बरसता मोहरते अवघी सृष्टी
लेकी सुना सह आनंदून जाती दु:खी कष्टी
विविध खेळांचा अन् माह व्रतवैकल्यांचा
उजळून जाई नव कल्पनांनी,सृजनांची सृष्टी-
याद कर ज़िन्दगी से हुयी मुलाकातें
वारसा कुठला ना साहित्य पर... read more
हिशोब नाही असा कधी केला
किती दु:खांशी तो संसार केला
व्यापारी तसा मी नाही कशाचा
मैत्री जोडण्याचाच उद्योग केला-
कोण गंधाळले किती वेड्या मना कसे कळावे
येऊन कुणीतरी अलगद हलकेच स्पर्शून जावे-
अपुऱ्या प्रश्नोत्तरात नक्कीच काही दडलेलं असतं
आठवावं प्रत्येकाने त्याआधी काय घडलेलं असतं-
जल्द ही अब गहरी रात होने वाली है
और कुछ हो, चाहे कुछ भी न हो
चुपके से तुम्हारी याद सतानेवाली है!-
उमटलेत ठसे अस्पष्ट काही आसमंतात या
तरी आहेत काही ठोस कोरलेले मन अंतरी-
रे, अधांतरी
व्याप खासा, येण्या जमिनीवरी
कोणते आकाश येथे, जगण्याचे
तरीही झुलतोच आहे वाऱ्यावरी
सारेच व्यर्थ, अवडंबर शाश्वताचे
कोण नाही, अवलंबून कुणावरी
वाटे मोहक, स्वातंत्र्य बंधनातले
गुदमरतो श्वास बेतता जीवावरी
खेळ अवघा, विचारांचा एकल्या
तुटते नाळ,कळते येता भानावरी-
बस एवढीच काय ती माझी कमाई आखरी
दिले घेतले जे काही त्यास साक्ष हि स्वाक्षरी-