रोजचा दिस हा असा हाकावा...
दुःख देणारा अंतर्मनातून गाळून टाकावा...
काय कामाची,शेवाळलेली नाती ...
शब्दही ज्यांचे काट्यापरी टोचती...
ज्यांच्यापुढे शून्य प्रेम आपुलकी..
अशा नात्यांची व्यर्थ ही टिमकी...
आपला घाव आपुणची लिंपावा...
स्वतःच्या मार्गात चांदणसडा शिंपावा...
रोजचा दिस हा असा हाकावा...
दुःख देणारा अंतर्मनातून गाळून टाकावा...-
शाळेत आहे एक झाड
मी करते त्याचा लाड...
आधी मी बी पेरली
मग त्याची काळजी घेतली...
झाड जरा मोठे झाले
मग खत पाणी घातले...
झाडाला फुले फळे आली
त्यानं ती मलाच दिली...
शाळेत आहे एक झाड
मी त्याचा करते खूप लाड...
- साक्षी कोळी-
एका जंगलात दोन माकड
त्यांनी खाल्ले कच्चे पापड..
दोघांची झाली चक्कर
एका माकड आला आली चक्कर...
तिकडून आली त्याची आई
दवाखान्यात नेले घाई घाई....
डॉक्टरने टोचली सुई
माकड बोलले उई उई....
- विराज नागटिळक-
पोरं होती चार
त्यांच्याकडे होती कार
होते ते छोटे
कधी बोलायचे नाही खोटे..
ते होते एक
त्यांना मिळाला बाबांचा चेक
पोरं बागेत गेली
चेक विसरून आली...
बाबा आले घरात
त्यांनी रागावले जोरात
मला लागली रडायला
बाबा लागले हसायला...
चेक होता खोटा
झाला नाही बाबांचा तोटा....
- स्वराज सोनवणे-
झ झ झाड आहे हिरवेगार
त्याला आली फुले फार ..
झाडावर आली माकडे चार
म्हणाले फुलांचा करूया हार...
एकाने आणला सुई दोरा
सगळ्यांनी बनवले हार बारा...
हार घातले गळ्यात
उडी मारली तळ्यात...
माकडे लागली पोहायला
हार लागले वाहायला....
- श्रीशैल कांबळे-
मोरा इतका सुंदर कोणी नाही
मी रोज मोराला पाही...
मोर आहे राष्ट्रीय पक्षी
त्याला कोणी अडवणार नाही...
तो रोज येतो आमच्या घरी
आम्ही आहोत शेजारी शेजारी..
तो आणि मी आहे मित्र
मिळून काढतो पावसाचे चित्र...
आम्ही कधीतरी भांडतो खरे
पण लगेच होतो बरे....
- अनुराग चिखले-
स स ससा, गुबगुबीत दिसतो
मला बघताच चटकन पळतो....
ह ह हरीण, सुंदर त्याचे डोळे
बघताच वाघाला पळ पळ पळे....
म म मोर, नाचतो छान
पावसाला बघून हलवतो मान...
ल ल लांडगा, लबाड बोलतोय
आजारीपणाचं ढोंग करतोय...
म म माकड उड्या मारतोय
जे येईल हाताखाली त्याला धरतोय...
व व वाघ मोठा त्याचा राग
जो येईल त्याच्या पुढे त्याचा होई त्याग...
असे असतात छान छान प्राणी
जाऊ आपण त्यांची गाणी....
-स्वराज सोनवणे
-
पंख मला असते दोन तर
घेईल भरारी एकदम वर...
चांदण्यांना बनवेल मित्र
सगळे मिळून काढेन चित्र...
तेथून आईला पाठवेन पत्र
म्हणेन करूया पार्टी एकत्र...
चांदण्याचे आई-वडील पाहिले
झटकन उठले अन आईकडे गेले...
पंख नको चांदण्या नको
पार्टी बिर्टी नको मला...
कधी कधी सोडून
जाणार नाही आईला....
-आरोही कांबळे-
एक होते सिंहाचे पिल्लू
नाव त्याचे कल्लू....
त्याची आयाळ मऊ मऊ
त्याला देतो मी खाऊ....
तो आहे फार चपळ
जंगलात करतो नुसती पळापळ...
कल्लूला पाहिजे होते पाणी
त्याला भेटली सोन्याची नाणी...
सिंह गेला दुकानात
हळूच बोलला सोनाराच्या कानात...
घाबरून गेली त्याची शुद्ध
सोनार झाला बेशुद्ध....
- श्रीशैल कांबळे
-
एक आहे मोठी बाग
मुले करतात त्यात भागा भाग...
बागेत आहेत छान छान प्राणी
ते म्हणतात गोड गोड गाणी...
बाग आहे हिरवीगार
तिथे वाटते थंडगार..
झाडावर आहेत रंगीत फुले
जणू आमच्यासारखी लहान लहान मुले...
-साक्षी कोळी
-