निघाले आज तिकडच्या घरी
पापण्यात तरळते पाणी
आठवांची भरता शिदोरी
दाटून येते माझी वाणी
नवलाईने भरला रस्ता
नाती जोडण्या आहे तयार
ओलांडूनी वेस घराची
आले सातासमुद्रा पार
संस्कारांचा ठेवा सोबत
उचलेन पाऊल नव्याने
जोडण्यास नवे नाते
आहे तयार आनंदाने-
मराठी लेखन
मराठी, हिंदी कविता लेखन
Emotions fragile, torn apart,
A shattered mind, a weary heart.
Countless memories I still chase,
Moments drifting, lost in space.
A bond of blood grew strained with strife,
Love that slipped away from life.
Wounds unhealed, too far to find,
Forever gone, no ties that bind.
I locked my heart behind a wall,
Yet harshest words I still recall.
This stubborn pride won’t set me free,
My restless mind won’t let me be.
Why must this heart, so vast and wide,
Bear all the guilt it holds inside?
Why does one fault, so small, so slight,
Feel like injustice in my sight?
-
हात हाती आज हवा
धुंद मधुमती रात रे
श्वास माझा खोल जातो
तुझी अबोल साथ रे
बोलती शब्द नजरेने
वाटते ना मज खरे
तू अवचित येवूनी
बाहुपाशात मज धरे
मोकळ्या बटा होऊनी
तुज खांद्यावर फेर धरे
घट्ट मिठी सळसळती
मिलनाची वेळ सरे
-
खुदको ढुंडना चाहा बहोत बार
हर बार खामोश किया गया
अपनोंकें बिच रेहकर भी हमेशा
पराया ही हमे किया गया
बाते जबान तक आकर रुक गयी
अफसोस सुनने कोई न आया
खुशी चेहरे पर आकर रुक गयी
मगर साथ हसने कोई न आया
दिल को समझाना बेकार है
अश्क तो बेह जाएंगे
दिल फिर भी बेबस है
राह देखते रह जाएंगे-
कोण असतो हा बाबा कसा उमगतो हा बाबा
छोटी पावलं पडू लागता हात धरायला लागतो बाबा
पडलो रडलो धडपडलो तरी हातानेच सावरतो बाबा
मुळूमुळू रडू येताच मात्र शेंबडे नाक पुसू लागतो बाबा
घास भरवताना रागावते आई रूसल्या चेहर्यावर हासू आणतो बाबा
कधी बनतो माझा घोडा कधी झोपाळा पोटच्या गोळ्याला आकार देत असतो बाबा
हळूहळू उंची लागते वाढू तसा थोडासा स्वभाव बदलतो बाबा
मला पडणाऱ्या शंभर प्रश्नांची उत्तरे मग शोधून सागंत राहतो बाबा
खांद्याबरोबर येताच मात्र सतत न्याहाळत राहतो बाबा
अचानक घडणाऱ्या बदलांना सावध पाहत राहतो बाबा
अविरत काम करताना ताण विसरून जातो बाबा
कामाव्यतिरिक्त पुढला विचार करत राहतो बाबा
-
उसे देखकर हमेशा
धडकन मेरी बढती है
जवानी सवार होकर
इश्क कि नशा चढती है-
खुब कोशिशे कि हमने
खुदपर ध्यान देने की
पता नहीं मनमे थी बात
राह देखे बाहर आने की
खुद क्यो कमजोर समझना
क्यो करना नजर अंदाज
क्या फायदा मनमे रखनेका
कभी तो खुलजाना है राज-
ध्यानी मनी नसताना तुझी
आज अचानक गाठ पडे
विरलेला श्वास पुन्हा पुन्हा
तुला पाहूनी उगा धडधडे
आठवणींची चित्रफित ती
डोळ्यासमोरून ओझरे
क्षणभर होऊनी स्तब्ध सखे
पाहतो माळलेले तू गजरे
सालस तुझे रुप पाहता
माझाच मला विसर पडे
तुझ्या झलकीसाठी कितीदा
ऐकलेत मी बोल खडे
क्षणभर सहवास तुझा
सदैव मजला तो आवडे
डोळ्यातले भाव पाहताना
नव्याने मी तुझ्या प्रेमात पडे-
गर्मी का होता हैं एहसास
एहमियत समझमे आती है
धूप से बचना चाहते हो
तो पेड लगाना पडता है
खुशबू से मेहेकते
खिलेखिलेसे फूल
नजर पडे उनपर
तो सब जाओगे भूल
रसभरे फलोंका अब
मिठासा है केहेना
भूल जाओगे तुम
हर एक गेहेना
-
आंनदाचे डोही आनंद तरंग
पाहुनी रूप तुझे जाहलो दंग
मज नसे भान कशाचे सखे
तुझ्या प्रितीचा चढलाय रंग
सावळ्या रुपाचा मीच दिवाना
तुझ्या आठवांचा भरु दे सारंग
साठवून ठेवतो काळजात सारे
होऊ नको देवूस तू सारे बेरंग
आनंदाची कुपी जिवापाड जपू
निर्मळ ठेवावे आपले अंतरंग
बोलावे बोल नको वेदना त्या
मिळावा सदा सज्जनांचा संग
-