डोळ्यांदेखत मनाची हार
नाही पाहू शकत अक्षरे
वर्तमानाच्या निळ्या गगनात
उंच भरारी घेतात मुक्त पाखरे
काळोखातील निर्दयी वार
सोसतात स्वप्नांतील निखारे
अस्वस्थतेच्या मोहक चांदण्यात
संघर्ष करतात मुक्त पाखरे.-
कालपर्यंत मी मोहाच्या पिंजऱ्यात होतो बंदिस्त
आज झालो आहे मी मुक्त
आता मी कवितेच्या गगनात बहरणार
काळजातील संवेदनेच्या साक्षीने
प्रेमातील सुगंध रेखाटणार
वेदनेच्या गहिऱ्या वा-यात
बेकारांची जीवघेणी व्यथा मांडणार
माणुसकीचे अनमोल नाते
समतेच्या भावनेत जपणार
आता मी आहे एक मुक्त पक्षी
स्वातंत्र्याचे नितांतसुंदर गाणे
मनःपूर्वक आनंदात गाणार.-
मुक्त पक्षी माझ्यातला विश्वभर उंडारतो
घेऊन भरारी चहुकडे आपल्याचं घरट्यात परततो
क्षणात इथे तर क्षणात क्षितीजापल्याड तो
फिरतो
मुक्त पक्षी माझ्यातला विश्वभर उंडारतो
मन मानते हार पण तो स्वैर ,मुक्त संचारतो
पाहुनी जगरहाटीचे सप्तरंग,कधी कधी तो भारतो
मुक्त पक्षी माझ्यातला कल्पनेची घेतो उंच भरारी
आकाशाला स्पर्श करुनी क्षणात येतो तो खाली-
मुक्त पक्षी म्हणताना
आकाश हाती घ्यावे
उंच एका भरारीने
अवघे गगन आपले व्हावे..
अडथळ्यांचे साम्राज्य
मनशक्ती समोर लहान व्हावे
हवे ते घडण्यासाठी
ध्येय वेड्यात महान व्हावे..
गरूड झेप घेताना
फक्त जिंकणंच डोळ्यात दिसावं
राखेतूनही जिवंत व्हावं
एवढं आत्मबल फिनिक्स पक्षाचं घ्यावं..
शेवटी काय उडणं महत्वाच
आभाळाशी नातं जपता यावं
मनातील सर्व स्वप्नांनी
गगनभरारीत संपूर्ण व्हावं...-
मुक्त पक्षी ती एक
पंख तिचे छाटू नकोस
होऊ दे तिला रितं
तिच्या इच्छेचा गळा घोटू नकोस
-
मुक्त पक्षी दिव्य आकाशाला गवसणी घालण्या
उडू पाहे उंच बेभान वाऱ्याचा धरूनी हात...
सळसळणारे साप आणि मोठमोठे घाट चढण्या
मनाशी निश्चय केला आत्मविश्वास भरूनी पंखात...
कु. शोभा मानवटकर...
-
मुक्त_पक्षी एक 'तू'
मनमर्जी ने विहरणारा
तुला कसले रे बंधन, तू अवघ्या
आकाशी मालकी गाजवणारा...
बळावर पंखाच्या तुला
आहे अभिमान तरी किती?
थकणार आहोत कधी तरी
याची नाही खंत जरा, ना भिती...
-
मुक्त पक्षी होऊन, आकाशी
उडेन मी कसे पंख पसरूनी
घेत भरारी घालीन घिरट्या
नभ कवेत घेईन दो हातांनी-
होऊनी मुक्त पक्षी वाटे
मज आनंदाने विहरावे
पंखांना पसरवत लांब
आकाशी स्वतः सावरावे
मनातल्या भावनांना
द्यावा मुक्तपणे संचार
दृढनिश्चयाने साकारावा
ठामपणे आपला विचार
-