कबूल करा वा नका
आहे गरज काळाची
सोय असावी सर्वत्र
सुसज्ज वृद्धाश्रमांची
जेष्ठ कधी अगतिक
निराधाराची होते सोय
वेळ येता ती गरजेची
सुविधा ती वृद्धाश्रमाची
-
हातामध्ये हात घेऊन
काहीतरी मागत होते
नजरेतले गूढ त्यांच्या
बरेच काही सांगत होते
पाळले नियम कायदे
सरळमार्ग ना तो सोडला
आडमुठे आले आडवे
जे नियमांस टांगत होते
ठेवला आदर्श जयांचा
जिद्दी माणसे गेली कुठे
भरवसा ज्यावर ठेवला
सत्तेपुढे ते रांगत होते
-
नंदनवनात त्या
रक्ताचे शिंपण का रे
दरी दरीतून वाहू लागले
अती दुःखाचे वारे
दोष कुणाचा
यावर आता झडतील फैरी
संधीसाधू पोळी भाजती
ते माणुसकीचे वैरी
उपाय थातूरमातूर होतील
प्रश्न जुने जागेवर ते
सत्तालोलूप रक्तापिपासू
चाटती लोणी प्रेतावरचे
प्राण ज्यांनी तेथे वेचले
शपथ त्यांची तुम्हा रे
शत्रूचा बिमोड करुनी
थोपवा अती दुःखाचे वारे-
अदृश्य ती गोष्ट
किती त्याचा अट्टाहास
माणूस म्हणून जगायला
का भोगणे तसला त्रास
अदृश्य ती गोष्ट
उगाच भटकते नको तिथे
चिंता कटकट वटवट
जगणे अवघड होते
अदृश्य ती गोष्ट
मागे त्याच्या का पळायचे
आतमधेच असते मनःशांती
माणसाला कधी काळायचे-
उतरते सत्यात
स्वप्न ते सारे
शंका नको रे
सिद्धांत सांगे
शुभ ते चिंता रे
येते वास्तवात रे
जीवनाचे सार
हेच आहे खरे
पहा स्वप्न रे
उतरते सत्यात
स्वप्न ते सारे-
शत्रू आपल्यातच बसला आहे लपून
गरज आहे वेळीच ओळखायची
फसायला नको गोड त्या वागण्याला
गरज आहे भलेबुरे जाणायची
धर्म जाती प्रांतासारखे भेदाभेद होतील
गरज आहे सावधान व्हायची
आपले पोट आपल्यालाच भरायचे
गरज आहे वास्तव जाणायची
येतील पेटवतील आपण शांत बसायचे
गरज आहे त्यांना जागा दाखवायची-
कधीतरी वाटते
सगळं जग माझ्याबरोबर
वागते आहे शत्रूसारखे
नकळत मनात झिरपतो
कडवटपणा
आपल्याबरोबर आणि
परक्याबरोबरही
अचानक एखादा व्यक्ती
येतो संपर्कात
वागण्याबोलण्यात त्याच्या
वहात असतो झूळूझूळू झरा
माया ममता स्नेहाचा
पळून जाते नकारत्मकता
समूळ-
एकदा सुटलो असा की
थांबता न आले
एकदा तुटलो असा की
जोडता न आले
जाणीव कुठे होती
होईल काय त्याची
एकदा बोललो असा की
रोखता न आले
मी तसा अध्यात वा
मध्यात नव्हतो कधी
एकदा घुसलो असा की
वळता न आले
ते जग वेगळे त्यांचे
तिथे रमणे मला न आले
एकदा जगलो असा की
जगता न आले
एकदा तुटलो असा की
जोडता न आले-
शाळा कॉलेज संपून
झालीत खूप वर्षे
त्या जमान्यात असायची
प्रत्येक परीक्षेची धाकधूक
पुढच्या आयुष्यातही
प्रत्येक क्षण वेगळ्या अर्थाने
होता परीक्षेचाच
तेव्हाही ती धाकधूक होतीच
नोकरी लग्न संसार
सगळं सुरळीत करताना
द्यावी लागत होती परीक्षा
धाकधूक ती ठरलेलीच
आता निवृत्तीनंतर वाटत होतं
संपल्या एकदाच्या परीक्षा
पण कसलं काय
आता हरघडी असते वेगळी परीक्षा
धाकधूक अजूनच वाढलेली
परीक्षा कधीच संपणार नाहीत
आणि परीक्षेची धाकधूकही
अगदी शेवटपर्यंत-