🙏🏻🪔🪷श्रीस्वामी समर्थ🪷🪔🙏🏻
"स्वानुभवाचा गुरुवार"
कृपया अनुशीर्षक मध्ये वाचा...
- ©® Dr. Rupali ( श्रीरुप )-
स्वत:ची नीट काळजी घ्या... स्वस्थ रहा... मस्त रहा... आवाजाला जपा आणि सशक्त करा... जागतिक ध्वनी दिवसनिमित्त सर्वांना सुरमयी नादमधुर शुभेच्छा! 🎤🎙️
- ©® डॉ. रुपाली धात्रक (श्रीरुप)
कृपया अनुशीर्षक मध्ये वाचा. [ Read in caption please. ]-
अतुल्य भारत : उत्तर प्रदेश
"यात्रा मधुरम ब्रजभूमि की"
"भारत में सर्वप्रथम पर्यटन की"
( ८ मार्च २०२५ - ११ मार्च २०२५ )
- ©® Dr.Rupali (श्रीरुप)
कृपया यात्रा वर्णन की कविता अनुशीर्षक में पढ़ें। 😊🙏-
पांढरकवडा लाईव्ह:
गुरुवार, दिनांक ३.४.२०२५ , वेळ सकाळी ८-९
"*उन्हाळी पाऊस*"
इथे तसं कालपासूनच हलकं आभाळ होतं... उन्हाची तीव्रता, दाहक झळा कमी झाल्याने गार वारं सुटलं होतं... आता तर अधिकच गार वारं वाहतयं... वातावरण आल्हादक झालंय... श्रावणासारखा उन सावलीचा खेळ सुरु आहे... दूर कुठेतरी पाऊस पडलाय नक्की... उगीच नाही या बेमोसमी वा-याने आसमंत भारणारा,
मंत्रमुग्ध करणारा मृद्गंध पसरवलाय...
मघा एक हलकीशी सर येऊन गेली... रहदारीचे रस्ते ओलावून गेली... वृक्षवेलींना डोलावून, पानाफुलांना झुलवून, तप्त भूमीला सुखावून गेली...
आता तर गच्च आभाळ भरलंय... ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि लखलखाट ही... कोणत्याही क्षणी कोसळेल असं दिसतंय आभाळ... इतकं लिहिपर्यंत सुरु ही झालाय इथे गारव्याने शहारणारा, मृद्गंधाने भारणारा, सुरुवातीला कोसळधारांसह बरसणारा, नंतर भुरभुरणारा पण अंतर्बाह्य सुखावणारा रिमझिम पाऊस! 🌧️🌩️⛈️🌨️☁️💨💦🤗🥰... बदलत्या ऋतुचे, लोभस निसर्गाचे हे विभ्रम किती विस्मयकारी!🫣🫢
- ©® Dr. Rupali (श्रीरुप)-
🙏🏻🌹सिद्धीदात्री_स्तवन🌹🙏🏻
नवरात्रीच्या महानवमीला पूजाअर्चा सिद्धीदात्रीची
निष्ठापूर्वक आराधना उपासना होई हो नवदुर्गांची
रक्तवर्णी वस्त्र, उंच मुकुट, मंद मधु हास्य धारी
दक्षिण चक्र-गदा, वाम शंख-पद्म चारभुजाधारी
सिंहवाहिनी पद्मासना हिमाचली नंदा गिरीवासी
लीनतेने भजणा-या साधकांची अंतरात्मा निवासी
देवीकडून अष्ट सिद्धी प्राप्त केल्या हो शिवाने
स्मरण ध्यान पूजन करा हो शरणागत भावाने
अर्धनारीश्वर रुपातील अर्धरुप सिद्धीदात्री देवी
पूर्ण क्षमता, कार्य कुशलता, अद्भूत सिद्धी देई
संसार असार बोधाने जी करी भक्तांची बुद्धी विवेक जागृती
