दिवसागणिक प्रगती,
समृद्धि करतोय माणुस...
निसर्गाचा ऱ्हास करून
शहरे वाढवतोय माणुस...
स्वतः केलेल्या प्रगतीवर,
स्वतःच आपली थोपटून
पाठ घेतोय माणुस...
आपल्याच मरणाची
तयारी करून
ठेवु लागलाय माणुस...-
पानांची ती झुळूक,
पाण्याच्या त्या सरी.
मंद मंद वाहे,
हवेच्या त्या लहरी.
गजबज झुडुपात करे,
किलबिल तो पक्षांचा थवा.
फुलपाखरू जणू बसुनी,
फुलांवरी घेई जन्म नवा.
काळोख मेघ बघुनी,
नाचे थुई थुई तो मोर.
होऊनी आनंदी हरणीपण,
गिरक्या घेती जोर.-
शेती म्हातारी झाली
कारखाने जन्मले
हवेत वायू सोडून
कित्येक भोपळी मेले
सायकल गेल्या
मोटारी चालू लागल्या
धुरांडया त्यांच्या
नाकाला लोंबु लागल्या
पाण्याचा माठ
मातीतच गेला
शीतगृहातला वायु
ओझोन चिरत गेला
छतावरचा पंखा आता
निपचित पडून असतो
ए . सी . मात्र दिवसरात्र
गालात हसत असतो
खाण्याच्या तोंडाची
फुकणी बनली
मरण्याच्या निमित्ताला
एक दांडी पुरली
हे विभिन्न वायू सारे
आजूबाजूलाच वसतात
शरीरात घुसून हळूच
आयुष्याचे गणित चुकवतात
-
नाही लागत मी कुणाचे देणे या जगात
कारण गुरफटलो नोकरी अन माझ्याच एकट्याच्या संसारात
विंडो सीट डावलून व्यस्त असतो मोबाईल च्या नादात
अन म्हणे वेळ च नाही भेटत रोजच्या प्रवासात
अरे बघ तर एकदा डोकावून बाहेरचा नजारा
खूप काही सांगत असतो हा निसर्ग साजरा
उत्तुंग भरारीच स्वप्न ठेव हेच सांगते हे आभाळ
तर कितीही संकटे आली तरी न डगमगता
स्थिर राहायला शिकवतात या डोंगर रांगा
चंद्रासारखे शीतल तर सुर्यासारखे तेजस्वी व्हा
दमलात तर पानझडी सारखे गळून जा
पण पुन्हा मोहरासारखे बहरून या
एवढे पायदळी तुडवूनही आह सुद्धा न करणारी धरती
तर आपल्याला भरभरून देऊन स्वतः रित्या होणाऱ्या नद्या
काहीच मागत नाही तुला शिवाय एक सहवास
कृतज्ञ नाही पण कृतघ्न तरी नको होऊ तु दिवसेंदिवस
हेच सांगण्याचा करतात त्या प्रयास
-
हायकू रचना - निसर्गास घातक प्रदुषण
कैसे संकट
हवा प्रदूषणाचे...
हे टाळायचे...
हे प्रदूषण
संकटाचे द्योतक...
परी घातक...
हा प्राणवायू
असे मिळे अशुद्ध...
संकट खुद्द...
महत्त्व आहे
राहण्याला जिवंत...
प्रदूषणात...
आहे अशक्य
म्हणून वेळे जागा...
जपे हा धागा...
पर्यावरण
जगण्याचा आधार...
ते निराधार...
ही वसुंधरा
रडे नित्य नेमाने...
प्रदुषणाने...
झाडे लावा
प्रदूषणच टाळा...
बसवू आळा...
-
एकदा निसर्गाच्या सानिग्ध्यात
सहज फिरून आलो,
दु:खाचे क्षण सारे
विसरूनिया गेलो....
मग निसर्ग मला म्हणाला..!
आज कसा काय इकडे,
मी म्हटले तुझ्याविना जिवनाची
वाटच नाही सापडे....
मग निसर्ग थोडा शांत झाला
मी पुन्हा पुटपुटले,
कशी काय तुझी प्रकृति
मी सहज उच्चारले...
भरलेल्या डोळ्यांनी
निसर्ग सांगे व्यथा,
तुझ्याकारणे आली मला
माझ्या अंगी हि दशा....
त्याच्या अशा बोलन्याने
माझ हृदय आल भरून,
मी वचन देते म्हटलं तुला
निसर्ग लाविन पुन्हा तारून.....
-
एक अनजाना सा एहसास जो अपना सा लगता हैं।
निसर्ग औऱ उससे जुड़ी हर चीज कितनी शांति का अनुभव कराती हैं।
बिना कुछ कहे सारी बातें हो जाती है जब
खुले आसमान से बहती हवा मेरे बालो को छूकर मेरे झुमके हिला जाती हैं।
सारे गम कहि बहोत पीछे छूट जाते है जब
आसमान से गिरती बारिश की बूंद मेरी आँखों में भरे आंसू संग अपने बहाके ले जाती हैं।
सारी उदासी गायब हो जाती है जब
बात मनुष्य और निसर्ग से निस्वार्थ प्रेम की आती हैं।
सबकुछ कितना प्यारा हैं।-
मंद वारा,पहाटेची झूल
सोनचाफ्याच्या झाडाला गंधाची चाहूल
दवाने भिजले पान आणि पान
फुलांनी छेडली सुरेल तान
हिरव्या पानात दडली पिवळसर कळी
सोनकेशरी उन्हाच्या गालावरची खळी
कुणीतरी कुणाला साद दिली झाडावर
बहरलेल्या फांद्यांवर, थंडगार झर्यावर
त्यांच्या आवाजाने भारून गेला आसमंत
मधुर कूजनाने मन झाले तृप्त
प्राजक्ताचा सडा भरले आहे अंगण
वासुदेवाच्या अभंगाने भिजले विठ्ठलाचे चरण!!
आयुष्य असं आपलं सृष्टीने भारलेलं
प्रत्येक क्षणी """निसर्गाच्या"" साक्षीने सजलेलं!
-