जगण्याच्या भ्रांतीतही थोडासा दिलासा मिळावा,
ऋतू प्रेमाचा असाच बहरावा.
माझे तुझे भेद सारे विसरून जावे,
सोबती कोणी मनासारखा मिळावा.
येशील कधी तूही माझ्या जागी,
प्रेमाचा अर्थ तुलाही असा कळावा.-
Follow for mo... read more
तुझ्या मनाचे गणित
सोडवता सोडवता अंधारले मन
उत्तर काही केल्या सापडेना
फक्त आकडेमोडीचे खेळ-
तुम मुझसे कारण ना पुछो,
मेरे अपने सपनें ना पुछो|
कठीण है बहूत समझाना,
ये जानकर तुम उत्तर ना पुछो|-
माझ्या शब्दांनीच माझ्याशी विद्रोह केला,
घातली मी त्यांना साद,अवेळीच त्यांनी संप केला.
सुटता-सुटेना तिढा झाली सारी फसगत,
महत्त्वाच्या क्षणांचे विसरणे झाले राजरोस.
मांडता येईना व्यथा... ना कूठली कथा,
शब्द नसतील सोबती तर होतेय मोठी दैना.
सांगा तुम्हीच आता काय मी करू,
शब्दांचा संप सोडवायचा कसा प्रयत्न करू?-
तुला पाहण्याची एक चुक झाली,
नाकारु कसा मी माझीच दिशाभूल झाली.
पाहीले कित्येक स्वप्न जागता,
कसे सांगू तुला माझीच झोपमोड झाली.-
लुट के चैन हमारा,
खामोश सा बैठा है|
इक शख्स दिल ही दिल में,
बेचैन सा बैठा है|-
है उनको नफरत तो खुलकर जताया करें,
यूॅं प्यार भरी बातें हमसे ना किया करें|
फासलें बढतें है तो बढ जाने दे,
देखके मुड के हमें फिरसे उम्मीद ना दिया करें|-
प्रवास सोपा नसतो कधीच,
हाती काही येवो अथवा न येवो
चालणं भागच असतं.
कुठे जायचं माहीत असो वा नसो,
चालणं भागच असतं.
ना कूठे थांबता, ना कूठे विसावता येतं.
डोळ्यांत आशेचे पंख घेवून एकेक ठिकाण
मागे टाकत आयुष्याच वर्तूळ पूर्ण करायच असतं.
प्रवास सोपा नसतो कधीच...-
ही रात्र बोलकी,
सोबती सावली चंद्राची.
गार वाऱ्याची झुळूक,
रोम-रोम शहारे आणती.-