डोळ्यांनीच सांगावी आतुरता तुला पाहण्याची,
जाणशील का गं तळमळ माझी तुला भेटण्याची,
कधी शब्द, कधी स्पर्श, कधी डोळे बोलतील,
आणि सांगतील आजही ओढ आहे तुझ्या एक मिठीची..
-
चिऊ काऊचा घास म्हणून भरवण्याचे दिवस मागे गेले,
'दी....' म्हणून हाक मारणारे हक्काचे कोणीतरी आले,
त्याचा सांभाळ ती आईच्या पुढे जाऊन ही करते आहे,
कारण माझी लेक आता मोठी होते आहे..!!
सावलीसारखी त्याच्या सोबत असते ती,
म्हणतात ना..या प्रेमानेच घट्ट होतात रक्ताची नाती,
आईचा पदर सोडून ती मैत्रिणिंमधे रमते आहे,
असं वाटतंय माझी लेक आता मोठी होते आहे..!!
वागणं,बोलणं याची तिला हळूहळू समज येतेय,
बाळाची कधी 'आई' तर कधी 'मैत्रीण' होतेय,
तिचं असणं माझा आधार बनतो आहे,
खरंच माझी लेक आता मोठी होते आहे..!!
तिच्या इवल्याश्या डोळ्यात तिने स्वप्न पाहिलीत मोठी,
अन् महत्वकांक्षी वृत्तीने ती त्यांचा ताळमेळ लावती,
जन्मजातच असतो ना त्यांच्यात इतका समंजसपणा,
तरी तू आमची छोटीशी बाहुलीच अशी वेडी कल्पना..!!
इतक्यात कशी ग तू मोठी झालीस?
आई-बाबांकडे तुझ्या तू हट्ट ही करेना झालीस,
दुडू दुडु धावणं,बागडणं विसरणी पडलंय आता,
मान्य आहे की आमची लेक मोठी होते आता..!!
मायेत तिच्या जाणवतो प्रेमाचा ओलावा,
म्हणून तर वाटतं डोळ्यात दुःखाचा टिपूस ही नसावा,
सूसंस्कारातून तिच्या विचारांना बळ मिळते आहे,
हो ..! माझी लेक आता मोठी होते आहे..!!-
चिऊ काऊचा घास म्हणून भरवण्याचे दिवस मागे गेले,
'दी....' म्हणून हाक मारणारे हक्काचे कोणीतरी आले,
त्याचा सांभाळ ती आईच्या पुढे जाऊन ही करते आहे,
कारण माझी लेक आता मोठी होते आहे..!!
सावलीसारखी त्याच्या सोबत असते ती,
म्हणतात ना..या प्रेमानेच घट्ट होतात रक्ताची नाती,
आईचा पदर सोडून ती मैत्रिणिंमधे रमते आहे,
माझी लेक आता मोठी होते आहे..!!
वागणं,बोलणं याची तिला हळूहळू समज येतेय,
बाळाची कधी 'आई' तर कधी 'मैत्रीण' होतेय,
तिचं असणं माझा आधार बनतो आहे,
माझी लेक आता मोठी होते आहे..!!
तिच्या इवल्याश्या डोळ्यात तिने स्वप्न पाहिलीत मोठी,
अन् महत्वकांक्षी वृत्तीने ती त्यांचा ताळमेळ लावती,
जन्मजातच असतो ना त्यांच्यात इतका समंजसपणा,
तरी तू आमची छोटीशी बाहुलीच अशी वेडी कल्पना..!!
इतक्यात कशी ग तू मोठी झालीस?
आई-बाबांकडे तुझ्या तू हट्ट ही करेना झालीस,
दुडू दुडु धावणं,बागडणं विसरणी पडलंय आता,
मान्य आहे की माझी लेक मोठी होते आता..!!
