गतजन्मीच्या स्मृती साऱ्या
मनात तळाशी साठवून ठेव,
चाहूल जरी लागली माझी
ओळख ह्रदयाची आठवून ठेव...
पारिजात देशमुख-
पारिजात
(काव्य पारिजात)
996 Followers · 65 Following
Joined 15 December 2018
12 FEB AT 0:09
11 FEB AT 23:58
पुढचा जन्म भेटल्यावर
खुणगाठ बांधून ठेव,
ह्रदयाच्या अंतरपटात
सखे माझे नाव कोरून ठेव...
पारिजात देशमुख-
31 OCT 2023 AT 20:58
रात के रास्ते में चांद का सफर
क्यूं सहमा सा है रात का पहर
पारिजात देशमुख-
18 DEC 2022 AT 19:55
संध्याकाळ मावळताना
कळीत दडून बसली होती किरणे
रात्र होताच वाऱ्या सोबत
सुगंधाचे भिरभिरणे...-
7 DEC 2022 AT 8:55
कुठे पहाट शहारे
सुर्य उधळी केशर,
कुठे शहारल्या कळीला
स्पर्श वाऱ्याचा बोचर...-
6 SEP 2022 AT 10:16
पावसात भिजत असताना
पानं फुलं पावसाचीच होऊन जातात,
पाऊस ओसरला तरीही
एकमेकांशी हितगुज करत राहतात...-
1 SEP 2022 AT 11:51
नको बेरंगी वर्ख
नको झगमगाट नुसता,
जीव ओतून साकार मला
नको शोधू कुठे मी चराचरात असता...-
5 AUG 2022 AT 11:08
पाऊस धो धो कोसळल्यावर
फुलांच्या पाकळ्या विखुरलेल्या,
पाऊस पडून गेल्यावर ही
म्हणे पाकळ्या बिथरलेल्या...-
28 JUL 2022 AT 23:56
कम नहीं साथ तेरा,
होठों की मुस्कराहट हो तुम,
साँसों की लर्जिश तुम,
धड़कनों की थरथराहट हो तुम...-