रे सखया
रिमझिम रिमझिम ही बरसात
अशातच हवी भावनांची रुजवात
-
बाया करती उगाच कावा
जावा करती हेवा दावा
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
अहो मला घ्या ना एक शालु नवा .......
नव्या नव्या साड्या नेसून
शेजारणीचा येतो थवा
बघुनी मजला खूप वाटतो हेवा
अहो मला घ्या ना एक शालू नवा.....
पैठणी वरचे मोर मोजती
कुठून कितीची आणली सांगती
रिकाम्या बायांचा गवगवा
अहो मला घ्या ना एक शालू नवा.....
चढाओढ ती मनी उपजली
नेसून शालू मी ही सजली
दाखविला मी ही मोरांचा थवा
अहो किती गोड दिला शालू नवा.....
@P.Patankar✍🏻-
नंदा घरी नंदनवन फुलले
जेव्हा कान्हाचे आगमन झाले
साऱ्यांचे ग लक्ष वेधीले
नंद यशोदेच्या घरी बाळ रांगले
लळा लाविला गोकुळी साऱ्या
पेंद्या सुदामाच्या होई वाऱ्या
मटकी घेऊनी गोपी पऱ्या
कान्हा पुढे घालती येर झाऱ्या
दही दुधाची मडकी फोडी
जमा करूनी सारे सवंगडी
यशोदे सही खूप छेडी
ब्रम्हांड बघूनी मुखी घाबरली वेडी
गाय वासरा सह रानात गडी
सवंगड्यांसह शिदोरी सोडी
सुदाम्याच्या पोह्यांसह बाई
किती होती ती हृदयात गोडी
@P.Patankar✍🏻-
निज माझ्या नंदलाला नंदलाला रे
जाग येता जायचे यमुना पार तुला रे
साखळदंड तोडून तू सहज आलास रे
थोडाच मिळाला तुझा मज सहवास रे
तुझ्याकडे इतूकी लागली मनी आस रे
कंस मामासही झाला तुझा भास रे
स्पर्श होता तुझा यमुनेला पूर ओसरला रे
राधेला स्पर्श होता मोक्ष अवसरला रे
जा बाळा इथला आता वेळ सरला रे
वाट पाही नंद बाबा अन यशोदा घरला रे
@P.Patankar✍🏻-
वारी पंढरीची
संसारीक चाले, परमार्थाची वाट
सावळ्याची होई तिथे गळा भेट
तिथे होई सर्व दुःखाचा अंत
सुखाची प्राप्ती भेटतो भगवंत
मोही नश्वर संसाराचे सोडोनिया पाश
परब्रम्ह परमात्मा चा तिथे असतो वास
अंत:करणी दाटे भक्तीचा गर
विठ्ठल मय भासे अवघे चराचर
ध्यानी मनी स्वप्नी तोची तो आहे
मी पणा सारा नष्ट होऊ पाहे
ऐहिक सुखाची करुनिया होळी
विठ्ठला दे तू आता तुझ्या नामाची गोळी
@Pushpa patankar✍🏻
-
नित्य परिक्रमेतून
तू शिकवून जातो खूप काही
छाप सोडून जातो प्रत्येकावर
उजळीत नेतो दिशा दहाही-
दर्शनासाठी तुझ्या रे
तिष्टती सारे भक्त
जनास वाटे उभा निच्छल
विटेवरी तू अव्यक्त।।१।।
प्रतिक्षेत रे भक्तांच्या
घालमेल तुझी अंतरी
भक्त चालत येई दुरून
खंत निरंतर तुझ्या उरी।।२।।
भक्तांच्या पायाची धुळ
लावून तू कपाळी
शोभतो खरोखरी रे
भक्तांचा कैवारी।।३।।
चंदन टिळावरी तू
धुळ माखूनी वरी
कृतज्ञता व्यक्त करतो
अशी भक्तांपरी।।४।।
अपराधी ठरवतो स्वतःला
किती तुझी माया अपार
भक्तांच्या भेटीसाठी विठू
तू असा कसा रे लाचार।।५।।
पंढरीचा शोभतो राजा
जगताचा तू पेलतो भार
पाय झिजवत येई भक्त
ख्याती तुझी रे अपरंपार।।६।।
@P.Patankar✍🏻-
भ्रमण करतांना तू
चारही दिशा व्यापतो
आणि आम्ही इथे चालतांना
सोबतही आमच्या राबतो-
निघाले आज तिकडच्या घरी
माहेरून पाय निघेना हरी
आई वडीलास सोडून जाता
कोलाहल माजला आहे उरी
आई म्हणाली घर तुझे सासरी
परकी तुला इथली ओसरी
सांभाळ साऱ्यांना परोपरी
तिथेच तुझी ओळख खरी
जाताच दिसली भरगच्च ओसरी
सासू स्वागता आली दारी
सासरे म्हणाले सून हसरी
अहो म्हणाले ये ग घरी
जीवात आला जीव जरी
माहेर साठले होते अंतरी
सोडून मग पाश सारे
दगड ठेवीला हृदयावरी
@P.Patankar✍🏻-