दीन दलितांच्या उद्धारा
महामानव अवतरला
जाती भेद नष्ट करूनी
जनकार्याचा वसा घेतला ..!!१!!
आदीवासी बांधवांसाठी
आरक्षणांची मागणी केली
अन्यायाला वाचा फोडूनी
अस्पृश्यंता नष्ट केली...!!२!!
पिढ्यानपिढ्या चालणार्या
रूढी मोडीस काढल्या
होता स्पर्शाने विटाळ
त्यांचे जीवन बाग फूलवल्या.!!३!!
विषमतेच्या गटारीतून
शोषितांना मुक्त केले
महाडचे चवदार तळे
पाण्यासह केले खुले ..!!४!!
गुलामगिरी नष्ट करूनी
बाबा हक्कासाठी लढले
स्वतंत्र समता न्याय बंधुता
संविधानात ठाम मांडले..!!५!!
सखोल अभ्यास करूनी
वैचारिक क्रांती घडवली
दान शिक्षणाचे देऊनी
प्रकाश वाटा फूलवली...६!!
स्त्रीयांचा उध्दार करूनी
ज्योत क्रांतीची लाविली
मोडूनी सर्व रूढी परंपरा
अंधारात दिप लावीली...!!७!!
महामानव युगप्रवर्तक
राज्यघटनेचे शिल्पकार
भारतरत्न अभिमान
थोर बाबासाहेब आंबेडकर.!!८!!
शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️
मुल्हेर बागलाण नाशिक-
जय हनुमंत..
अंजनी सुता पवनपुत्र हनुमान
जय हनुमान जय हनुमंत
राम नाम जप शिव अवतार
जय बजरंग जय हनुमंत...!!धृ!!
मारूती नंदन केसरी नंदन
संकटविनाशक बजरंग बली
बलभीम मारूती जय हनुमंत
रामदूत अवतार बाहू बलशाली..!!
अंजनी सुता पवनपुत्र हनुमान
जय बजरंग जय हनुमंत..!!धृ!!
राम नाम भक्त जय हनुमान
संकटमोचक संकटनिवारण
रामदूलारा केसरीनंदन
जय हनुमंत जय हनुमान..!!
अंजनी सुता पवनपुत्र हनुमान
जय बजरंग जय हनुमंत..!!धृ!!
जो करे भक्ति होय मनोरथ प्राप्ती
रीध्दि सीध्दी दाता जय हनुमंत
जो करे पठन हनुमान चालीसा
भूतपिशाच्च डाकीनीशाकीनी अतं...!!
अंजनी सुता पवनपुत्र हनुमान
जय बजरंग जय हनुमंत...!!धृ!!
ञी लोकांत वीर पवन पुत्र
बाल ब्रह्मचारी जय हनुमंत
माता सिता जय श्री राम भक्त
धन्य धन्य माता अंजनी सुत..!!
अंजनी सुता पवनपुत्र हनुमान
जय बजरंग जय हनुमंत..!!धृ!!
... शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️
मुल्हेर बागलाण नाशिक-
नवरा...
कधी कधी नवरोबाचा
राग अनावर होतो
बायकोवर कारण नसताना
संताप काढत बसतो
भांडण्याचं नेहमी कारण
शोधत असतो
काहितरी कुरापत काढून
दोष दिला देत असतो
नेहमीच बायकासारखा
अबोला धरत बसतो
तीला मात्र आतल्या आत
जळवत असतो
बायकोला कारण नसताना
शिवीगाळ करत असतो
तीचं नेहमी माहेरचं
खानदान काढत बसतो
चेहऱ्यावरचा राग मात्र
दाखवत नसतो
बायकोशी बोलणं टाळून
तीला सतवत असतो
नवरा नवर्याचा अधिकार
गाजवत असतो
बायकोला पायताणं
तो समजत असतो
शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️
मुल्हेर बागलाण नाशिक-
आला उन्हाळा उन्हाळा
आवरा झटपट बायांनो
वाळवणीचे दिस आले
चला सुगरण आयानो
आला उन्हाळा उन्हाळा
सारसामा करूया
उपवासाचे पदार्थ
चकल्या व्हेफर बनवूया
आला उन्हाळा उन्हाळा
करा पापड कूरडया
आया बाया जमा झाल्या
घाट खीसी घेऊया
आला उन्हाळा उन्हाळा
चला गोवर्या धापूया
चूलीपाशी सरपणची
सोय आज करूया
आला उन्हाळा उन्हाळा
गोधड्या शिवूया
हिवाळ्यात ऊबदार
मऊमऊ पाघरूया
आला आला उन्हाळा
सासूरवासीन बायांना
सासूबाईंचा दरारा
नाही विसावा सूनाना
आला उन्हाळा उन्हाळा
आंब्या चिंचा तोडूया
थंडगार कलिंगडचा
चला आस्वाद घेऊया
शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️
मुल्हेर बागलाण नाशिक-
गरीबी...
