नवीन गणवेश धारण करायचे,
चिखलामध्ये पाय ठेवत चालायचे,
पाठीवर नवीन दप्तर घ्यायचे,
अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.
कोणालाही न बोलता शाळेत यायचे,
हात जोडून, डोळे बंद करून प्रार्खना म्हणायचे,
मधल्या बाकावर गुपचुपपणे बसायचे,
अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.
नवनवीन पाठ्यपुस्तक घ्यायचे,
त्याच्याच सुगंधात दरवळायचे,
त्यातील चित्रे पाहत बसायचे,
अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.
दुपारच्या सुट्टीत सरकारी भात खायचे,
त्या हापस्याचे घोटभर पाणी प्यायचे,
एखाद्या मित्रासोबत वर्गात यायचे,
अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.
शेवटी वर्गात बसुन घराची आठवण काढायचे,
एकमेकांकडे बघुन खुप-खुप रडायचे,
घंटा वाजल्यावर घरी पळत सुटायचे,
अन् शाळेचा पहिला दिवस घालवायचे.-
शाळेच्या पहिल्या दिवशी
एक मुलगी मला दिसली,
नजरेत नजर मिळाली
ती मुलगी मनात बसली.
वर्ग सुरु होताच मला
बघून ती हसली,
मी दिसाव म्हणून मैत्रीनी
जवळ जाऊन बसली.
वही मागण्याचे कारण काढुन
जवळ येऊन ती बसली,
मैत्रीची चिठ्ठी लिहून
वहित ठेऊन मला दिसली.
मी बघताच तिला
नजर चुकवतांना दिसली,
अश्याच भेटीगाठीनी
मैत्री जमली बघा कसली.
एक दिवस ती उशीरा
शाळेत पोहोचली,
जागा मिळाली नाही म्हणून
रुसून मागे बसली.
कस समजाऊ तिला यात
माझी चुकी नाही कसली,
नखरेल ती फार
रागात आली कसली.
साँरी म्हणाव म्हणून
रुसून ती बसली,
आणि मित्र म्हणायचे मला
ही देखनी मुलगी तुला कशी फसली.
काहीही असो राव
अशी मज्जा नाही कसली,
अनोख ते प्रेम अशी
दुनियादारी नाही कसली.
-
सांग सांग भोलानाथ,कोरोना जाईल काय ?
परिस्थिती सुरळीत होऊन,शाळा सुरु होईल काय ?
भोलानाथ मास्कच राज्य जाईल काय ?
मित्रमैत्रिणींबरोबर डबा खायची मजा घेता येईल काय ?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा,
आठवड्यातला रविवार गायब होऊन सोमवार येतील का रे तीनदा ?
भोलानाथ कोरोनाला लवकर हाकलता येईल का ?
शाळेत जाऊन शिक्षकांकडून ज्ञानामृताची चव नव्याने चाखता येईल का ?
भोलानाथ आमची ऑफलाईन शाळा सुरु होईल का ?
शिक्षकांसमोर बसून जोमात पेपर देता येतील का ?
भोलानाथ जादूच वरदान मिळेल का ?
पापणी माझी लवेपर्यंत कोरोनाला गायब करता येईल का ?-
कोरी पाटी,मनात धडकी
वेळेवरती पोहचण्याची..
लगबग नुसती आई मागे
उत्सुकता शिक्षकांना भेटण्याची..
एक वही नवीन दप्तरात
जुन्या धाग्यांनी बांधलेली..
ओढ भारी मनात रुजलेली
पुस्तकं नवीन वाचण्याची..
गंध घेता नवीन पुस्तकांचा
मन भिरभिरतच स्वप्नांत हरवे..
चालू होई दिनक्रम वर्षभराचा
मनी बाळगुणी स्वप्न नवे..
