काही माणसं असतात,
जी कायम मनाच्या
कोपऱ्यात जपली जातात..
नकोसे असतात ते बुद्धीला,
पण हृदयाला तीच हवी असतात..
मनातुन आपले मानल्यामुळे,
आपण आपुलकी शोधतो फिरतो..
स्व आदराला त्यांच्यासाठी,
आपण बाजुला ठेवतो..
आपल्याला ग्राह्य धरण्याची,
संधी तेवढी देतो..
कितीही भांडलो तरीही शेवटी,
पावले त्यांच्याकडेच वळतात..
कारण काळजात ते खोल,
घर करून बसलेली असतात..
-
गझल - खंजीरे (माणसे)
पाठितला प्रत्येक वार अजूनी ताजाच आहे
तो अपराध खंजीराचा तरीही साधाच आहे
मी पाळली खंजीरे,कवटाळली उराशी माझ्या
विश्वास इतुका खंजीरावरही माझाच आहे
तू दिलेल्या जख्मांवरही तेवढेच प्रेम केले
हसत राहिलो मी माझा गुन्हा इतकाच आहे
सखे करू नकोस तू उगाच काळजी सख्याची
सभोवती हजार गोपिका हृदयी राधाच आहे
आहे दिवाळी तयांची अमुची घरे जाळूनी का
समजू नका मी संपलो अजूनही राजाच आहे
डोळ्यांवर भाबड्या विश्वास अता राहिला कुठे
नजरेने घायाळ होण्याचा तो इरादाच आहे
अता कशाला ही सोंगे आपुलेपणाची मांडली
जिव्हाळा कधीच संपला हा फक्त धागाच आहे
✍️सुनिल नायकल
-
काही माणसं अशी भेटतात,
जी काही वेळेसाठी येतात,
पण मनात घर करून जातात...
काही माणसं अशी भेटतात,
जी कायम सोबत राहतात,
पण मनात कधी नाही रहात...-
कायम हवीशी
काही नकोशी
का बरं असे ?
उत्तर नसे..
काही माणसं
असती आधार
सगळ्यांचा
काही खेचती
पाय सदा
आपल्या कुणाचा..
काही माणसं
हिमालय उंचीची
काही खुजी
कोत्या मनाची....
--------------------
-
काही माणसं असतात
त्यांनी कितीही त्रास दिला तरी
ती हवीच असतात,
त्यांच्या एका क्षणाच्या न
दिसल्यामुळे मन बैचेन होतं
काहीतरी हरवल्या सारखं वाटतं
सर्व काही असूनही
सगळं संपल्यासारखं वाटतं,
ती कधी मस्करीत जरी दुर गेली
तरी हृदय तुटल्यासारखं वाटतं
ती कधीच नजरे आड होऊ नये
सतत असचं वाटतं,
पण सर्व काही मनाविरुद्ध घडतं
कारण निसर्गाचा नियमचं आहे
जे हवं ते कधीचं मिळत नसतं
आणि जे नको असत ते कधीच
दुरावत नसतं
-
चेहर्याला तर सर्वच ओळखतात,
पण मनाला ओळखणारी मोजकीच माणसे असतात.
काही माणसे असतात जीवाला जीव देणारी,
न काही बोलता सगळ समजणारी.
काही माणसे असतात सतत आपली जाणीव करुन देणारी,
का बोलत नाही म्हणुन उगीचचं भांडणारी😛
काही माणसे असतात मनात घर करुन राहणारी,
आठवणींना मनापासुन जपणारी.
काही माणसे असतात आपल्या हक्काची,
कठीण काळात भरभक्कम आधार देणारी.
काही माणसे असतात जी स्वत:पेक्षा आपल्याला जपणारी,
न काही बोलता सगळ समजणारी.-
मनाच्या कोपऱ्यात बंद,
ही काही नावाची माणसे..
मनाचं दार ठोठावणारी,
हीच तर असतात काही माणसे..
निंदेचा पिंजरा उभा करणारी,
ही काही नावाची माणसे..
नवीन काम हाती घेताच,
उभी असतात हीच काही माणसे..
आठवणींच्या फांदीवर वाढणारी,
ही काही नावाची माणसे..
पाचोळ्यासम गळणारी,
तर काही पालवीसम फुलणारी..
हीच तर असतात काही माणसे..
मुक्त करा मनातून,
या काही नावाच्या माणसांना.
तरच खरा अर्थ येईल,
तुमच्या निरर्थक जगण्याला..-
माझ्या दुःखाला समजावलं नाही
बाहेरच्या जगाचं शहाणपण
हवं तसं त्यांच्यासारखं वागू दिलं
निमूटपणे मी घेतलं लहानपण
मी हिशोब केलाच नाही कधी
दिल्या घेतल्या सा-या क्षणांचा
माझ्या मोडक्या घराच्या भिंती
उगीच वेध घेतील त्यांच्या मनाचा
आपली माणसे शोधत निघालो
काही माहित नसलेल्या वाटेवर
एक चेहरा वळून पाहतांना
बघून, हास्य उमटले ओठांवर-
आपल्या परक्यांची विभागणी करताना
परक्यांची संख्या जास्त होती
आयुष्याच्या वळणावर अपघात झाले तेव्हा,
त्यांनीच मलमपट्टी केली होती.
आपले म्हणवणारे तेव्हा
निव्वळ प्रेक्षक झाले होते....
बघ्यांच्या भुमिकेत त्यांनी
त्यांचे खरे रूप दाखवले होते.....
मलमपट्टी करून परके
केव्हाच दुर गेले होते....
आडवळणावर भेटल्यावर मात्र
आर्वजून हाय-हलो करत होते....
आपलं म्हणणा-या माणसांना
बहुतेक हे रुचलं नसावं.....
म्हणुनंच की काय हल्ली
माझ्या नजरेला नजर देणंही त्यांनी टाळलं असावं.....-
🌷पंचाक्षरी रचना🌷
काही माणसं किती जपावा
जाती देऊनी तेवढा थोडा
त्या गोड गोड आनंद देतो
आठवणींचा क्षणाक्षणाला
प्रेमळ ठेवा..."१" प्रेमाचा मेवा..."२"
दुःखात साथ ते स्वतःपेक्षा
हात हातात घेती सदाच
उभे खंबीर काळजी जास्त
सदा पाठीशी ठेवी तेवत
जपती जिवा..."३" प्रेमाचा दिवा..."४"
करी हृदयात ते स्मरणात
आपुल्या घर सदा वसती
ते नकळत अशी माणसे
सदाच वाटे आम्हां लाभली
त्यांचा हो हेवा..."५" आभार देवा..."६"-