मी एक बोन्साय
तु घरात आणलेलं
(Captain)-
फुले हिरवं शिवार येता पाहुणा पाऊस
कणा कणातुन वाहे मातीचा सुवास
कंठ नभाचा दाटता पान्हा फुटतो डोंगरा
दरी खोर्यातुन वाहे नदी मिळते सागरा
उतरली थेंब अलवार पानावरं
कशी नभानेही धराची भरली घागर
पाणी देऊन चाललं हिरवी झालरं
कसं मातीच सजलं रूप साजीर-
तुम्हारी यादों को तुम्हारी बातों को मैंने
एक डायरी में बंद रखा हैं।
मेरे कमरे में एक तस्वीर आज भी खाली हैं
उसके पीछे मैंने तुम्हारा नाम लिखा हैं।
-
दाटता एक एक भाव
लेखणीतुन ओघळे शाई
पापण काठ भिजलेले
तुला दिसले कसे नाही-
कई रातें गुजारी हैं मैंने तेरी यादों में
कई काग़ज़ जलाये हैं मैंने तुम्हें सजाने में
ये स्याही ये कलम आज भी तयार बैठीं हैं
तुमपर इश्क लुटाने में-
हा ये झुट है कि हमे तुम्हारी याद आती नहीं हैं
और तुम केहेते हो हमें तुम्हारी जरूरत हि नहीं हैं-
तुमसे दूर होकर बुरा हैं हमारे दिल का हाल
तुम्हें हा कहे हुए हो गए हैं आज चार साल-
तुझ्या मिठीच्या उबेवरती माझा हक्क नाही
नाही म्हणता दिल्या हृदयी खोल जख्मा काहि
तुझ्या माझ्या पत्रांना मी पुन्हा पुन्हा वाचते
हरवलेले काही शब्द मी पुन्हा शोधु पाहते
विसर विसर विसरुन सुद्धा तुझा भास छळतो
जवळ येऊनही सख्या तु दूरच का पळतो
आई म्हणते काळ कधी थांबत नाही
तुझ्या मिठीच्या उबेवरती माझा हक्क नाही
त्या दिवशी माझ्या पासुन तुला दुर जातांना पाहिलं
डोळ्यांसोबत पावलांनाही क्षणात थांबवलं
तुझ्यासोबत माझ नसणं अजुन खरं झालं
आपल्या आठवांना कवितेच्या कोपर्यात साठवलं
तुझ्या नावाच कुंकू माझ्या माथी नाही
तुझ्या मिठीच्या उबेवरती माझा हक्क नाही-
तुझ्यावर प्रेम करताना
मला अवघे जिणे कळले
भाषा कळली प्रेम कळले
मने कळली प्रीत जुळली
उरी एक लय भिनली
अंग अंगात शिरशिरली
नांदवणारी पैंजणे कविते
सुर तालात झंकारली
जगणेही प्रेम झाले
अशी जादुगिरी झाली
तुझ्यावर प्रेम करताना
मला कळलेच नाही की
आयुष्याला किती भुलले
किती प्रेमयुक्त ठरले मी
किती व्यक्त झाले मी
किती अव्यक्त उरले मी
तुझ्यावर प्रेम करताना
राधेचा कृष्ण झाला की
राधाच कृष्ण झाली ??
-