मायेत तिच्या जाणवतो प्रेमाचा ओलावा,
म्हणून तर वाटतं डोळ्यात दुःखाचा टिपूस ही नसावा,
सूसंस्कारातून तिच्या विचारांना बळ मिळते आहे,
माझी लेक आता मोठी होते आहे..!!-
भावनाधीन जरी मन तरी व्यक्त कुठं होता येतं,
कुटुंबाची काळजी घेता संतप्त कुठं होता येतं,
या वयातही इतका उत्साह पाहून मन हरखून जातं,
तर कधी तुमचं फक्त असणं ही गरजेचं वाटतं..!!
लग्नानंतर मला मिळालेले नव्या घरातील दातृत्व,
सक्षमतेने साथ देणारे पण हळवे व्यक्तीमत्व,
सर्वस्व पणाला लावून होताय छत्राची सावली,
आजच्या दिवशी तुम्हाला जन्म देणारी धन्य ती मायमाऊली..!!-
आयुष्याला आमच्या एक वेगळं वळण लागलं,
तिने सर्वाना एक नवं नातं देऊन घराचं नंदनवन केलं,
दमलेल्या शरीराला उत्साही बनवतो तिचा आवाज,
ती तर आहे या घरातला लाख मोलाचा सावज..!!
ती करते घरातील काळजी आणि हक्काची विचारपूस,
तसा उत्साह अन नवनवीन गोष्टी शिकण्याची तिला भारी हौस,
घरातील या परीचे सर्वांकडूनच होत असते कौतुक,
लाडा-कोडात वाढणाऱ्या लेकीचे लाड पुरवले जातात आपसूक..!!
मनासारखं व्हावं म्हणून तिची अन जयची सतत कट्टी,
पण एकमेकांवर जीव इतका की लगेच होते बट्टी,
दुःखात दिसता कोणी निघतो हिचा ममतेचा सूर,
गोड अशा लेकीची पाठवणी करताना कोणाचाही भरून येईल ऊर..!!
तिच्याविना घर-दार ही वाटेल सुने,
तिच्या हसण्या, बागडण्याच्या आवाज कुठून येईल कोण जाणे,
कर्तृत्व पाहुनी तिचे धन्य होऊ आम्ही मायबाप,
शेवटी लेकीचाच असतो प्रेमाने गोंजारणारा हात..!!-
अवघी सृष्टी जिच्यावर तरली व्यक्तिमत्त्व तिचे मातृतुल्य,
तरीही तिला अडवतात काही पुरुषी मूल्यं,
शतकानुशतके 'महिला सबलीकरण,सक्षमीकरण'मिरवली जाते पाटी,
तरीही असुरक्षित 'ती' हीच समाजाची वस्तुस्थिती..!!
स्त्रीशिक्षण म्हणजे नाही फक्त कौशल्यप्राप्ती,
संधी मिळाली तर आजमावून पहा तिची निर्णयशक्ती,
जिजाऊ-सावित्रीच्या लेकी अशी संबोधने मिळतात तिला,
पण पुरुषप्रधान संस्कृतीच्या बंधनांनी आजही बांधलंय तिला..!!
निर्भीड होऊन प्रत्युत्तर मिळावे असो कितीही शोषण,अत्याचार,
सक्षम होऊन दाखव स्त्री एक धगधगता अंगार,
एकीकडे समाजही तिच्याकडून हीच ठेवतो अपेक्षा,
कारण कधीकाळी यानेच अशिक्षित, अबला म्हणून केली होती उपेक्षा..!!
जगावे तिने ठेऊन नैतिकतेचे भान,
आणि असावी स्रीस्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मातांच्या बलिदानाची जाण,
तुझ्याशिवाय कोणातच नाही इतकं वात्सल्य,
आणि तूच आहेस घरापासून पूर्ण सृष्टीचं मांगल्य..!!-
अवघी सृष्टी जिच्यावर तरली व्यक्तिमत्त्व तिचे मातृतुल्य,
तरीही तिला अडवतात काही पुरुषी मूल्यं,
शतकानुशतके 'महिला सबलीकरण,सक्षमीकरण' मिरवली जाते पाटी,
तरीही असुरक्षित 'ती' हीच समाजाची वस्तुस्थिती..!!