नेई परम शांतीमय अमृत पदावरी करी सकल कामना पूर्ती
- © श्रीरुप
- Dr. Rupali
-
🙏🏻🌼महागौरी_स्तवन🌼🙏🏻
नवरात्रीच्या महाअष्टमीला करु या पूजा-अर्चना महागौरीची
पार्वतीच्या स्नेहमयी, करुणामयी, शांत, मृदुल, सुंदर स्वरुपाची
शिव पतीरुपी मिळण्या घोर तपाने जाहली कृष्णवर्णी
शिवकृपे गंगाजल स्नानाने जाहली कांतीमान गौरवर्णी
शंख, शशी, कुंदासम गौर वर्ण, धवल वस्त्र-अलंकृत श्वेतांबरधरा
अष्टवरुषी, शिवालिक गिरीवासी, शाकंभरी, वृषारुढा-सिंहारुढा
चतुर्भुजा त्रिशूळ-अभयमुद्रा दक्षिण करी, डमरू-वरमुद्रा वाम करी
उपासना कष्ट दूर करी, सकारात्मक उर्जा वृद्धी, मन एकाग्र करी
तापत्रय हारिणी, उपवर कन्येस मनोवांछित वर, सौभाग्य दात्री
धन धान्य ऐश्वर्य सुख शांती समृद्धी, अलौकिक सिद्धी प्रदात्री
महागौरी पूजनाने होई नवदुर्गांचे पूजन, शुभमनोकामना पूर्ती
होई काळ्या पापकर्मापासून मुक्ती, विशुद्ध ज्ञानाने आत्मोन्नती
- © श्रीरुप
- Dr. Rupali
-
🙏🏿🏵️कालरात्री_स्तवन🏵️🙏🏿
नवरात्रीच्या सप्तमीला आराधना कालरात्री दुर्गा काली मातेची
महाकाली भद्रकाली भैरवी चामुंडा चंडी रौद्री धूम्रवर्णा देवीची
घोर अंध:कारमय कृष्ण वर्ण, अति भयावह स्वरुप जरी
विद्युल्लतेसम कंठीमाला, ब्रह्मांड सदृश्य गोल त्रिनेत्र जरी
गर्दभ वाहनारुढ, विखुरलेला केशसंभार दिसे विनाशकारी
परि दुष्ट संहारी ग्रह-बाधा निवारी, शुभफलदायी शुभंकारी
श्वास उच्छवासातून अग्निज्वाला, स्तन तिचे जणू की गिरी
दक्षिण वर-अभय मुद्रा, वाम लोहकाटा-खड्ग चारभुजाधारी
कालरात्रीच्या केवळ स्मरणमात्रेण अथवा होता आगमन
दानव, दैत्य, राक्षस,भूत, प्रेत, पिशाच सर्व करती पलायन
योगसाधनेत करी जागृत आदितत्त्वाची सप्तम कुंडलिनी शक्ती
ॐ बीजमंत्राने ब्रह्म रन्ध्र मुकुट चक्र सहस्त्रार चक्राची जागृती
महायोगिनी, महायोगीश्वरी, नागदौन औषधी रुपी ख्याती
करी सक्रिय ब्रह्मांड चेतना-मेधा शक्ती, ईश्वर-आत्मानुभूती,
नकारात्मक ऊर्जेचा नाश, समस्त पाप-विघ्न-शोक मुक्ती
देई ज्ञान-शक्ति-धन लक्ष्मी लाभ, अक्षय पुण्य-लोक प्राप्ती
- © श्रीरुप
- Dr. Rupali
-
🙏🏻🌸कात्यायनी_स्तवन🌸🙏🏻
नवरात्रीच्या षष्ठीची दुर्गा महिषासुरमर्दिनी कात्यायनी
उपासना आराधना महादेवीची अमोघ फलदायिनी
भगवती पराम्बाचे केले ज्यांनी कठीण तप
महर्षी कात्यायनांची जाहली ती पुत्री रुप
वैद्यनाथवासिनी शोधजननी सिंहवाहिनी स्वर्ण स्वरुपिणी
चतुर्भुजा सव्य अभय-वर मुद्रा, वाम खड्ग-पद्म धारिणी
