-
जो कागदातुन ऐकायला येते
अन
लोक म्हणतात मी कविता करते.❤..📝
I write to fe... read more
राहिले ना अप्रूप आता या पैश्याचे
स्थिती आज साऱ्यांची सारखीच झाली आहे...
कुठे कुठे शोधता श्वास आता
माणसाने माणुसकीचा तळ गाठला आहे....
कुठे ठेऊ आशा माणुसकीची नक्की
जिथे तिथे भावनांचा समुद्र गोठला आहे....
राहीले नाही जुने काही इथे आता
फक्त मुठीत माझ्या थोडा श्वास उरला आहे...
नावाला बदनाम झालाय कोरोना
खरा वैरी तर माणसाचा माणूस बनला आहे....
श्वास ही थांबेल का हो या गर्दीत माझा
जीवाला घोर हा साऱ्यांच्या लागला आहे..
उजेडाकडे लक्ष जाईल कसे आता
आयुष्यात फक्त अंधार साचला आहे...
शोधात आहेत सगळे प्राणवायू च्या आता
जीवाचा इथे खेळ मांडला आहे...
शोधू नको आता देव माणसात
जिकडे तिकडे आता रावण बसला आहे...-
यू तो मै हर साल हजारों रंगो में रंगती हुँ
पर तुने जो लाल रंग लगाया था
पिछली होली कि साँझ को
वो अब तक याद है-
प्रेमाच्या सखोलतेची जाणीव
फक्त अंतर करु शकतो
कारण
जवळीकता तर फक्त दुरावा वाढवते
हे अंंतर ही एक प्रेम परीक्षा असते
ज्यात यश झाले तर आनंद ही आनंदच
आणी अपयश आले तर दु:खाशिवाय
काहीच हाती लागत नाही
-
प्रतिबिंब तुझे मनात असते
मनातलं पेंटिंग तुझ्या छायाचिञात दिसते
काढवुन घेतलेले ते पोट्रेट तू समक्ष असल्याचे भासवते
ते पुन्हा-पुन्हा बघत मी तुझ्यात हरवते
हरवुन माझे देह भान तुझेच नाव उच्चारते
मनात प्रेम रुजलय म्हणुन
दिवसाच्या स्वप्नातही तुच दिसते
तुझे नाव घेता शब्दा-शब्दातुन कविता फुलते
माझ्या मनाच्या घरात फक्त मी तुलाच शोधते
स्वप्नांच्या या तारांगणात मी तुलाच बघते
तुझ्या प्रेमाची चाहुल ही या मनाला भंडावुन सोडते
कधी तु तुझ प्रेम कबुल करशील हाच प्रश्न उदभवते
हे भाव माझ्या मनाचे कवितेत दिसते.-
रंगी रंगुनी निळा रंग
मोरपंख घेऊनी सजलास तू
हातात घेऊनी ही मधुर बासरी
या राधेला वेड लावलस तू-
त्याचा आणी ऋतुचा स्वभावच तो
दोघेही नेहमी बदलत असतात
हे ऋतु नियमाप्रमाने बदलतात आणी
तो स्व:ताच्या मनाप्रमाने...
-