्याची

-


15 FEB AT 13:28

तुझं तू रहा
माझं मी राहील।
तुझा तू चहा पी
माझा मी पिईल।।

-


14 FEB AT 17:53

गाऊ आज प्रेम गीत
Valentine डे च्या निमित्ताने
देऊ सहवासाची वचने
Valentine डे च्या निमित्ताने

भांडलो असेल कालपर्यंत
मागू एकमेकांची माफी
उद्यापासून पूर्वीसारखच वागू
फक्त आज प्रेमाने वागणं काफी

-


7 FEB AT 8:04

असावा प्रत्येक क्षण खास
न व्हावे मी कधीही उदास
येईल लवकरच ती सोनेरी पहाट
झाली असेल पूर्ण माझी आस

-


5 FEB AT 21:47

इवलासा प्रकाश द्या
किंवा सूर्य डोक्यावर आणा
पाषाण होऊनि पडले मी
फक्त मला निजू द्या।

-


5 FEB AT 21:45

जमला आज सगेसोयरांचा मेळा
पाहण्या मजला जो तो उतावळा
जे न आले भेटीस कधी
त्यांनीही बघण्या मला गर्दी केली
हा सारा सोहळा मी बंद डोळ्यांनी
पाहत राहिले....पाहत राहिले...

-


Fetching pooja domale Quotes