अथांग अशा विश्वात, होतोच मी हा एकटा..
कुणी नव्हते सोबती, नव्हता साथीला वाटा...१
नव्हता साथीला वाटा, द्यावा वाटायचा तरी..
खारीचा का तो होईना, असो सुख दुःख जरी...२
असो सुख दुःख जरी, कवटाळू नये फार..
जसे लाभले जीवन, सुखाने उघडा दार...३
सुखाने उघडा दार, येणाऱ्या साऱ्या क्षणाला..
हास्य फुलवावे सदा, सुगांधापरी ह्या जगाला...४
सुगंधापरी ह्या जगाला, अनुभववावे रंग..
उधळावे प्रेम फक्त, नको जीवन बेरंग...५
नको जीवन बेरंग, मिळाला हात साथीला..
अवघं विश्व दिसतं, एकमेका सोबतीला...६
एकमेका सोबतीला, बहरेल हे आयुष्य
अनाथ होत घडलो, आता उजळे भविष्य...७-
पण जे वाटलं ते उमटलं कागदावरी..
कागदाचीच साथ ही लाभली,
अन् निळ्... read more
काही तरी सुचतं, थोडंसं काही रुजतं..
कागदावर नाही उमटवलं, तर कुठे तरी विरतं...
वाटतं मनी तरी असेल, पण तिथेही नसतं..
विचार केला जरी, हृदयात तरी कुठे साठतं..??
मनातल्या मनात, अंतर्धान पावतं..
वाटत राही एकसारखं, कुठे तरी गोठतं..
फार आढेवेढे घेतं, लिहितानाही पुसट होतं..
सुचले काही म्हणता, कुठे तरी आटतं...
असंच हल्ली काहीसं, काव्य स्फूरताना होतं..
जे जे वेचलेलं शब्दवेचिकेनं, धुकं धुकं होत जातं...-
वैताग आलाय सगळ्याचा..जगण्याचा,
नाही ठेवणार कुणावरच ठपका..
मेल्यानंतर तरी सांगा,
मिळेल मला मुक्ती का..?????????-
चाफा! चाफा! चाफा! चाफ्याचा दरवळतो गंध
उगा कशाला देऊ लक्ष कोणाकडे,
मी तर माझ्या माझ्याच विश्वात दंग...-
आज मना तुफान वाऱ्याशी बोलतो आहे,
तोही अंतरातले गूज कुजबुजतो आहे...
घे समजुनी तूच मना त्याचाच खेळ सारा,
सांगताना तो जरा फडफडतो आहे...
कवेत घेतलंय त्याने विश्व सारं सहजच,
तू ही तसाच हो मना असाच सूर ओढतो आहे...
गवसणीच घातले त्याने त्याच्याच कैक रूपांनी,
तू ही दिसशील एकदा तसाच ठसा दिसतो आहे...
बघ मना! तुझीही लेखणी ऐकतील कानांनी,
मनात तुच, हृदयात कांत सर्वत्र वसतो आहे...-
माझी पहिली कविता, होती ती निसर्गावरी..
दऱ्या डोंगरांचा साज, कोरला कागदावरी...
लिहिलेली उत्साहाने, माझी पहिली कविता..
निसर्गाच्या ममत्वाने, भरलेली ही सरिता...
सूर जुळले तेव्हाच, अनमोल ह्या शब्दांशी..
माझी पहिली कविता, मी बाळगली उराशी...
झालेली प्रकाशमान, जणू वाटली सविता
हृदयाच्या जवळच, माझी पहिली कविता...-
जो चला गया वो चला गया,
खुद की सांसों को रोक कर,
दूसरों के प्राण जीते जी ले गया...
जो चला गया वो चला गया,
खुद अग्नि में स्वाहा हो कर,
दूसरों को पश्चाताप की दाह में लिटा गया...
जो चला गया वो चला गया,
देह पर अनदेखे दाग रख कर,
दूसरों पर न सहनेवाली निशान छोड़ कर चला गया...
जो चला गया वो चला गया,
खुद सोस से राहत पाकर,
अफसोस को हाथ में रख कर चला गया...
जो चला गया वो चला गया,
खुद मिट्टी में समेट कर मिट्टी में मिल कर,
दूसरों को गुनाहगार के कठघरे में सुला कर चला गया...-
बादलों सी ऊंची उड़ान हैं मेरी,
सपनों ने तो छू लिया हैं आसमान..
अब किसी की लग जाए ना नजर,
आँधी से क्या डर, कब के गुजर गए हैं तूफान...-
ओळख तुझी
वाढते ओढ
मनी रुंझी....
ओठात गाणी
हृदयी गोड
मधु वाणी....
तुझ्याच स्मृती
येतात किती
माझ्या उरी....-