विषयाचे बंधन मनाला नाही,
हृदयाचे स्पंदन शब्दांना नाही.
मनमोकळे जगतात हवे तसे,
मृत्यूचे वंदन, अक्षरांना नाही.-
तुझ्या शिवाय आता अंधारल्या ,
या जीवनाला अश्रूंची साथ आहे..
तुला लावला जीव इतकं की,
तू गेल्यानंतरही या वेड्या मनाला,
तुझ्याच परतीची वाट आहे..
मी नसेल कदाचित तुझ्या आयुष्यात
पण माझ्या या बेरंग जीवनाला
आता तुझ्याच आठवणींची साथ आहे..-
समजलेच नाही कधी!
मीच, मला हवे म्हणून जपत राहिले
तुला अन ह्या नात्याला !
अन तू मात्र ,
कधीच स्वतःहून विचारले नाहीस ,
मला अन माझ्या मनाला !!
-
जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ..
जीवनात दुःख खुप आहे,
थोडं सोसून बघ..
चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस,
दुःखाचे पहाड चढून बघ..
अपयश येतं निरखुन बघ...
डाव मांडणं सोपं असतं,
थोडं खेळून बघ..
घरटं बांधणं सोपं असतं,
थोडी मेहनत करून बघ..
जगणं कठीण, मरणं सोपं असतं,
दोन्हीतल्या वेदना सोसून बघ..
जगणं मरणं एक कोडं असतं,
जाता जाता एवढं सोडवून बघ...!-
ओढ लावून गेलं
तुझं प्रेमळ बोलणं
थोडं, मनाला खटकलं
मकर संक्रातीच्या शुभेच्छा, मोबाईलवर देणं....-
वाट ती खडतर खडकाळ दृष्छक तरीही चालते आहे
गवसेल मजला उत्तर कस्तुरी परी मी मार्ग धुंडाळते आहे,
भेगा पडल्या काळजाला हृदय रक्ताळ भळभळते आहे
तडा त्या पायाच्या कळ काळजाला हाक मनाची ऐकते आहे...
अपेक्षा साऱ्या अविरत तरीही त्या पायाखाली तुडवते आहे
कर्तव्य निभावताना स्व अस्तित्व राखून स्वत्व सांभाळते आहे,
वेदना संवेदना बोथट झाल्या का मनास विचारते आहे
गाभूळ भावना जरी जाणिवां जागृत करण्या ठाव उमलवते आहे...
सारेच प्रश्न सारीच उत्तरे काय निवडावे मन भांबावते आहे
रंग जीवनाचा फिका गंध तो दृहस फुलून गांधळावे मना समजावते आहे,
सडके भाव नको कुजके मन नको सृजन सुमधुर संगीत गाते आहे
एकटी मी वाटसरू ह्या वाटेची वाळवंट जरी पसरले साथ शोधते आहे...
मन ते कोरडे किती दिवस सुशील रसिक रसाळ आठवणीं स्मुरते आहे
तहान शामावण्यासाठी आठवांचे मेघ दाटले पाऊस नयनांतूनी
ओघळवते आहे,
कुठवर वेड्यासारखे चालायचे नाही ठावूक तरीही भावूक मनास धीर देते आहे
माझेच अस्तित्व हरवून मी गुंतल्या श्वासात रंगून गंधळून
उमेदीने झेपावते आहे...
-
तु दुर जरी असला तरी मनाला ओढ तुझीच असते...
सागराला भेटण्यासाठी नदी सतत वाहत असते...-
प्रेम तुझ मनाला धुंद करणारं
माझ्या मनात प्रितफुल उमलवनार
शब्द तुझे काळजा चे ठाव घेतात
रोम रोम माझे बहरवुनी जातात
बोलक्या नजरें चे भाव तुझ्या मनात रुजते
मोहरुन काया माझी अजुनच खुलते
हातात हात असतांना तुझ्यासवे
मी नभात उड़ते
बरसनारया सरीतुनी प्रेम हळूच गंधाळते
चिंब तुझ्या आठवणींचा पसारा
भिजवुनी घेण्याचा खेळ असतो सारा
असावे जीवनी तू आणी तुझ प्रेम
असच बहरणारं
प्रेम आपल मनाला धुंद करणारं
#प्रतीक्षा
-
असाच एका कातर वेळी...
मन माझे कोवळे ग, कळे न त्याला सोहळे ग...
वाटे जे पवित्र ग, का असे अपवित्र ग...
मन माझे कोवळे ग, कळे न त्याला मोहजाळे ग... सत्य वाटे जे नयनांना, का निघे मृगजळ ग... मन माझे कोवळे ग, कळे न त्याला ताळे ग... असावे जे मुक्त ग, का असे बंदिस्त ग...
मन माझे कोवळे ग, कळे न त्याला दांभिक ग...
जाणवे जे सात्विक ग, असे का साळसूद ग...-