मिटवून घे डोळे तुझे
एक क्षण मला आठवण्यासाठी
चारच ओळी लिही तूही
तुझे पत्र मला पाठवण्यासाठी...
काळ लोटला अनंत
होऊन तुझ्या माझ्या भेटीला
तशीच ये मागच्या सारखी
वर्तमान मी सारा विसरण्यासाठी...
नको लावू अत्तर कसले
नको गजरा केसात मोगर्याचा
भिजल्या देहाने जवळी ये
घामात तुझ्या विरघळण्यासाठी...
राहू दे तसेच तुझे केस विस्कटलेले
अन् पायातही तीच चप्पल कालची
नको अनैसर्गिक सौंदर्य तुझे
सावळीच ये या डोळ्यात भरण्यासाठी...
तुझ्या कालच्या रूपावर
आहे सदैव मी भाळलेला सखे
नजरेत तेच रूप साठवले मी
कायम तुझ्यावर काव्य लिहिण्यासाठी...-
#कविराज_धनंजय #kndtv ... read more
वाराही जाऊ नये इतके
तुझ्यात नि माझ्यात अंतर होते
श्वास तुझे श्वासात माझ्या
गंधित श्वासांनी दरवळत होते...
स्पर्श तुझा अलौकिक
देहाला माझ्या शहारत होता
गंध तुझ्या देहाचा मला
सखे पुन्हा पुन्हा भारत होता...
डोळ्यातली काजळी तुझ्या
सखे सौंदर्य तुझे खुलवत होती
नितळ हास्यं ओठातले तुझ्या
मलाही माझ्यातून हरवत होती...
दबाव तुझा माझ्यावरचा
तुझ्या हृदयाची धडधड ऐकवत होता
अर्धमिठीत तुझ्या असलेल्या मला
तुझ्या मनातले सारे सांगत होता...
सैल होताच अर्धमिठी
मनासवे देहही भानावर आला
गंध तुझा देहास माझ्या
तुझ्याच रंगात आज रंगवून गेला...-
माय सारखी माऊली
अन् सुखाची सावली म्हणजे बाप..!
* #बाप...* एक सावली जी कायम आपल्या लेकराच्या डोक्यावर असते. रणरणते ऊन, कोसळणारा पाऊस, वादळ वारे, सारे सारे काही सोसून खंबीरपणे उभा असणारा आधार...!
बाप म्हणजे जबाबदारी, बाप म्हणजे काळजी, बाप म्हणजे सहज प्रसन्न होणारा देव, बाप म्हणजे अपार प्रेम, बाप म्हणजे सर्वकाही..-
नजरेत तुझ्या नजर माझी
शोधते स्वतःलाच मला दरवेळी
पाडते भुरळ मला सखे
तुझ्या गालावरची गोड खळी...
किती निरागसता तुझ्यात
तुझ्या हास्यात तुझ्या लाजण्यात
जसा शोभतो चंद्र एकटा
नभातल्या असंख्य चांदण्यात...-
तुझ्या वास्तवात
माझं अस्तित्व शोधणारा मी
कित्येकदा तुझ्या अस्तित्वात
माझं वास्तव बघत असतो...
कितीतरी वेळा मी
मागे फिरून बघतो तुला
त्याच वळणावर अजुनही
दूर दूर जातांना माझ्यापासून-
मध्यरात्रीच्या चांदण्या बघत
चंद्रालाही मी न्याहाळत होतो
चमकत होता दिमाखात तो
जागरणाची रात्र मी पाळत होतो...
दूर तो तरीही नजरेत होता
चंद्र आकाशातला झोपेत होता
मिणमिणत्या डोळ्यांनी पाहिले मी
तरीही तो नभी चमकत होता...-
खूप काही सांगायचे
खूप काही बोलायचे आहे
आयुष्याच्या झुल्यावर
तुझ्या सोबत झूलायचे आहे...
गंध वेगळा श्वास मोकळा
गीत नव्याने लिहायचे आहे
सुरांमध्ये घेऊन सूर
सुरांमध्ये गायचे आहे...
श्वास नवा प्रवास नवा
हाती हात घेऊन चालायचे आहे
सुख दुःखाच्या वाटेवरती
तुला नि मला सोबती व्हायचे आहे..!-
तुला पाहून मनालाही
खूप काही आठवून जाते
तुला पाहून शब्दांनाही
एक छानशी कविता सुचते...
कवितेचा मर्म तू
कवितेचा गर्भ तू
कवितेला लाभलेला
कवितेचा अर्थ तू...-
तू सागराची निळाई
तूच खळखळणारी सरिता
तू शब्द कवितेतले
तूच त्या शब्दांची कविता...
तू गंध प्राजक्ताचा
तूच अत्तर तबकातला
तू वारा कोवळा
तूच सूर गीतातला...
तू उगवता सूर्य
तूच दिवस मावळता
तू रात अंधारी
तूच काजवा चमकता...
तू शब्द मनातले
तूच माझ्या असंख्य कविता
तू सोबती जीवनाची
तूच माझी एकाग्रता...-
तू होतीस तेंव्हा
कवितेलाही माझ्या दाद होती
प्रतिक्रिया तुझी मला
अन् कवितेलाही साद होती...
नाहीस तू तर आज
म्हणून कवितेशी वाद होतात
कैक वेळा तर माझे
कवितेशी संवाद होतात...
असण्याने तुझ्या मला
अन् कवितेलाही एकांत नव्हता
भोवताली तुझ्या रेंगाळताना
मनातही माझ्या एकांत नव्हता...
आता लिहिणेही नको वाटते
आठवून कालचं सगळं सगळं
पण लिहिल्यावरच तुझ्यासाठी
देहाला अन् मनालाही वाटतं मोकळं...-