त्या वाटेवर चालताना का ताज्या होतात आठवणी
का लागतात एवढ्या जिव्हारी की खंत होई मनोमनी...
अजूनही वाटते भीती या हातून चुका घडण्याची
या साऱ्या विचारात निर्णय घेऊन वाट पुन्हा चुकण्याची...
येतात मनात माझ्याही भाव पण सारे फक्त ओठी राहून जातात
आणि ते सारे फक्त आठवणी बनून मनात राहतात...-
Future dr 👩⚕️🩺
Present writer ✍️
बिकने वाले और भी हैं जाओ जाकर खरीद लो,
हम ... read more
त्या चंद्राशी बोलते रोज मी
विषय मात्र तूच असतो
फिरत असते चांदण्यांबरोबर
पण मनात मात्र तूच असतो...
फक्त नाव तुझे घेता रे राजा
कंठ माझा दाटून येतो
हर्ष जणू रे तो
तुझा प्रेमस्पर्श होतो...
नसलास जरी आज सोबत
तरी भेटतो रोज चंद्ररुपाने
उधळतोस प्रेम चांदणे तु
माझ्यावर रोज नव्याने...-
अंधाऱ्या वाटेवर चालताना चंद्र
प्रकाशात मला कोणाची साथ नव्हती
आयुष्यात सोसलेले सारे धक्के
मी एकटीच मोजत होती...
मला समजून घेणाऱ्या एका
समविचारी व्यक्तीची प्रतीक्षा होती
येईल तो चंद्राच्या साक्षीने याची
अलगद मला चाहूल होती...-
मन रेंगाळते माझे दिस भर तुझ्या भोवती
रात्री स्वप्नात येतोस सागर किनाऱ्यावरती
वेळेचाही हिशोब मज आता मांडता येईना
तुझ्यात अडकत जाणार हे मन आता सुटता सुटेना...-
11 September ❤️
Today Completed one year on yq 😌✌️
Thanks yq family for the love 😍😘❤️🍫
And thanks to everyone who
appreciate , liked my quotes 😁✌️💓
Keep supporting 👑🌍🤝
So lots of thanks to yq world ♥️-
पत्र तुझे वाचता मन गेले भारावून
आठवणी त्या आठवता अंग गेले शहारुन...
डोळे भरून तुला पाहण्याची इच्छा पुन्हा आली जागून
तुझा चेहरा डोळ्या समोर येता अश्रू जातात ओघळून...-
शिक्षक म्हणजे एकच बागेत विभिन्न रूप आणि रंगाचे फुल सजवणाऱ्या माळ्याप्रमाणे असतो.शिक्षक म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.शिक्षक म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.शिक्षक म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती...शिक्षक म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.हिऱ्या प्रमाणे पैलू पाडतो तो शिक्षक जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो तो गुरु.आपल्या आयुष्यात अनेक जण येतात काही आयुष्यभराचे सोबती असतात तर काहीजण काही क्षणांचे.पण प्रत्येकजण जाता जाता नवीन काही तरी शिकवून जातो छोटासा का होईना अनुभव देऊन जातो.म्हणून अनुभव हा आपला शिक्षक आहे आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपला शिक्षक आहे.आई वडील हे सुद्धा आपले शिक्षक आहेत जे आपल्याला जग दाखवतात.आई आपल्याला प्रेम करायला शिकवते आणि वडील जगायचं कस हे शिकवतात.भाऊ जगाकडे कोणत्या दृष्टीनें पाहायचं हे शिकवतो.मित्र संकटाना हसत हसत कस सामोर जायचं हे शिकवतात.आणि आपले शिक्षक आपले गुरु या सर्व नात्यांचे मोल समजावतात.आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण काही तरी देऊन जातो शिकवुन जातो.येणाऱ्या संकटाने खचून जाऊ नये कारण खचून जाणे रडत बसने हा त्यावर चा मार्गच नसतो.तर त्या परिस्तिथीतुन काही तरी शिकावं कारण परिस्तिथी माणसाला खूप काही शिकवते घडवते...
-
होळीचा रंग वहिनी!!!
मैत्रीची चाहूल वहिनी!!!
प्रेमाचे बोल वहिनी!!!
रस्त्यातली वाट वहिनी!!!
मायेची सावली वहिनी!!!
मस्तीची थाप वहिनी!!!
बहिणीची कमी
पूर्ण करणारी वहिनी!!!
पाकळ्यांचे कोमल फुल वहिनी!!!
ह्रुदयतिल आवाज वहिनी!!!
curly curly hairs ची
माझी गोड गोड वहिनी!!!-
बसलाय राजा वाट बघत
कधी नशीब पलटेल त्याचे
घोड्यावर बसून राणी बरोबर फिरायचे
कधी दिवस येतील त्याचे...-
न जमणाऱ्या या अबोल नात्यात पुन्हा नव्याने रंग भरू कसे???
तुझे दुःख मी शब्दात रेखाटू कसे?? तुझं नाव घेता मी माझे अश्रू थांबवू कसे???-