हातात भरपूर पाणी घेतलं तरी
काहीच क्षणात ते केवळ ओंजळभर उरतं
हे जेव्हा माणसाला उमगतं
तेव्हा आयुष्य खूप सुंदर होतं-
क्षण क्षणिक असतात अन् आठवणी अमर
हे जेव्हा माणसाला उमगतं
तेव्हा आयुष्य खूप सुंदर होतं-
मनमोही या दुनियेत नेहमीच सर्वांशी
अवकाश अंतर ठेवून राहावं
कारण नेत्रसुद्धा स्वतःसमोर वसलेल्या
नाकाला झिडकारून पुढे पाहत राहतात-
आनंदाचे पडत आहेत सडे
आयुष्य आता मनमोही फुलांसह बहरणार...
हातात येणार स्वप्नातल्या राजाचा हात
अन् राणी आता मनापासून सुखावणार...-
हरएका जन्मात तो
तुलाच देवाकडे मागेल...
आपसूकच तुझ्या नावापुढे
त्याचं नाव लागेल...-
गोड माझी राणी तु,
मोकळा तुझा स्वभाव...
निस्वार्थ मैत्रीचं आपल्या,
नातं असंच रहावं...
आपली लास्ट बेन्चर्स ही ओळख,
आजही मनास सुखावते...
मिश्कील तुझं हास्य,
मैत्रीला आपल्या फुलवते...
मनातले विचार तुझ्या,
अलगद कागदावर मांडतेस...
कायम तु बोलताना मला,
निर्मळ प्रेमभाव सांडतेस...
अतुट आपल्या मैत्रीची वीण,
कायम अशीच बहरुदे...
गोडवा या नात्यातला
कायमच असा फुलुदे...-
विचारांच्या मुक्तांगणी
सद्विचाराला कवेत घेतो...
दुष्ट विचारांना सारून बाजूस
योग्य विचारच बहरवतो...
मोगऱ्यासम स्वभावामुळे
जागोजागी दाटला परिमळ...
अधीराच्या हास्यसुमनांचा
बहरवतोस तु दरवळ...
सुखासी बोचते दुःख
अन् दुःखास सुख...
समाधानाची खिरापत वाटतो
पाहण्या तेजस्वी मुख...
बोलण्या नसते बंधन
साऱ्याच भावनांचा जाणकार तु...
अबोल मनकळीचे भावसुमन ओळखणारा
चिमुकल्या जीवाचा आधार तु...-