मनातलं माझ्या तुला
सांगायचं आहे रे काही...
काय करू सांग तुच
तुलाच वेळ नाही...-
स्वतःच्याच विश्वात रमणारी मी ... ☺️
लेखणी बोलते माझी
कागदावर उतरताना...
उलगडते काव्य मोती
तु जवळी असताना...-
तुझ्या मनाचे गणित सख्या रे
अजुनी मजला कळले नाही...
वाटेत गंधाळलेल्या मोगऱ्याकडे
मन तुझे का कधी वळले नाही...-
न बोलता डोळ्यांतून माझ्या
समजून घ्यावे तु भाव मनीचे...
आसुसलेली स्पंदने व्यक्त होती
कळणार कधी तुज गूज अंतरीचे...-
श्वास श्वासात गुंफता
होते आयुष्य साकार...
लेखणीने दिले माझ्या
आयुष्याला आकार..-
सद्विचारांचे शब्दांकुर
मनगर्भातून अंकुरुन यावे...
सद्गुणांच्या सुगंधाने
मन कण कण भिजावे...
बुरसटलेल्या शब्दांचा
समूळ नायनाट व्हावा...
ममत्वाने मनी भरलेला
जोरदार पाऊस पडावा...
ओसरला पाऊस की
तप्त उन्हात गोड सर यावी...
जाता जाता मात्र सखी
मर्म जीवनाचे उलगडून जावी...
राग, द्वेष अन्यायाची
भीती किंचित मनी नसावी...
आपुलकीने गंधाळलेली
नवं शब्द पालवी फुटावी...-
साद घाली तुझी बासरी, मन माझे शहारून जाई...
पान फुल गाती आनंदे, वेधील्या रे सख्या तु गाई...
मेळा भरला गौळनीचा, पाखरे आले घाई घाई...
मुक्त छंदे सुस्वरताना, धन्य झाली धरणी माई...
वारा आला रे धावुनी ,धरला फेर चहू बाजूंनी...
मंगल गीत घुमू लागले, मेघ सांगे सकला गर्जूनी...
तुझ्या मोर पंखाची जादू, आजही आहे मजवरी....
भेटायचं रे माधवा तुला, बोलावं मला एकदा तरी...
वृंदावनाचा कण कण, मोहिनी घालतो मला...
घेशील ना रे समजून, किती आळवू तुला...
आस माझी जन्मंतरीची, आवाज दे तू स्पंदनांना...
वाजवून पुन्हा नवी बासरी, साद मला कान्हा देशील ना...-
अगर कभी वक्त मिले
बात किया कर दोस्त
सूना है यादो के महल
बिखरे पडे है. ....
-
राधा राणी सरकार
धुल बना दो मुझे
अपने चरनोकी...
आपकी सेवा के लिये
प्यासी हु जन्मोकी...-
विठ्ठलाची वारी! निघाली पंढरी!!
हात कटेवरी! विठ्ठलाचे!!१!!
येती वारकरी! करावे कल्याण!!
घालून रिंगण! छंदे गाती!!२!!
तुडवीत काटे ! तुला भेटण्याला!!
गोतावळा आला! आनंदाने!!३!!
विठ्ठल रुक्मिणी ! नाम गजरात!!
हर्षाने नाचत! भक्त येती!!४!!
उभा विटेवरी ! पाहताना वाट!!
विसरला थाट ! ममत्वाने !!५!!
मनी ओसांडला ! विठ्ठल सावळा!!
आला कळवळा ! लेकरांचा!!६!!
रुखमाई पुसे! मायाळू बापाला!!
जन्म उद्घरला ! चरणाशी!!७!!-