कठीण कठीण कठीण किती बंध रेशमाचे...
काळजात खोलवर रुजती मूळ तयाचे...
उधळूनी मम प्राण फुले प्राण वाहिती
सुकलेले फूल जरी गंध फुले उधळती...
अवचित ते सुंदरसे हसरे चांदणे
फुलत फुलत या धरेचे मंद मंद नांदणे...
बिलगुनी बसते मनी मधूर चिंतने
कुंद कुंद मिठीत अंती वाऱ्याची कीर्तने...
ऐसे छळूनि ऋतू बोलके कैफात नाचिती
झुरूनि झुरूनि भाव सारे देती मौनात प्रचिती...
किती हट्ट स्पंदनांचा अर्थ मांडण्या
सुन्या सुन्या गीतांची प्रिती सचेत अंतरी सांडण्या...
कु. शोभा मानवटकर...-
कोरे कागज पर लिखती है कलम
अपनी जिंदगी के बेशूमार किस्से...
उनमे से किसी को मिलती है चाहते तो
किसी को राहते सबके जज्बाती हिस्से...
कु. शोभा मानवटकर...-
नकळत सौम्य सांजसमयी यावास तू
संथ मनातला अंतरी संधिप्रकाश बनून...
माझ्यात अस्तित्व वाहावं तुझं ओसंडून
अन् श्वासांची माझ्या दिशा जावी बदलून...
कु. शोभा मानवटकर...-
मला माझ्या आयुष्यात उरलेल्या
इच्छांची पूर्तता म्हणजे तू
अर्थातच त्यातील संवाद नि
संदर्भांच्या दुव्यातील खास मूर्तता तूच...
कु. शोभा मानवटकर...-
हम चाहे शोर ही शोर बने खुद मे
या खामोशी की चीखती चिल्लाती
जुबान बने तनहाईयों मे...
कु. शोभा मानवटकर...
-
भीड मे भी तनहाईयों का मेला है अकेला अकेला हर इंसान अकेलेपन का मारा है...
कु. शोभा मानवटकर...-
एकतारी संगे एकरुप झालो
भक्तीत भजून देह मी पावन केलो...
जन्म मानवाचा म्हणे विटाळ काहिली
प्रापंचिक होऊनही भक्ती तुज वाहिली
नामस्मरणाचा तुझ्या टिळा भाळी ल्यालो...
संसाराचा गाडा जणू कोरडे किनारे
भाकरीशी भूक साधे तृप्तीची मिनारे
आत्मभान हरपून नयनी अमृत रुप प्यालो...
पूण्य पुर्व जन्मीचे मिळो हात आधाराचा
शिरी माझ्या आशिष राहो जल्म भराचा
तुजविण ना कोणी ऐसा विश्वाचा रखवालो...
कु. शोभा मानवटकर...-
आँखो मे उतर आते हो
तुम ख्वाब बनकर...
और छू कर खामोशी से
गुजर जाते हो हवाओं मे
एहसासो की खुशबू बनकर...
कु. शोभा मानवटकर...
-
लम्हों की खुली किताब के
एहसास के साथ...
हर खयालो और साँसों के
अनगिनत हिसाब है
कुछ अधूरे ख्वाहिशो के
जवाबो के साथ...
कु. शोभा मानवटकर...
-