अखंड राज्य जिंकुनही सत्तांतराची झाली सुरूवात,
प्रकाशाच्या साम्राज्यावर केली काळोख्याने मात,
परतण्यासाठी पुन्हा मिटवतोय तो अंधाराची भास,
आज सुर्यास्तालाही लागली होती सुर्योदयाची आस !-
• जे सुचेल ते मनसोक्त लिहीणे,
माझ्या शब्दाने तुमच्यावर रा... read more
आरोप करण्याअगोदर विचार करावा, बाकी जगाची परिस्थिती पहावी; अन्यथा आरोप करणाऱ्यांची नव्हे तर ज्याच्यावर आपण आरोप करतोय त्यास खुप काही गोष्टी सहण कराव्या लागतात. शेवटी चोर सोडून सन्यासाला सुळी देणे !
-
जेव्हाही मी तिला प्रत्येक ठिकाणी पाहिलोय,
प्रत्येक क्षणी मी फक्त तिलाच पाहत राहिलोय,
माझ्यातल्या कवीला तिच्यामुळेच मी शोधलोय,
कितीही झाले तरी तिच्याच प्रेमात मी वेडा झालोय !-
समोर उभा असलेल्या मृत्युला थांबऊन रणांगण मी गाजवलयं,
तेच रणांगण माझ्या रक्ताच्या शेवटच्या बिंदुने रंगवलयं,
महायोध्दा असुनही त्या चक्रव्युहामध्ये मला फसवलं गेलयं,
मी हे महायुध्दा कधीच हरलो नाही तर मला हरवलं गेलयं !-
नाही भेटले आम्हास कौशल्य ना नाही कमवता येतो पैसा,
नोकरी शोधण्या सगळीकडे भटकतोय प्रमाणपत्रांचा ठसा,
न समजाऊन घेता काही नाईलाजाने लेक्चर्स आम्ही करतोय,
नंदीबैलासारखे बसुन फक्त ७५% ॲटेंडन्स आम्ही भरवतोय !-
जगाला पोषणारा दानशूर राजा, आयुष्यभर कर्जाचे हफ्ते फेडणारा, रात्रंदिवस पाऊसाची आणि विजेची वाट पाहत रान कसणारा, अवकाळी पाऊसात सर्वस्व गमावणारा, स्वतः उपाशी राहुन मुक्यांना जगवणारा आणि जुन्या कपड्यांवर सणउत्सव साजरा करणाऱ्या शेतकऱ्याने कोणाकडे पेन्शन मागावे ?
सहज पडलेला एक प्रश्न !-
कथा जश्या निर्माण करता येतात अगदी त्याच पध्दतीने व्यथाही निर्माण करता येतात, व्यथा निर्माण करणाऱ्यांनासुध्दा व्यथा भोगाव्याच लागतात. शेवटी कर्म !
-
सोबत नाही ती माझ्या परंतु जाणवते तीचे अस्तित्व,
प्रत्येक यशामध्ये असते व असणार तीचे कर्तुत्व,
प्रत्येक पुस्तकामधुन ज्ञान देते ती माझा आई,
ए आई, आठवण तुझी भासे मज ठाई ठाई !-
रावणास दहण करायला निघाले लोक बदलून स्वतःचा वेश,
असत्य व अन्यायासोबत दोस्ती करून होत नाही महान देश !-