-
आवडायची खूप शाळा, पण जायचं जिव्हारी यायचं.मी रडलो मला नाही जायचं ,शाळेत कारण सगळे मूल खेळायला घरी मग कसा जाणार मी एकटा त्याना सोडून.. रडायला लागलो , जमिनीवर लोटांगण घेतलं नागीण डान्स सारखं.. माझे आबा खूप लाड करायचे माझा त्या दिवशी अचानक त्यांचा अंगात गब्बर आला , इतकं मारलं न मला ,मारत मारत शाळेपर्यंत नेलं खाली बसलो की घासत घासत नेलं तरीही शाळेत नेलं..म्हणून तो दिवस मी कधीच विसरणार नाही आयुष्यातील माझा मार खाण्याचा आणि शाळेत जाण्याचा पहिला दिवस...
-
शाळेचापहिलादिवस
माझा शाळेचा दिवस तर दुसरी पासुन चालू झाला.ताई दुसरी ला होती आणी मी पण तिच्या सोबत दुसरितच जायचो..सर मला काढून द्यायचे पण मी रडत रडत घरी येऊन बाबा ला घेऊन जायचो आणि दुसरी लाच बसायचो ..
मी अंगणवाडी आणी बालवाडी त कधीच नाही गेलो ...शेवटी कंटाळून बाबांनी 4.5 year चा असतांना पहिलीत टाकलं.म्हणून तर माझे जन्मदिवस दोन आहेत....
शिक्षणासाठी रडलो नाही आणि मार आठवत नाही...पण रिकाम्या कामासाठी नेहमी च मार खाण्यासाठी पुढे असायचो..
शाळेत पहिल टोपण नाव मिळाल मनुलकर सरांकडून -तु तु क
College ला -T.T/scientist
Degree la -कवी/राजे
🤣🤣🤣🤣🤣-
हाती पुष्पगुच्छ देऊन
स्वागत त्या लाडुल्यांचे
शाळेच्या प्रवेशात्सुक विद्यार्थ्यांनी
नमन केले शिक्षकांचे
सुंदर रांगोळी अन् फुगाची आरास
तुमच्या स्वागतासाठी सारे खास
बालगोपालांचा सजला मेळा
शाळेभावती झाला गोळा
घंटा पाहिली होईल शाळेची
नवी खुमारी पहिल्या दिवसाची
पुस्तके नवी पाटी नवी
आई दप्तर व छत्रीसुद्धा घेऊन दे ना नवी
हट्ट सुरु बालकांचा
सुंदर हवा असा कल्ला शाळेचा .-
सकाळ सकाळ रडून रडून
सारे घर डोक्यावर उचलून घेतले होते...
मनात नव्हते माझ्या तरी आई बाबांनी
मला शाळेला धाडले होते...
नवीन कोरे कपडे, गळ्यात बॉटल
खिशाला रुमाल अन् पायात बूट घातले होते...
बोबड्या माझ्या बोलानी सारे
शिक्षक च फॅन झाले होते...
डोळ्यातले अश्रू आता
थांबले होते...
बाईंच्या खेळाने मन माझे
आनंदून गेले होते...
नव नवीन मित्र मैत्रिणी
मला आज भेटले होते...
फिकीर नव्हती कोणाची आता
कारण मन आता माझे शाळेत रमले होते...
शाळेच्या पहिल्या दिवसात
प्रेम शाळेवर मला झाले होते...
-
शाळेचा पहिला दिवस हा खास असतो.
मिळालेले नवीन चेहरे आयुष्याचा भाग बनतो.
पहिल्याच दिवशी मिळालेली पाटी पुस्तके हृदयाशी लावतो.
त्या नवीन पुस्तकांचा घेतलेला सुगंध मनी दरवळतो.
त्या दिवशी मिळालेला आनंद काही वेगळाच असतो.
-
पंन्नास पाच वर्षांपूर्वी चा
आठवतोय शाळेतला
पहिला दिवस.,....
भोकाड पसरून मोठ्यानं
मी ही आलो शेंबूड पुसत
गुर्जी होते दारात उभे
माझ्याकडे बघून मिशात हसत
मधल्या सुट्टीत धिंगामस्ती
पाटी गेली फुटून
घरी आली स्वारी मग
डोळे पुसत पुसत-