स्त्रीशिक्षण म्हणजे नाही फक्त कौशल्यप्राप्ती,
संधी मिळाली तर आजमावून पहा तिची निर्णयशक्ती,
जिजाऊ-सावित्रीच्या लेकी अशी संबोधने मिळतात तिला,
पण पुरुषप्रधान संस्कृतीच्या बंधनांनी आजही बांधलंय तिला..!!
निर्भीड होऊन प्रत्युत्तर मिळावे असो कितीही शोषण,अत्याचार,
सक्षम होऊन दाखव स्त्री एक धगधगता अंगार,
एकीकडे समाजही तिच्याकडून हीच ठेवतो अपेक्षा,
कारण कधीकाळी यानेच अशिक्षित, अबला म्हणून केली होती उपेक्षा..!!
जगावे तिने ठेऊन नैतिकतेचे भान,
आणि असावी स्रीस्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मातांच्या बलिदानाची जाण,
तुझ्याशिवाय कोणातच नाही इतकं वात्सल्य,
आणि तूच आहेस घरापासून पूर्ण सृष्टीचं मांगल्य..!!-
संथ पाण्यात फेकलेला दगड आणि त्याने उठणारे तरंग,
तसेच येणारे आयुष्यातील सुख दुःखाचे प्रसंग,
आपल्या नात्याइतकं काहीच नाही माझ्यासाठी प्रांजळ,
साथ आहे एकमेकांना असेल कशीही वेळ..!!
सात जन्माचा जोडीदार म्हणून जीवनात आलात,
कळलं नाही कधी पण काळजाचं स्पंदन झालात,
दिवसेंदिवस घट्ट होत आहे या नात्याची वीण,
नाही फिटणार त्या ईश्वराचे माझ्यावरील ऋण..!!
संकटात जरी मी झाले हतबल,
'मी आहे' या शब्दांनीच मला दिलंय बळ,
विरुद्ध असला स्वभाव तरी घालून समेळ,
संसार रुपी प्रपंच पार पाडू अगदी चोखंदळ..!!-
आठवणीतून तुझ्या मुक्त होता येत नाही,
काय करू मी? तुझ्याजवळ व्यक्त ही होता येत नाही,
कशी समजूत काढू या वेड्या भावनांची?
सैरभैर हे मन तुझ्याशिवाय कशात व्यस्त राहत नाही..!!
-
काळी आई रुसलेली अन निसर्गाने पाठ फिरवलेली असायची,
कधी भाकरी तर कधी राणभाजी खाऊन रात्र काढायची,
असा होता तुमच्या बालवयाचा टप्पा,
त्या आठवणींनी अजूनही हळवा होतो
मनाचा कप्पा..!!
आज्जी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची पाईक होती,
स्वाभिमानाने जगावी लेकरे
एवढीच तिच्या मनाची इच्छा होती,
कष्ट, सत्कर्म याची कास धरून इथपर्यंत आलात,
सद्गुणांची किंमत सांगून आम्हाला वाढवलात..!!
आयुष्य कधी सरळ तर कधी वळणावळणाचा घाट,
मात्र तुम्ही बिकट प्रसंगी दाखवली संयमाची वाट,
बोलावंसं वाटत नाही अशी तक्रार करू नका थेट,
विसरली नाही पण संसारात गुंतलीये तुमची लेक..!!
मोकळा होता मन्मनीचा गाभारा बालपणीचे दिवस उभे ठाकतात,
सुख-दुःखाचे, हसण्या-रडण्याचे सारे सारे क्षण आठवतात,
आणि पुन्हा एकदा तेच लहानपण जगण्यासाठी,
पप्पा! आजही तुमच्याकडून हट्ट पुरवून घ्यावे वाटतात..!!-