मुलगी तिच्या जोडीदाराची निवड करताना.....
-क्रांती शेलार-
मुलगा होणे तितक सोपे नसते हो
जबाबदारीच्या ओझ्याखाली,
स्वतःची सर्व स्वप्ने दाबावी लागतात.-
शिवाजी महाराज जन्माला येतील
पण जिजाऊंना तुम्ही पोटातल्या पोटात मारता....
कुठे चाललेत तुमचे विचार
मुलगा आणि मुलगी असा भेदभाव का तुम्ही करता....-
मुलगा म्हणजे वडीलांनंतरचा
घराचा आधारस्तंभ असतो
हा मान्य आहे जरा अल्लडपणा करतो
खोड्या जरी काढत असला तरी
जीवही तितकाच लावतो!
मनात मात्र भविष्य आणि जबाबदारी ची धास्ती असते
दिसून येत नाही ती कोणाला
कारण नेहमी खुललेले त्याचे हास्य असते!
वडिलांच्या छायेखाली तो प्रशीक्षित होत असतो
परिस्थितीशी कसं लढायचं हेच तो शिकत असतो..
त्याचा ही पारा चढतो केव्हातरी
जेव्हा खांद्यावर येते कुटुंबाची जबाबदारी
असत ते दडपण भारी...
तरीही साम्राज्य उभं करतो नवं
फक्त परिस्थितीशी लढताना त्याला ही
कुणीतरी समजून घेणार हवं!!-
मुलगा मोठा झाला की वडिलांचा मित्र होतही असेल पण बाप नाही.
आईची आई व्हायचं सामर्थ्य, कला आणि काळीज फक्त लेकीकडे असतं.
-
तू मुलगा आहेस...म्हणून काय झालं
तू ही कधी मन मोकळ करून रडत जा
तू मुलगा आहेस...म्हणून काय झालं
हवं तर हातात तलवारी ऐवजी सुरी घेऊनही जग जिंकत जा
तू मुलगा आहेस...म्हणून काय झालं
नोकरी न करता घर सावरून जीवन जगण्याचा आनंद घेत जा
तू मुलगा आहेस...म्हणून काय झालं
घुंगरांच्या तालावर तुझेही पाय थिरकु देत जरा
तू मुलगा आहेस...म्हणून काय झालं
मदतीचा हात तिच्याकडे बिनधास्त मागत जा
तू मुलगा आहेस...म्हणून काय झालं
तिच्यासोबत हॉटेलात विना पाकीट जात जा
तू मुलगा आहेस...म्हणून काय झालं
खरचं थकला असशील, बस मध्ये हक्काच्या सीटवर बसून रहा
तू मुलगा आहेस...म्हणून काय झालं
मुलीची पाठवणी करताना दोन अश्रू गाळत जा
तू मुलगा आहेस...म्हणून काय झालं
दुखलं-खुपलं तर दाखवत जा-
भाळी कुंकवाचा टिळा माय लावते कोरून
लखलख मिरविते दुःख उदासी सारून
काकणाची हिरवाई चुडा पाटल्यांची दाटी
नथ पाणीदार झुले सर मोत्याचीच ओठी
डोई पदर ना ढळे तेजं झाकते सूर्याला
मन उदार विशाल त्यात सामावी जगाला
निरक्षर ती अडाणी नाही गंध अक्षरांचा
देई शिकवण मोठी माणुसकी जपण्याचा
भुकेल्याची जाणी भूक तहानेल्या देई पाणी
कर्म अभंग रचूनी मुखी अमृताची वाणी
हात फिरता रमेचचा बरकत मायंदळ
सारं असूनी आजही सुंन वाटतं आभाळ-
जात-धर्म की नातं ? !!!
तुम्ही एका अश्या गोष्टीमुळे जात आणि धर्म लावला आहे की ती गोष्ट व्यर्थ आहे... ती म्हणजे देव...!!
मग मला सांगा तुम्ही कधी देव पाहिला !!
जर हा तर देवाने जातिभेद करायला सांगितलं ...? !!!
जर नाही, तर तुम्ही आपल्याच माणसात राजकारण का करत आहात..!!
(सूचना:- लग्नासाठी जात वगळणे/लावणे तुमच्यावर अवलंबून आहे )
आपला धर्म:- मनुष्य आपली जात:- मुलगा/मुलगी
-
आवड-नाआवड या गोष्टीचा
अनुभव नाही आहे मला,
एका मध्यमवर्गीय बापाचा मुलगा आहे
प्रत्येक गोष्टीत तडजोड करायची सवय आहे मला.-
ती म्हणते जेंव्हा त्याला..
" तू इतका चांगला आहेस,
तुला माझ्यापेक्षा..
चांगली मुलगी भेटेल."
तेंव्हा ..
समजून घ्यावं गड्यानं,
की तिला त्याच्यापेक्षा ..
चांगला मुलगा भेटलाय.-