निशा   (Nishu)
387 Followers · 274 Following

read more
Joined 24 April 2020


read more
Joined 24 April 2020
14 JAN 2024 AT 9:01

हुरहूर , उत्कटता मनातली ओठांवर जेव्हा आली,
संवेदना फुले , प्रितीच्या विणीत विणली
गुंफण दोन मनांची अलगद उमलली
होकार तुझा,भावनांची दरवळ झाली...

-


31 DEC 2023 AT 19:11

आज शेवटचा दिवस सरत्या वर्षाचा,
खूप काही ठरवलं होतं, आजमावण्यासाठी!
पण म्हणता म्हणता वर्ष सरलं,
अन् ठरवलेलं सगळं राहूनच गेलं...
खूप कडू गोड आठवणींची शिदोरी
नवीन नात्यांची वीण सगळं मनाच्या गाठीशी
आयुष्याचं गाणं गायच होतं परंतु सुर
कदाचित गवसले नाहीत,
निनाद शब्दांचा गुंजला मनी
हाक हृदयाची कदाचित नाही पोहचली कानी
खूप काही राहून गेलं.....खूप काही शिकवून गेलं
सरत्या वर्षात खूप काही दिलं अन् खूप हिरावून घेतलं
कदाचित....परंतु त्यातही हिंमतीने जगण्याचा धडा दिला,
दुःख ,हळहळ, नैराश्य काही काळ असत
फक्त आपणअंतर्मनातील तुटायच नसतं
स्वतःला सावरताना जगणं शिकायचं सरत वर्ष शिकवून गेलं..
हरवलं काही परंतु खूप काही गवसल अन्
मर्म , अन् मन जपतच खरं जगणं सांगून गेलं..
सरत्या वर्षाला निरोप, नवं वर्षाभिनंदन!!💐💐🎉🎉

-


7 FEB 2023 AT 12:54

हात हातात एकमेकांच्या
जीवनभर विश्वासाने रहावा,
सहवासाच्या वेल्हाळ धुंदीत
रंगीत जीवनाचा कणकण व्हावा...
अडीअडचणी, खाचखळगे कैक
विश्वास, प्रेम गुंफलेली विण एक,
दरवळला प्रीतीचा गंध जीवनी ह्या
ओळावले मोहरले क्षण क्षण अनेक..
आयुष्याची सर्व स्वप्ने मोहरवी संगतीने
उंच उंच झोके झुलावे सुखाचे उमळण्याने
रेशीम गाठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
चांदणे पांघरलेले शिंपावे ह्या दिवसाने..🥰🥰

-


31 JUL 2022 AT 9:01

वाढदिवस तुझा निखळ हास्य तुझ्या चेहऱ्यावर उमलावे,
निर्भेळ आनंद अनुभवताना जीवन तुझे सदैव खुलावे...

प्रेम रंगात रंगताना आयुष्य तुझे रंगीत होऊन जावे,
विचार अन आचार तुझे लेखणीतून उतरून बरसावे....

स्वप्नांचा झुला उंच अवकाशी,प्रगतीचे मनोरे उंच उंच रचावे,
एक एक पाऊल तुझे असे पडावे की जीवन सगळ्यांचे गंधळावे...

वाढदिवसाच्या या दिनी सुखसुमनाची व्हावी लयलूट जीवनी,
गुलमोहरापरी जीवन बहरताना, निखळता यावी तुझ्या मनी...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🎂🌹

-


7 JUL 2022 AT 13:21

हरवलेला वाटाड्या
मी काळ्याकुट्ट काळोखात,
नजर भिरभिरे चौहिकडे
मन तल्लीन तुझ्याच विचारत..
जळले क्षणात हृदय हे
रेशमी बंध विरले धुरळ्यात,
वेल्हाळ आहे मी सखे
आजही तुझ्या खोट्या प्रेमात..

-


12 JUN 2022 AT 11:21

जिवाभावाची सखी जेव्हा दहा वर्षानंतर भेटते..त्यावेळी असणारा,वाटणारा आनंद काही वेगळाच असतो.कितीतरी दिवसांनी ते दिवस पुन्हा आठवले.थँक्यू डियर पना,डियर सागर दादा😘😘😘

-


10 MAR 2022 AT 11:43

अवघडलेल्या कोंदट आयुष्याचा प्रवास इथेच संपावा,
अनंतात विलीन होताच मनासारखा मोकळा श्वास घ्यावा..

-


20 FEB 2022 AT 7:37

कल्लोळ माझ्या भावनांचा तुला कधीच ना रे कळला
पापण्याआड अश्रुंचा पाझर अन् वर्षाव कधीच ना रे दिसला,
दुःख मनाचे कोपऱ्यात खीचपत पडले निरंतर सख्या
दुरावा हा तुझ्या माझ्यातला स्पर्शाने कधीच ना रे मिटला...

-


13 FEB 2022 AT 12:26

हरवल्या भावना,करपले मन
हळव्या हृदयाची स्पंदने गोठली,
सख्या साथ तुझी सुटता क्षणाला
अलवार श्र्वासांची गती मंदावली..— % &

-


14 OCT 2020 AT 10:30

जीवनाची वाटचाल मार्गस्थ करताना खूप सारे लोक भेटतात..काहींशी मी नात अवखळ निर्मळ स्वच्छंदी नात निर्माण होत..काहींना स्वभाव..काहींना आचार..काहींना विचार आवडतो...त्यामुळे आपसूकच गुंफत गेले नात्यांच्या सोनेरी धाग्यात रेशमी बंध मनाचे...अन् जुळली मने...हृदयाची हाक ज्याला एकायला आली ती व्यक्ती खूप खूप अन् खूप काळजाच्या जवळ येते .तिच्या संगतीत जीवनप्रवास अलगद सुखकर अल्लड अवखळ वाटू लागतो.क्षणांक्षणाला हृदयाची स्पंदने निरपेक्ष भावनेने त्याच्यात गुंतून जातात...आयुष्याचा प्रवास सरते शेवटी पर्यंत ह्याच व्यक्तीसोबत व्हावा ही मनाची स्वार्थी इच्छा..आणि होणारही तसचं असत...परंतु कलिकेची झडप अशी असते की जीवा पेक्षा जवळ वाटणाऱ्या व्यक्तीला दूर लोटून जीवनाचा खडतर प्रवास चालवा लागतो...त्यावेळी मन तुटतं... मोडत...जगण्यासाठी काहीच शिल्लक नाही अस वाटतं तरीही जीवन व्यतीत करण्यासाठी प्रवास चालवा लागतो...खूप पुढे चालताना त्या व्यक्ती भेटते परंतु आपण त्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवन शक्य नाही होत...मन भांबावून जात..आणि काळाच्या ओघात आपण खूप सार पडद्याआड लुप्त केलं आहे ह्याची जाणीव होत...जे काळाच्या ओघात गेलं ते क्षण नव्याने सजले तरीही परत कधीच मिळणार नसतात...कधीच मिळणार नसतात...जवळ असूनही आपण त्यांना गमावलेले असत...परत कधीच न भेटण्यासाठी...

-


Fetching निशा Quotes