Netralipi
-
📔writer | Publisher | stories📒 poetry
🌍The ... read more
मैत्री
कधी लबाड, तर कधी महान, सख्या-परक्याचा भेद नसलेला श्वास..।
प्रकाश-काळोख्याचा विचार न करता जळणारी जोत...।
मैत्री
जशी वसुंधरेला असलेली चंद्राची अतुट साथ..।
कधी अमावस्या तर कधी पोर्णिमेचा भास..।
मैत्री
रोवलेल्या बीजातुन फुललेल नव अंकुर..।
अंकुरातील कोवळ्या दोन पानातून बहरलेल रोपट..।
मैत्री
भावनेच्या साहित्यानी कोरलेली कला..।
ह्रदयातील अस नक्षीकाम तुटता न तुटनार..।
मैत्री
संगतीने बदलनार, घडनार व्यक्तिमहत्व..।
एक असा आरसा जिथे दिसतो सत्याच, खोट्याच प्रतिबींब..।
मैत्री
नात्याच एक बंध ह्रदयाच एक गोड नात..।
एक अनोख काव्य, चार शब्दात व्यक्त न होनारी व्याख्या..।
-
~{माझे घर}~
नात्याचे हात जुळूनी,
स्वप्नांना आनंद मिळाले।
कालचे ते आडोश्यातले,
शब्द कानी पडू लागले।
आज हे बंद दरवाजे,
आनंदाने हसू लागले।
चार भिंती झुरमुरल्या,
आपुलकीने खेळू लागले।
तुटला तो एकांतवास,
माझे घर माझे झाले।-
मनातल्या शब्दांनी
दबलेल्या सुरांतील
क्षणभर रुजलेल्या
आठवणीतील साठलेला
वारा...
आतला आवाज
-
दाटलेल्या मनाला सावरुन
आजही निष्ठेने जगते ती..
जनव्यापी तिरस्कृत स्वभावात
स्वतःचे सामर्थ्य बघते ती..
रोज बघणाऱ्या घृणास्पद
नजरेला स्वतः अनुभवते ती..
या असुरक्षित जगात
टीकेत न्हाहते ती...
काय रे तिचा दोष, कुणाची
बहिण, आई ,पत्नी, मुलगी ती..
एक निर्दोष स्त्री तरी
बलात्काराचे रूप बघते ती..
खरचं स्वतंत्र आहे का ती...?-
शाळेच्या पहिल्या दिवशी
एक मुलगी मला दिसली,
नजरेत नजर मिळाली
ती मुलगी मनात बसली.
वर्ग सुरु होताच मला
बघून ती हसली,
मी दिसाव म्हणून मैत्रीनी
जवळ जाऊन बसली.
वही मागण्याचे कारण काढुन
जवळ येऊन ती बसली,
मैत्रीची चिठ्ठी लिहून
वहित ठेऊन मला दिसली.
मी बघताच तिला
नजर चुकवतांना दिसली,
अश्याच भेटीगाठीनी
मैत्री जमली बघा कसली.
एक दिवस ती उशीरा
शाळेत पोहोचली,
जागा मिळाली नाही म्हणून
रुसून मागे बसली.
कस समजाऊ तिला यात
माझी चुकी नाही कसली,
नखरेल ती फार
रागात आली कसली.
साँरी म्हणाव म्हणून
रुसून ती बसली,
आणि मित्र म्हणायचे मला
ही देखनी मुलगी तुला कशी फसली.
काहीही असो राव
अशी मज्जा नाही कसली,
अनोख ते प्रेम अशी
दुनियादारी नाही कसली.
-