सपना अंभोरे  
119 Followers · 1 Following

read more
Joined 16 April 2021


read more
Joined 16 April 2021

हरतालिका...☘️☘️

हे गौरीशंकरा काय मागू तुला
न मागता दिले तू सर्व मला
अनोळखी होतो आम्ही, पण
तू बनवले एकमेकांसाठी आम्हाला

हरतालिका व्रताच्या दिवशी,
आशीर्वाद दे मला
खूप आयुष्य मिळू दे माझ्या धन्याला
माझ्या वाट्याच सुख सुद्धा दे त्यांच्या वाट्याला...

आमचे प्रेम असच निरंतर राहू दे
त्यांचे जीवन कायम निरोगी असू दे
माझ्या नवऱ्याला कायम यश मिळू दे

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
साथ आमची राहू दे
त्यांच्या आधी मला मरण येऊ दे
जन्मोजन्मी त्यांच्या प्रेमाची
ऋणी मला राहू दे

-


10 AUG 2021 AT 13:29

कसं कुठून काळजात शिरतं...
हळूच आपलंसं करतं...
नकळत आयुष्यात येतं...
त्याला पाहण्यासाठी
मन किती तळमळतं...

नजर मिळते तेव्हा,
अचानक धडधडायला लागते...
कधी ही मन त्याच्यात च रमते...
अचानक डोळ्यांची भाषा ही
समजायला लागते...
नाकारले त्यास कितीही तरी,
स्वतः मनच त्याच्या स्वाधीन होते...

-



नको ती शिर्डी, नको जेजुरी, नको ती पंढरी
सारे दैवत आई मध्ये
सांगा मग मी तिथे जाऊ कशाला तरी
आई जपते जशी मला, तसा जपेल का तो हरी
लागले कधी तर आई च्या स्पर्शाने जाते ती जखम हरवूनी
सांगा अस औषध आहे का त्या देवाजवळी
जन्म घेण्याकरी आई चा गर्भ लागे देवालाही,
सांग न देवा, आई आहे ना तुझ्या ही वरी
उग न म्हणे कुणी
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
सांगा बरं यशोदेविना कसा घडेल तो श्रीहरी

-



सांग राजा सांग, गाऊ का मी गाणी
त्यात सांगू का रे आपलीच कहाणी
वाटलं होत यावं माझ्या आयुष्यातही अस कुणी
जो मला माझ्या चुकांसोबत घेईल आपलंसं करुनी

तू येताच वाटलं सार झाले पूर्ण जे जपले होते मनी
प्रेमाची भाषा तूच तर बसवली माझ्या हृदयी
डोळ्यात पाहता तुझ्या जाते रे मी आज ही हरवूनी
पाहता तुला धडधड आणखीन ही वाढते ह्या हृद्यायातली

सांग राजा सांग, गाऊ का मी गाणी
त्यात सांगू का रे आपलीच कहाणी
कधी चिडते, कधी रागावते, कधी भांडते, सगळ घेतो हसूनी
सांग माझ्या हळव्या मनाला तुझ्याशिवाय सावरेल का रे कुणी

-


20 NOV 2021 AT 20:19

Paid Content

-


20 NOV 2021 AT 20:14

Paid Content

-


14 NOV 2021 AT 13:00


ध्यानीमनी नव्हते काही
तरीही अचानक असे घडले
आपली भेट होताच
नकळत प्रेम तुझ्यावर जडले

गुंतले तुझ्यात असे की
मनाला ध्यास तुझेच लागले
तुझ्या मनमुराद बोलण्यावर
हे काळीज तुझ्यावर रोज नव्याने भाळले

हाक मारता तू मला
तुझ्याकडे मी ओढल्या गेले
बघता तू मला, चांदण्या राती
तुझे सुंदर स्वप्न मला पडले

आठवणी होत्या तुझ्या अश्या की
या जीवाचे हाल हाल झाले
हसताच गालात तू सख्या
या हृदयाचे बेहाल झाले

-


21 OCT 2021 AT 14:39

आणि जमतं तरी कसं
असं भाकरी, रेशीम, मोगरा होणं
किंवा पाऊस होऊन कोसळणं
मला जेंव्हा हवं तेंव्हा,
मला जसं हवं तसं…

मी मात्र गृहित धरते
मला हव्या त्या वेळी, हव्या त्या रूपात
तू असशीलच हे
तुला ' नवरा ' नावाचं लेबल लावते,
आणि ' नवऱ्याने असच असायला हवं ' हे मानतच जाते मनोमन

माझं हे मानणं, माझी ही गृहितं, माझ्या ह्या अपेक्षा...
ह्याही तू स्वीकारतोस मनोमन...
अन वागतोसस हे सारं सारं पूर्ण करण्यासाठी
कितीही ओझं वाटलं, कितीही त्रास झाला
तरी तो मला जाणवू न देता

हे सारं सारं जगणं
कसं जमतं रे तुला?

-


21 OCT 2021 AT 14:38

कसं जमतं रे तुला?

एकांत क्षणी प्रियकर होणं...
निवांत क्षणी सखा होणं...
अपयशाच्या क्षणी आई होणं...
अन यशाच्या क्षणी सोबती होणं...

किती बदलतोस भूमिका
किती वेळा, कशा?

कसं जमतं रे तुला?
भूक लागली असता भाकरी होणं,
स्पर्श हवा असता रेशीम होणं,
गंध हवा असता मोगरा होणं,
अन तहान लागली असता पाऊस होणं…

कसं कळतं रे तुला?
मला काय हवंय? केंव्हा? आणि कसं?

-


20 OCT 2021 AT 13:46

नवरा बायको च्या नात्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे *पुरणपोळी* . *पुरण म्हणजे बायको,* जी पाट्या वर वाटून, त्रास सहन करून, दुसऱ्याला गोडवा देते. संसाराच्या पोळीत स्वतःला लपेटून घेताना स्वतःची ओळख नी अस्तित्व ही जपते. तर *कणकेचा गोळा म्हणजे नवरा,* गोड गोड पुरणाला आपल्यामध्ये सामावून घेणारा, तिला गरम तव्याच्या चटक्यापासून वाचवणारा, गरम तुपाची धार स्वतःवर घेऊन तिला गुलाबी, सोनेरी रंग बहाल करणारा सुद्धा...

-


Fetching सपना अंभोरे Quotes