QUOTES ON #वळण

#वळण quotes

Trending | Latest
4 MAY 2021 AT 7:31

वेडीवाकडी वळणे, भावूक कुठे,
अंदाज पायवाटांचा ठाऊक कुठे,
दुःखाची पखरण जीवनात सर्वत्र,
सुखाचा बाजार येथे घाऊक कुठे.

-


29 JUN 2021 AT 20:40

'वादळाची' , आता सवय आहे, पाऊलवाट ही, ओळखीची आहे
चुकलेल्या,क्षणांना एकत्र करून, गवसलेली, नव्याने वाट आहे

'भोळ' मन, सैरावैरा धावत सुटे, मार्ग प्रत्येक, हवा, हवा वाटे
चालणं होतं,फक्त वाट बघून,वाटेत पावलांना,टोचले बरेच काटे

निरर्थक ठरते, जेव्हा मार्ग चुकते,चूक आयुष्याला,नवं वळण देते
मागे बघणे,बरे नसते म्हणत,पुन्हा जगण्याची,मनात उमंग भरते

वादळं वारा,असो मुसळधार सरी,डोळ्यात असो,दुःखाच पाणी
काळीज जरी,वेदनानी भरलेलं,पण प्रेमळ असो,ओठावर वाणी

एकच जन्म पूर्ण ठरत असतो,हसत जगण्याचा,आनंद घेतो म्हणत
चांगल बघून कोणाचं होतं नाही,कळतं असून,मन का वळत नाही

-


2 MAY 2019 AT 0:41

ना वळून मागे पाहते , जाणाऱ्याला जाऊ देते
जगण्याशी उगा खेळीता विरहाचे गाणे गाते
.... काय वळण आता आयुष्य घेते

-



निर्जीवांनाही किती ताे संस्कार,
वळणाने थांबण्याचा..©®MDK
अन् इथं सजीवांनाही वळण,
संस्कारहीन 'वळणाचं !'

-



काय वळण आता आयुष्य घेते...
तू अशी निघून गेल्यावर,
कसे एकट्यानेच ते पुढे जाते...

-


17 APR 2020 AT 17:15

चोखपणे स्वतःला वळवणं,
हे नेहमी उत्तम विचारांवर अवलंबून असतं.. !!

विधीवत आयुष्यात येणार विधिलिखित,
त्याच विचारात दडलेलं असतं..

-


21 FEB 2022 AT 15:26

वळणावरती तारुण्याच्या, सांभाळावा तोल सखे
वळण जरी दिसते मनमोहक, उतार भलता खोल सखे

वरवरच्या रंगास पाहूनी हुरळून जाणे व्यर्थ असे
दिखाव्यातल्या प्रेमामध्ये, तो नात्याचा अर्थ नसे
भुलून जाऊ नकोस ऐकून, गोड गुलाबी बोल सखे
वळण जरी दिसते मनमोहक, उतार भलता खोल सखे

मृगजळ पाहून करू नको तू, पाठलाग ग स्वप्नांचा
हृदयाला हृदयास जोड तू, घेत ठाव विश्वासाचा
भाव समजुनी डोळ्यांमधले, शोध प्रितीची ओल सखे
वळण जरी दिसते मनमोहक, उतार भलता खोल सखे
@निलम

-


17 JUN 2022 AT 17:23

संयम...

संयम कधी कशावर ठेवावा किती
ज्याने त्याने आपापला ठरवावा

जिभेचे चोचले पुरवावे तरी किती
चटो-या रसनेवर ताबा मिळवावा
.
.
.
पूर्ण रचना कृपया कॅप्शन मध्ये वाचावी
- ©Rupali

-


26 APR 2019 AT 19:32


नेहमी निर्मळ हसणारी मी
तुझ्या जाण्याने मात्र हरवली आहे,
तुझ्या सोबत नसण्याच्या विचारानेच
पूर्णपणे मी ढासळली आहे

भविष्यात तुझ्याविना जगायचं आहे
हे आता मनाने पक्के मानले आहे
काय वळण आता आयुष्य घेते
ते माझेच मला आता ठरवायचं आहे

-



काय वळण आता
आयुष्य घेते हे मला
मुळीच माहिती नाही
पण मला माझे ध्येय
नक्कीच माहीत आहे
यापुढील प्रत्येक पाऊल
माझ्या ध्येय पूर्तीसाठी
नेहमीच अग्रेसर असेल

-