प्रवास माझ्या शब्दांचा, हा प्रवास निराळा..
खेळ माझ्या शब्दांचा, हा खेळच निराळा...
कधी पटकन सुचतात , कधी भेटतात सहजच...
कधी निघुन जातात निशब्दांच्या प्रवासाला.....-
शब्दांच्या झुल्यावर💕
झुला करीन शब्दांचा
त्यात तू बसशील का...
शब्द असतील माझे
शब्द मोती वेचशिल का...
समजुन भावना माझ्या
हातात हात घेशील का...
वेडवलेली मी तुझ्या प्रेमात
प्रेमाच्या पैलतिरी नेशील का...
शब्द असतील प्रेमाचे
गोड साथ देशील का...
कविता माझी तुझ्यासाठी
हृदयाच्या कप्यात ठेवशील का...-
उठा कर कलम और काग़ज लिखना जरुरी हैं
मन में कैद भावनाओं को सही राह दिखाना जरुरी है
चल पडे हैं कदम कलम के शाई की तरफ
अब इन्हे कलम के मूकद्दर तक ले जाना भी तो जरुरी हैं
चलता रहेगा ये शाई-कलम-काग़ज का अफसाना मेरे जीवन मे
मसलसल रहेगा ये दौर मेरा इनके साथ का
देंगे वो एक नई सहर उस पल को हमेशा!
🖋️ शब्दांचा निरंतर प्रवास..
-
खुशाल घे दगाबाज शब्दांचा सहारा
मी शोधीन माझा सुटलेला किनारा.
अबोल भावनांना नख कशाला लावू
मनगर्भात लाभू दे कवितेचा निवारा.
तुझ्या वाटेवर सदाच बरसावे चांदणे
मागणे हेच मागेल नभी तुटलेला तारा.
डोईवर तुझ्या फुलावा सुगंधी फुलोरा
माझ्या पावलांखाली असू दे निखारा.
आलाच कधी चुकून माझ्या या शहरात
भेटशील ना सळाळत मज होवूनी वारा.
-
जिभेचं वजन खुप कमी असतं...
पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं...-
शब्द
हळव्या मनाला टोचत असतात
मनात काहूर घालून बोचत राहतात
खोलवर रुजून जखमा खोदत बसतात
खरच हे सगळ शब्द घडवून आणतात ?
बोलणारे आपण, ऐकणारे आपण
अलंकारिक, सुशोभित, उचित, अनुचित
त्यांचा हवा तसा अर्थ घेणारेसुद्धा आपण
मग दोष त्यांचा की आपला?
शब्द रचवले की लेख बनतो
शब्दांना सजवले की कविता होते
शब्द कसेही वापरले तर वाद होतो
शब्दांचा प्रयोग करणे एवढाच उपयोग का त्यांचा?
की भावना व्यक्त करण्यासाठी
आसरा घेतो आपण त्यांचा!
की तेच स्वतः मदतदूत होऊन येतात ओठांवर
मन मोकळं व्हायला आपलंच ऐकमेकांत...!-
हे राधे..
"शब्दांचा"
प्रकाश पडला की,
वाटते,
तुझ्याच भावनांचा,
चंद्रमा सोबतीला आहे..!!-