आताशा कुठे जीवन कळले आहे, थोडी ओंजळ भरलेली खूप काही निखळले आहे..
शांतता, स्थिरता,समाधान हे शब्द वाचनात येतात आता आयुष्याला माझ्या जणू यांनी राम राम ठोकला आहे.
का कुणास ठऊक जे करायचं होतं ते सारं सारं करून झालय तरीही एका अपूर्णतेने मन सुन्न आहे..
विरह जगता जगता होरपळून निघायलय जीवन या प्रेमानं, कोणत्या कवीने म्हंटलय प्रेम सुंदर आहे??
कलेशी खुणगाठ बांधून जगलेल्या प्रत्येक शब्दांत पुन्हा पुन्हा शोधते स्वतःला, हे शोधणे देखील आता निरर्थक वाटते आहे...
वय सरण्याआधी आयुष्य पळत सुटलं इतकं की माघारी फिरणं देखील आता अपराधी वाटतं आहे.
सारं आयुष्य बदलण्याची ताकद असते म्हणे एका प्रेम केलेल्या व्यक्तीत, खरंच का हे वक्तव्य आज मला पुरेपूर लागू पडते आहे??
-