तू कुठेही असो
कितीही दूर असो
सतत मला जवळ भासतो
चांदण्याच्या लख्ख प्रकाशात
नेहमीच खुलून हसतो
तू कुठेही असो, पण
डोक्यातच घर करून बसतो
केवळ मनातच नाही तर
माझ्या कवितेतही सापडतो
तू कुठेही असो
स्पर्श तुझा जाणवतो
येता मंद वाऱ्याची झुळूक
प्रीतीचा हा गंध, आसमंतात दरवळतो
तू कुठेही असो
साद तुझी नेहमीच ऐकू येते
गहिवरलेल्या मनाला
ती हलकेच सावरून जाते-
मला तुला सांगायचं आहे
मनातल्या माझ्या भावनांना शब्दबद्ध करायचं आहे
मोकळा करून द्यायचा तो भावनांचा पूर
ज्याने रोज च दाटून येतोय हा ऊर
तुला सांगताना तुझ्यातच हरवायचं आहे
हरवलेल्या शब्दांना पुन्हा तुझ्यासाठीच मांडायचं आहे
नाही म्हणता म्हणता पडलेल्या या जाळ्यात असेच गुंतून राहायचं
तुला काही न सांगताही कळणारे हे प्रेम, आज मलाही व्यक्त करायचं
-
जेव्हा एका अनोळखी व्यक्तीसोबत
एक वेगळी अनोळखी वाट चालू होते
तेव्हा आपल्या अनोळखी मनाचं रूप
त्याला चांगले ओळखु लागते
मग सुरु होतो प्रवास तो स्वतः मधल्या 'मी' ला
अन त्याच्या मध्ये गुंतलेल्या 'मी' ला ओळखण्याचा-
तुझ माझ करता करता आपलेपणच हरवुन गेले
कळीचे फूल होता होता उमलने राहूनच गेले
तुझ माझ करायचे होते तर नातं जोडायलाच नको होतं
एकत्र राहूनही वेगळेपण दाखवायला नको होतं
-
Baatein to hum bhi karate the khudse
Bass unko hi nahi bata pate
Is dil ki baat us dil tak nahi pahucha sake
Varna hum bhi aaj ek prem kahani k kirdar ban jate-
शहाळासारखे बाहेरून टणक पण आतून मधाळ
जे केवळ लेकरांच्या अपशब्दांनीच होतं घायाळ
झाकलेल्या सव्वा लाखाच्या मुठी सारखे असते ते
पोरांच्या संकटांवर तुटून पडणार अन
मूठ उघडल्यास त्याच हाताने प्रेमाने भरवणारे
पोराच्या भल्यासाठी त्यावर हात उगारणारे कठोर मन पण बापाचेच असते
तर लेकीच्या पाठवणीत एकट्यातच ढसाढसा रडणार नाजुक मन पण बापाचेच असत
स्वतःच्या पोटाची खळगी अन पायाच्या भेगा लपवून
कुटुंबाला आनंदी ठेवण्याचं बळ ज्याच्याकडे असते ते बापाचे मन
जे स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांना बांध घालून
पोरांच्या स्वप्नासाठी दिवस रात्र राबत असत ते बापाचं मन असते
ज्याची खोली मापता येणार नाही अन
ज्याच्या प्रेमाला कशाचीही तुलना नाही ते आहे बापाचं मन
-
सुना है कल हमारा दिन मनाया जायेगा
एक दुसरे के खातीर कुछ नजराणा लिया जायेगा
जरूरत नहीं है इस रिशते को एक दिन के जश्न की
हमारी दोस्ती तो बहार है सदियोकी
में तो पेहलेसे शुकरगुजार हू खुदा की
तुझ जैसा तौफा दिलवाया है जो उसने-
मैफिल ती रंगलेली जुन्या आठवणींची
एकत्र घालवलेल्या सोनेरी क्षणांची
जुन्या गप्पांचा गंधच निराळा
कारण फुलतो तिथे हास्याचा मळा
जुना काळ होता सोन्यासारख्या लोकांचा
नाविन्याला मढवून, जुनं टिकवण्याच्या अदबीचा-
रस्ते वेगळे झाले आपले
कारण स्वप्ने पण प्रत्येकाची वेगळी होती
काही फरक पडलाच नाही नात्यात
कारण आपली मनं जी जुळली होती-
रस्ते वेगळे झाले आपले
कारण स्वप्ने पण प्रत्येकाची वेगळी होती
काही फरक पडलाच नाही नात्यात
कारण आपली मनं जी जुळली होती-