दिसरात कष्ट करून
घाम गाळायचं
रात्री अर्धपोटी उपाशीच
झोपून घ्यायचं......!!
पोटात कळ येते म्हणून
दातखिळी दाबून घ्यायचं
वेदना कोणाला न दाखवता
तसचं सोसत राहयचं.....!!
चारपै हातावर मिळतील
तोवर काम करायचं
लेकरांना दोन घास
मिळतील म्हणून जगायचं....!!
आगभर कपडं नाहीत
पायाला पायतणं नही
अठरा विश्व दारीद्र्य
कुठवर भोगायचं.....!!
कधी कधी लयी अती होत
जीव नकोसा होतो
बायको पोराकडे पाहून
विचार पून्हा बदलतो....!!
दोष कोणाला द्यायचं
कष्ट करत राहायचं
जोवर जीव आहे
तोवर हायउपस करायचं...!!
पोरांना शाळा शिकवीन
खुप खुप मोठं करीनं
सपान उराशी बांधून
त्यांच्यासाठीच जगीन...!!
शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️
मुल्हेर बागलाण नाशिक-
आला आला उन्हाळा
केला उन्हाळा उन्हाळा
करतो सजीवांची दैंना
तप्त ज्वालाचा हा गोळा
आला आला उन्हाळा
तापला सुर्याचा गोळा
हरवला गारवारा
तप्त उन्हाच्या झळा
आला आला उन्हाळा
आटे नदी नाले तलाव
सुकले वृक्ष वेली सारे
किती तडफडतो जीव
आला आला उन्हाळा
आता येरे पावसाळा
नको करू लाही लाही
आम्हां पावसाचा लळा
... शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️
मुल्हेर बागलाण नाशिक-
पैसा पैसा💰
पैसा पैसा करू नको
पैसा पैसाले जोडस
पैसा पैसा करतसं
पैसा माणूस तोडस
पैसा पैसा करू नको
पैसा पैसा ले ओळखस
पैसा रूपया फेकस
पैसा ये्शीमा फिरस
पैसा पैसा करू नको
पैसा न गाणं वाजू नको
पैसा वर जग सारं
पैसाना मागे फिरू नको
पैसा पैसा करू नको
पैसा नही झोपडात
पैसा राजकारणात
पैसा शेठना बंगलात
पैसा पैसा करू नको
पैसा वर प्रेम नको
पैसानी माणूसकी
पैसा दिसन घेवू नको
शुभांगी म पिंगळे बोरसे ✍️
मुल्हेर बागलाण नाशिक-
उषाकाल होता
पारीजातक सजला
कोवळ्या कोवळ्या स्पर्शाने
पारीजातक मोहरला
सडा शिंपडत
सुगंध दरवळला
अंगणात माझ्या
पारी जातक दरवळला
-
अंधारलेल्या जीवनात
तुझ्या विना पहाट नाही
गंधारलेल्या स्वप्नात
तुझ्या विना गंध नाही-
रामराज्य गेले
आता कलियुग आला
बंधूभाव नाही
कौरवांचा वैरभाव आला
-