श्रीकृष्ण वरला गोपींनी कालिंदी यमुना तटावर
मनोप्सित वरप्राप्तीस शीघ्र विवाहास देतसे वर
अदृश्य अव्यक्त प्रपंच सूक्ष्म जगतावर जिची सत्ता
कल्पनातीत अति गुप्त रहस्यांची प्रतीक दिव्यता
नैसर्गिक आपत्ती हिच्या सकारात्मक क्रोधाची सूचकता
प्रलय प्रकोपांती करी सत्य धर्म स्थापना सृष्टी सृजनता
योगसाधनेत करी जागृत मन, अनुपद तत्त्वाची षष्ठ कुंडलिनी शक्ती
'हं', 'क्षं ,'ॐ बीजमंत्राने अहम संतुलन, अंतर्ज्ञान आज्ञा चक्राची जागृती
रोग शोक संताप पाप भय इत्यादींची समाप्ती
धर्म अर्थ काम मोक्ष फल देई परम पद प्राप्ती
- © श्रीरुप
- Dr. Rupali
-
🙏🏻🌻स्कंदमाता स्तवन🌻🙏🏻
नवरात्रीच्या पंचम दिनी पूजन करुया स्कंदमाता देवी चे
सिंहावर आरूढ बाल कार्तिकेय स्कंदासह मातृ शक्तीचे
गौर वर्णी देवी पद्म विराजित पद्मासना चार भुजाधारी
एका काखेत षडानन एक वर मुद्रा कमळ उभय करी
रक्तवर्णी पुष्ष अक्षत पीतवर्णी केळीने पंचोपचार पूजन
सौरमंडळाची अधिष्ठात्री देई अलौकिक तेजाचे वरदान
सिंह स्कंदा सम शौर्य प्रविण गुण देई ही वात्सल्य मूर्ती
व्रत उपासनेने लेकरांना दीर्घायु करी सर्व मनोकामना पूर्ती
योग साधनेत करी जागृत आकाश तत्वाची पंचम कुंडलिनी शक्ती
हं बीजमंत्राने चित्तवृत्ती लोप बंधमुक्त मन विशुद्ध चक्राची जागृती
शरणागतास करुणेने करी मोक्ष मार्ग सुलभ दु:खमुक्ती
मृत्यूलोकातच परम शांती आणि सुखाची येई अनुभूती
- © श्रीरुप
- Dr. Rupali-
🙏🏻🌺कुष्माण्डा स्तवन🌺🙏🏻
नवरात्रीच्या चतुर्थ दिनी आराधू या देवी कुष्माण्डा
ईशत् स्मित हास्याने जिने निर्मिले अखिल ब्रम्हाण्डा
दूजा न कुणी एकमात्र सूर्यमंडल निवासिनी आद्यशक्ती
चराचराची उत्पत्ती करणारी आदिस्वरुपा आदिशक्ती
सूर्यासम दश दिशा उजळवणारी दैदिप्यमान कांती
प्रत्येक प्राणीमात्रात ही प्रकाशमान तेजाची व्याप्ती
कुम्हड़ अर्थात भोपळ्याचा बली भावतो देवीस
अचचंल मनाने भजावे सिंहारुढ या अष्टभूजेस
कमंडलू धनुष्य बाण कमळ अमृत कलश चक्र गदा
आणिक जपमाळा धारण करणारी सिध्दी निधी प्रदा
श्रद्धेने वहावे आवर्जून लाल गुलाब जास्वंद सुमन
दही साखर फुटाणे अल्प नैवेद्याने ही होई प्रसन्न
योग साधनेत करी जागृत वायुतत्वाची चतुर्थ कुंडलिनी शक्ती
यं बीजमंत्राने कला संकल्प शक्ती उदय अनाहत चक्राची जागृती
लाभे आयु शक्ती वृद्धी यश समृद्धी आधी व्याधी मुक्ती
उपासनेने होई लौकिक पारलौकिक आध्यात्मिक प्रगती
- © श्रीरुप
- Dr. Rupali-