लपून छपून मी तुला,
नेहमीच बघत असायचो.
नजर तुझी माझ्या नजरेला भिडताच,
लपून मी बसायचो.-
धुंडाळले ते चारी धाम
आश्रम एक ना सोडला
मंदिर मस्जिद गुरुद्वारी
थकलो तिला शोधुनी मी
पूजा पाठ जाप ताप
उपवास किती ठेविले
बुवा बाबांच्या पायाशी
थकलो तिला शोधुनी मी
दिसला आता मार्ग एक
डोकावून आत पाहिले
मन:शांती होती तिथेच
उगा थकलो शोधुनी मी-
मला वाटतेय भीती कशाची
नको वाढवू कंप ह्रदयाशी ।
सुरक्षेणे जगेल मी कशी
का अबोल मी अशी ।
माणुसकी असेल कुणाची
कसे समजवायचे मनाशी ।
खंबीर होणार मी कशी
का अबोल मी अशी ।
मदतीचा हात येतो हाताशी
पण हे मन हेलावत स्वतःशी ।
हा जगण्याचा ध्यास मनाशी
का अबोल मी अशी ।-
आयुष्य सारे वाहिले, मी तुझ्या हाती
ओंजळ रितीच ठेवली, मी फक्त तुझ्यासाठी
जगलो असा की, मरणेच राहिले हाती
पापण काठी अश्रु अडवले, मी फक्त तुझ्यासाठी
तुझ्या येण्याची वाट पाहत, जगाल्या कित्येक राती
शाही कागदावर सांडली, मी फक्त तुझ्यासाठी
तुझ्याच साठी झुरते मन, हे मन आहे नदी काठी
याच काठावर आयुष्य ठेवले, मी फक्त तुझ्यासाठी
आयुष्य असेच सरले, धावत सुखाच्या पाठी
सबंध आयुष्य वेतले, मी फक्त तुझ्यासाठी
तुझी वाट पाहत जळले, अश्रु नयनी
दाहि दिशांना वाट चालली, मी फक्त तुझ्यासाठी-
सुखाचा शोधण्या किनारा
मी तयातच गुंगले
शोधूनी मी स्वतःस बघता
मी न मजला गवसले
जगण्यासाठी धावतांना
भान कसले न राहिले
जीवनाच्या शर्यतीत या
मागे वळूनी न पाहिले
थांबतो का काळ कधीही
वेळ ही ना थांबते
आभासाच्या वळणावर या
आयुष्य हातचे निसटते
ओठांवरचे हास्य देखील
कृत्रिम आज भासते
रिकामी ओंजळ आपूलीच
खूप काही शिकविते
थांबविला हव्यास आता
भाव मनीचे जाणले
पुन्हा नव्याने एकदा मी
कात टाकूनी जन्मले
-
!!! मी एक भिकारी !!!
मैं भी इंसान हूं मेरी भी कुछ चाहते हैँ
भिक मांगना मेरी भी एक मजबूरी हैं....
करना चाहता था कुछ काम
लेकिन मेरा पास मेरे हाथो
के सिवा और कुछ नहीं बचा....
मेरे भी दो बच्चे थे
और एक खूबसूरत सी बीबी
चाहता था उन्हे खुश रखना
लेकिन हो गये वो दुःखी....
एक दिन मेरे साथ ऐसा
कुछ हूँ आ थे हम चार
लेकिन रह गया मैं अकेला....
भगवान भी मेरे साथ कैसे कैसे खेल खेलता हैं
कभी देता बहुत कुछ तो कभी भूका ही सुलाता हैं....
-
मी बडबडत असते
माझ्याचं कवितेच्या ओळी
हल्ली छान लिहीतेस
लोक म्हणतात...-