लांबून पूजा करणारे
पायाखाली घालतील
चंद्राला कुठे माहित
माणसं असं फसवतील
-
ती कमवते
घर सांभाळते
बाहेर जाण्यासाठी
आज्ञा मागते
ती 21 व्या शतकात
आयुष्याच्या एका टप्प्यात
आयुष्य रेटते
कोणाच्यातरी धाकात
ती सुंदर दिसते
सालस वागते
प्रत्येकाचा सन्मान ठेवून
अंतर ठेवून वागवते
ती स्वप्नांच्या जगात
छोट्या गोष्टींतून आनंदात
तरीही समाधान मानते
मनाविरुद्ध निर्णयात
-
भातुकली शब्द ऐकला
परत सगळंच आठवलं
पानात नसतानाही काही
तृप्तीचं सोंग होतं वठवलं
-
आपण सगळं हाताळायला शिकतो पण विचार योग्य पद्धतीने कसा हाताळावा ह्यावर विचार करत नाही .
-
इथे प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्य नामक कंपनीचा ceo असतो .
एखादी कंपनी व्यवस्थित चालण्यासाठी दूरदृष्टीकोनातून काही निर्णय घ्यावेच लागतात .
एखाद्या कठोर घेतलेल्या निर्णयाबद्दल अजूनही तुम्ही मनस्ताप करत राहू नये .
त्या क्षणी ते योग्य होतं म्हणून तुम्हाला ते करावं लागलं .
भले चुकलं असेलही पण त्याचा गिल्ट मनात बाळगून स्वतःच्या निर्णय क्षमतेला कोसू नका .
थांबू नका पुढे चला ...
काळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो .-
एकदा बसू दोघेही निवांत खांद्यावर डोके ठेवून
चाफ्याचा सुवास श्वासात भिनवत
तर कधी रातराणीला सोबत करत
कधी ओल्या मातीचा गंध भरून घ्यायचा वेडा प्रयत्न करू कुपीत
तर कधी तुझं माझं असण्याने
प्रत्येक क्षण सुगंधित करून राहू जगत
-