श्रद्धेच्या कोंदणातला नितळ भक्तीचा हिरा म्हणजे प्रेम....
-
जगाशी संवाद साधायला कित्येक भाषांचा आश्रय घ्यावाच लागतो पण आत्म्याशी सुसंवाद साधायचा असेल फक्त आणि फक्त मायबोलीच...कारण जगाशी होतो तो व्यवहार आणि आत्माशी होतं ते हितगुज...
-
मुळाक्षर गिरवून शिकवली जाते ती भाषा आणि स्पंदनांनी आत्मसात केली जाते ती मातृभाषा..
-
गर्भावस्थेतच ज्यांची ओळख होते त्या गोष्टी म्हणजे माय अन् मायबोली...
-
Performance may be accelerated but potential can never be augmented!
-
कागदावरची अक्षर वाचता येण जितकं महत्त्वाच त्यापेक्षा कैकपटीन अधिक महत्त्वाचं म्हणजे चेहरे वाचणं!किमान अक्षरांची तोंडओळख करुन द्यायला शाळा नावाची बंदिस्त वास्तू समर्थ असते पण भोवतालचे चेहरे वाचायला आयुष्य नामक मुक्त विद्यापीठच शिकवू शकतं....
-
जिथे आपण पालक असतो तिथे मालक व्हायचा अट्टाहास केला तर फक्त क्लेश पदरी पडतात.
-
नाती जपावी लागतात पण क्वचितच काही नाती सहज जपली जातात अशी नाती जी जाणिवांनी समृद्ध असतात....
-
One has to be pure at heart since purity of heart varies directly with the worthiness of soul.
-
मोक्षासाठी गीता की गीतेसाठी मोक्ष ही उकल म्हणजे राधेसाठी कृष्ण की कृष्णासाठी राधा..याचा अर्थबोध!!
-