लिहिताना मला आता कागदाची गरज च भासत नाही, कारण तुझ्या वर लिहायला कागदच पुरेसा वाटत नाही....!
पाहताना तुला आता डोळ्यांच्या पापण्या ही लवत नाही, कारण तुझ्या प्रेमात मन ही भरू वाटत नाही.....!!-
सूर्योदयाचा सूर्य उदयास येत असतो,
एक नवीन आशा एक नवीन संकल्प घेऊन......!
अनं मावळीतीचा सूर्य अस्तास जातो,
मनात नवीन चेतना आणि डोळ्यात नवी उमेद ठेऊन......!!
-
आयुष्यभर तिने दिलेल्या
तिच्या प्रेमाचे मोजमाप मी करू कसे?
हृदयात दडवलेल्या तिच्या गोड
आठवणींचे तोलभाव मी लावू कसे?
डोळ्यात तिने माझ्या पाहिलेल्या
तिच्या स्वप्नांचे घर मी बांधू कसे?
वेळी अवेळी मला तिने केलेल्या
तिच्या मदतीचे उपकार मी फेडू कसे?
सांग ना उपकार मी फेडू कसे?.......-
त्यांच्या डोळ्यात स्वराज्य होतं,
त्यांच्या रक्तात स्वराज्य होतं,
त्यांच्या धमण्यात स्वराज्य होतं,
त्यांच्या स्वप्नात स्वराज्य होतं, त्यांच्या मनात स्वराज्य होतं,
त्यांच्या अस्मितेत स्वराज्य होतं,
त्यांच्या प्रतिमेत स्वराज्य होतं,
त्यांच्या मावळ्यात स्वराज्य होतं, त्यांच्या भगव्यात स्वराज्य होतं,
त्यांच्या हृदयात स्वराज्य होतं,
असं माझं राजं श्री श्री शिवछत्रपती होतं......🚩🙏
🚩जय जिजाऊ 🚩
🚩जय शिवराय 🚩🙏-
कळत नाही का रात्रीचे चांदणे ही कधी कधी फितूर भासते...!
घालमेल झालेल्या मनाचीही दैव परीक्षा बघत बसते...!
कळत नाही का हे जगणेच कधी कधी नकोसे वाटते...!
पण लेखणी उचलली की जीवात एक नवी उमेद जागते...!!-
नाचण्यात दंग
विठ्ठला संग
उधलूनी रंग
सारे तूझ्या पाई!!
भक्तीत गुंग
भजनी मृदुंग
किर्तनी श्रीरंग
सारे विश्व तुझे ठाई!!
जय हरि विठ्ठल 🙏🚩-
दूर या वाटेवरी शोध,
तो अस्तित्वाचा...!
आकाशात घेई भरारी,
मन हा छंदित्वाचा...!
ऊरी दाटे हुरहुरी,
अट्टाहास हा पूर्णत्वाचा...!
शांत अशांत रात्री प्रहरी,
हा खेळ हा चांदण्याचा....!!!
-
तू शांत अवखळ अशी नदी आणि मी फेसळणाऱ्या लाटानी नटलेला समुद्र.....
तू चमचमती चांदणी आणि मी शांत शितल चंद्र.....
तू दरवळणारा पारिजात आणि मी त्या सुगंधात मग्न होणारा फुलपाखरू....
तू माझ्या प्रवासातला सोबती आणि मी तुझ्या सोबत फिरणारा एक वाटसरू.....-
तुझ्या हातचा चहा म्हणजे,
तुझ्या हातचा मायेचा गोडवा....
जसं पाऊस आणि तुझी सोबत,
संगे प्रेमाच्या तुझ्या ओलावा....!!
-
तू असावी कविता माझ्या प्रेमाची,
अन् मी शब्द तयाचे....!
तू असावी धडधड माझ्या हृदयाची,
अन् मी कंपन तयाचे....!!
तू असावी ध्यास तू स्वप्नांचे,
अन् कष्ट मी तयाचे....!!!
तू असावी धून त्या गीतांची,
अन् मी प्रेमगीत तयाचे......!!!!-