फक्त स्वतःसाठी असं काही असतं का गं तुझं?
कित्येक वर्षात हा विचार स्पर्शूनही नसेल गेला मनाला हो ना?
माझं नी आपलं यातला फरक ही कदाचित विसरून गेली असशील.
कारण संस्कार असतात मनावर आपलेपणात उरण्याचे..वाईट नक्कीच काही नाही गं. पण चुकीचे हे आहे की आपण स्वतः स्वतःला गृहित धरतो, मग इतरांकडून कशाला अपेक्षा ठेवायच्या..आणि स्वतःसाठी करत ही असू छोट मोठं काही..
पण "फक्त स्वतःसाठी" करायचं आत्मबल अजूनही उपेक्षितच आहे गं सखी...-
तुझ्या येण्यानं श्रावणा
झालं उल्हासित मन
हिरव्या शालूत सजून
तृणात शोभलंया वन..
ऊन पावसाचा खेळ
तुझ्या येण्याचं कारण
फुला पानांत बहरावा
सुंदर हिरवा श्रावण..
हिरवीगार वृक्ष वेली
सृष्टीस रूपाचं आंदण
अवनी मिरवते अंगी
हिरवळीच गं गोंदण..
सप्त रंगी सहवासाने
गोफ विणला गगनात
इंद्रधनु तयाचे नाव
थेंब किरणी मिलनात..
आला आला गं श्रावण
फुलं ओंजळ भरून
ऋतू हिरवा बरवा
येई सणवार घेऊन..
-छाया वांगडे
-
बस एक सुकून है सोहबत में तुम्हारे
ख्वाहिशें मन्नत दिल की आरजू तुम्हीं से।-
तुझे याद किया दिल ने हर उस मोड़ पर
जहाँ बस आंखों से बांते हुई थी हमारी।
लफ्ज भी खामोश और साथ साथ चलकर
जहाँ बस दो दिलों कि धड़कन थी जारी।
तुझे याद किया दिल ने हर उस लम्हे में
जहाँ मन से मन के लगाव से थी सांझेदारी।
शिकवे शिकायतें और प्रीत के अपनेपन में
जहाँ हम दोनों कि लड़ाई भी थी प्रेम से भरी।
तुझे याद किया दिल ने हर उस पलछिन में
जहाँ हंसना और रोना यादों में शामिल हुआ।
ना भूले है कल के वादें और कसमों कि बातें
जहाँ तुम बिन अधुरा जीवन हासिल हुआ।
तुझे याद किया दिल ने उस फ़ैसले कि घड़ी में
जहाँ लडखडाए कदम हारी हुई उम्मीद लिए।
अब बिन तुम्हारे जिंदगी की हर उस कश्मकश में
जहाँ यादों का सैलाब साथ है जीवन भर के लिए।
-छाया वांगडे
-
ती संध्याकाळ रोजची
आज पावसात नाहली
तांबडं लेवून अंगी
जणू सौंदर्यात लाजली..
ही संध्याकाळ पावसाळी
थेंब पर्णांवर साचली
तांबसांज रंगात रंगी
काजळ कुंकू ल्यायली..
ती संध्याकाळ सोबतीला
क्षण अवधीत व्यापिली
गंधाळल्या रातराणीत
टपटपणाऱ्या स्वरातली..
ही संध्याकाळ बावरी
जणू भेटीस आतुरली
पळ संपणारा तरीही
नित्य भेटीत भारावली..
-छाया वांगडे
-
माझ्यातल्या "मी" च रंगवावं का चित्र
अप्रूप वाटे जगाला असं निर्माण व्हावं पात्र..
अनोखे स्वप्न अन् मनातून नैराश्य व्हावे लुप्त
इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी जी अंतर्गत आहे सुप्त.
अद्भुत सजावा सोहळा ध्येयपूर्तीच्या निर्मितीत
अचंबित व्हावे जग शिखरावरील यशोमय किर्तीत..
अजोड कामगिरी देहाची अन् अंतर्मन व्हावे तृप्त
जीवन सुवर्ण पर्व अन् जगणं असावं कृतकृत्य..
-छाया वांगडे
-
तुला हवं म्हणून.......
काय काय केलंस. मांड एकदा कागदावर. शब्दांना बसव ओळीत आणि लिह भरभरून पानं. आहे का एवढं लिहिण्यासारखं? प्रश्न पडतो ना? शब्द हवेत विरतात. अगं साधा एखादा निर्णय ही तुझ्या मनासारखा तुझा तुझा तू घेतलाय का? त्यातही सगळ्यांचा आधार घ्यावा लागतो तुला. एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र व्यक्ती नाहीच म्हणणार कारण अजून ही स्वतंत्र भारतातल्या विचारांच्या पारतंत्रात अडकलेली तू. कधीतरी स्वतःसाठी एक दिवस जगून बघ. तुला हवं म्हणून केलेल्या सगळ्या आनंदी क्षणांची भरभरून पानं लिहं......-
युगे अठ्ठावीस | उभा वीटेवरी |
सावळा तो हरी | पांडुरंग ||१||
चंद्रभागे तीरी | वसली पंढरी
कृपाछत्र धरी | माऊली ती ||२||
विठ्ठल विठ्ठल | नाम मुखी घेता |
हाकेला धावता | पावलासी ||३||
तारण्या संकटी | पाठीशी राहिला |
भक्तांच्या भेटीला | उत्साहीत ||४||
लागावी समाधी | देवाच्या ध्यानात |
ठेवावे सुखात | बा विठ्ठला ||५||
टाळ चिपळीत | हरीचा गजर |
दिंडी ती हजर | चंद्रभागी || ||६||
अभंग ओवीत | नित्य स्मरणात |
रहावे मुखात | छाया म्हणे ||७||
-छाया वांगडे
-
जरा हळू बोला
कशास हवं सांगायला
मिळणाऱ्या यशाबद्दल
डंका वाजवत हवं बोलायला..
जरा हळू बोला
असं कुजबुजणारं नसावं इच्छित
राजरोसपणे वावरणारं
साध्य करता यावं मनोवांच्छित..-