।। जय सद्गुरू ।।
जी माणसे दुसऱ्याच्या चेह-यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात. सद्गुरु त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाहीत आणि म्हणूनच ती सदैव समाधानी असतात-
।। जय सद्गुरु ।।
विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्यासाठी मोठी शिक्षा आहे.-
।। जय सद्गुरु ।।
स्वतः सोबत जेंव्हा दुस-यांच्या मनाचा देखील विचार केला जातो तिथेच माणूसकीचे सुंदर नातं तयार होतं...-
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
माझी माणसं हिच माझी संपत्ती
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो.
हे खरं आहे पण,
पैसा व्यवहारासाठी लागतो..
जगण्यासाठी लागतात प्रेमाची माणसं..-
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही. मिळाले तरी ते टिकत नाही आणि टिकले तरी ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.
।। नम्र झाली भुते त्याने कोंडिले अनंते ।।-
।। जय सद्गुरु ।
चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कमी होत नसतो....अर्थात ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणा-या असतात फक्त सद्गुरूंवर श्रद्धा असावी.-
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
शब्द अंतरीचे असतात दोष मात्र जीभेला लागतो.
मन स्वतःचे असते झुरावे मात्र इतरांसाठी लागते.
ठेच पायाला लागते वेदना मात्र मनाला होतात.
हिच ती खरी आपली माणसं असतात
की जी एकमेकांच्या वेदना जाणतात
व सदैव सोबत राहतात.-
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
वाद घालायचा ठरवला तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरही वाद घालता येऊ शकतो पण जर समजून घ्यायचे ठरवले तर मोठ्यातली मोठी गोष्टही समजून घेता येऊ शकते. वादा पेक्षा संवाद महत्वाचा.
।।तुटे वाद संवाद तो हित कारी ।।-
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
जसे आहात तसे रहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडला नाहीत त्याच्यासमोर जीव ओवाळून टाकला तरी तो तुमचा होणार नाही म्हणून लोकांचा विचार करत बसून स्वतः कष्टी होऊ नका.-